Jump to content

चर्चा:लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी विश्वकोश तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोश सिद्धीस नेण्याचे मोठे कार्य केले. वाईसारख्या शहरात राहून त्यांनी अहर्निश प्रयत्नांनी हा प्रकल्प तडीस नेला. एखाद्या भाषेची समृद्धी तिच्यात असे किती कोश लिहिले गेले आहेत यावरून ठरते असे म्हटले जाते. मराठीची तुलना इंग्रजीशी याबाबत करणे अप्रस्तुत होईल, परंतु मराठीतही विविध विषयांवरील कोश निर्माण झाले आहेत. आता इंटरनेटच्या जमान्यात हवी ती माहिती एका क्लिकसरशी उपलब्ध असताना, विश्वकोशाचे जाडजूड खंड तसे कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. या परिस्थितीत, मराठी भाषेतील विश्वकोशांनी त्यांचे स्वरूप बदलणे अपरिहार्य आहे.

हळुहळु का होईना पण, माहितीच्या महाजालाची कवाडे मराठीमध्ये खुली होत आहेत. विकीपीडिया हा इंटरनेटवरील एक विनामूल्य विश्वकोश आहे. हा विश्वकोश भारतीय भाषांतदेखील उपलब्ध आहे आणि एक स्तुत्य बाब म्हणजे भारतीय भाषांत मराठीमध्ये सर्वाधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. असे जरी असले, तरी इतर भाषांच्या मानाने माहितीच्या भाषांतराचे काम बरेच पाठी आहे आणि जर खऱ्या अर्थाने संपूर्ण माहिती मराठीत उपलब्ध व्हायला हवी असेल तर त्यासाठी अनेकांचे सहकार्य आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा. posted by Nandan at 9:47 PM नंदन

Start a discussion about लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी

Start a discussion