Jump to content

कुंभवली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कुंभवळी या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?कुंभवली

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .७६१६८ चौ. किमी
जवळचे शहर पालघर
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
२,३६१ (२०११)
• ३,१००/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१५०१
• +०२५२५
• एमएच४८

कुंभवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

बोईसर रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला मऔका मार्गाने गेल्यावर डावीकडे हे गाव लागते. बोईसर रेल्वे स्थानकापासून हे गाव ७.९ किमी अंतरावर आहे.

हवामान

[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.

लोकजीवन

[संपादन]

हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ६७७ कुटुंबे राहतात. एकूण २३६१ लोकसंख्येपैकी १४०२ पुरुष तर ९५९ महिला आहेत. गावाची साक्षरता ८७.१६ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८९.४८ आहे तर स्त्री साक्षरता ८३.५७ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २५९ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १०.९७ टक्के आहे.

नागरी सुविधा

[संपादन]

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस बोईसर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी दिवसभर ठराविक वेळी उपलब्ध असतात. ऑटोरिक्शासुद्धा बोईसर रेल्वे स्थानकावरून दिवसभर उपलब्ध असतात.

जवळपासची गावे

[संपादन]

उच्छेळी, नवापूर, टेंभी, पामटेंभी, कोळवडे, गुंदाळी, आलेवाडी, नांदगाव तर्फे तारापूर, आगवण, पंचाळी, उमरोळी ही जवळपासची गावे आहेत.

संदर्भ

[संपादन]

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/