लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी (जानेवारी २७, १९०१ - मे २७, १९९४) हे मराठी लेखक, कोशकार व सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक होते.[१]
शिक्षण व बालपण
[संपादन]जोशींचा जन्म धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आणि शिक्षण वाई येथील प्राज्ञ पाठशाळेत झाले. लहानवयात मधुकरी मागून त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले.[२] स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्याकरिता इ.स. १९३२ साली त्यांना तुरुंगात जावे लागले.
संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते.वाराणसी येथे जाऊन जोशी यांनी तर्कशास्त्राचे अध्ययन पूर्ण केले. त्यांनी तर्कतीर्थ ही उपाधी प्राप्त केली.[२]
सामाजिक सुधारणा
[संपादन]अस्पृश्यता निवारण, विधवांचे पुनर्विवाह, अशा सामाजिक प्रश्नांवर जोशी यांनी काम केले. महात्मा गांधी यांच्या अस्पृश्यता निवारण चळवळीत त्यांचे वैचारिक योगदान होते.[२]
प्रकाशित साहित्य
[संपादन]- वैदिक संस्कृतीचा विकास[३]
- मराठी विश्वकोश (संपादन)
- धर्मकोश (एकूण १६ खंडांचे संपादन)
- विचारशिल्प
- आधुनिक मराठी साहित्य
- समीक्षा आणि रससिद्धांत
- हिंदू धर्मसमीक्षा
- श्रीदासबोध
- राजवाडे लेख संग्रह (संपादन)[४]
- उपनिषदांचे भाषांतर
- संस्कृत संहितेचे वर्गीकरण (Catalogue of Sanskrit Scripts)
समाजकार्य
[संपादन]- महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धा व राज्य ग्रंथ पुरस्कारांची सुरुवात
पुरस्कार
[संपादन]- पहिला साहित्य अकादमी पुरस्कार (१९५५) - वैदिक संस्कृतीचा विकास
- राष्ट्रीय संस्कृत पंडित पुरस्कार १९७३
- पद्मभूषण पुरस्कार १९७६[५]
- पद्मविभूषण पुरस्कार १९९२[५]
गौरव
[संपादन]- अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन दिल्ली १९५४
- प्रथम अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक महामंडळ १९६० - १९८०
- मराठी विश्वकोशाचे आद्य संपादक
इतर
[संपादन]- प्रा. रा.ग. जाधवांनी शास्त्रीजी हा तर्कतीर्थांच्या कार्याचा परिचय देणारा ग्रंथ लिहिला आहे.
बाह्य दुवे
[संपादन]
संदर्भ
[संपादन]- ^ Gandhi, Gopalkrishna (2012-10-05). My Dear Bapu: Letters from C. Rajagopalachari to Mohandas Karamchand Gandhi, to Debdas Gandhi and to Gopalkrishna Gandhi (इंग्रजी भाषेत). Penguin UK. ISBN 978-81-8475-720-0.
- ^ a b c "महाराष्ट्रीय विचारविश्वाचे अजातशत्रू नेतृत्व". Loksatta. 2022-05-27 रोजी पाहिले.
- ^ Jośī, Lakshmaṇaśāstrī; Parāḍakara, Moreśvara Dinakara (2005). वैदिक संस्कृति का विकास (हिंदी भाषेत). Sāhitya Akādemī. ISBN 978-81-260-2170-3.
- ^ Bora, Dr Rajmal (2008). Bharat Ke Bhasha Parivaar (हिंदी भाषेत). Alekh Prakashan. ISBN 978-81-8187-083-4.
- ^ a b Agrawal, S. P. (1993). Development Digression Diary Of India : 3d Companion Volume To Information India 1991-92 (इंग्रजी भाषेत). Concept Publishing Company. ISBN 978-81-7022-305-4.