झोटी चीता
झोटी चीता (ଝୋଟି ଚିତା) ही ओरिसा राज्यातील उत्सवांशी संबंधित एक रांगोळी आहे. [१] कार्तिक आणि मार्गशीर्ष महिन्यात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सुदासव्रताचा हा एक पारंपरिक भाग मानला जातो.गुंतागुंतीची नक्षी असलेली विविध प्रकारची रांगोळी हे याचे वैशिष्ट्य आहे.
पूजेतील महत्त्व
[संपादन]मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी देवतेचे पूजन महिला घरोघरी करतात. या पूजनातील विशेष अलंकरण भाग म्हणून झोटीला महत्त्वाचे स्थान आहे. शेतातील नवे धान्य कोठारात भरून घरात या काळात समृद्धी येत असल्याने तिच्या स्वागतासाठी हा उत्सव साजरा केला जातो. देवीचे विशेष स्वागत करणारी नक्षी अशी झोटी चीता मागील कल्पना आहे.[२]
स्वरूप
[संपादन]तुळशी वृंदावन,भिंती,स्वयंपाकघर,देवघर/प्रार्थनाघर,जमिनी, उंबरठा अशा सर्व ठिकाणी ही रांगोळी काढली जाते.ओरिसातील ग्रामीण भागात रस्ते स्वच्छ केले जातात. घराचे अंगण,ओसरी सारविली जाते आणि नंतर त्यावर हे सर्व नक्षी आरेखन केले जाते. आदिवासी बहुल भागात त्यांनी त्यांच्या धारणेनुसार आणि समजुतीनुसार काढलेली पारंपरिक विविध प्रकारची नक्षी दिसून येते.[३]
वैशिष्ट्य
[संपादन]झोटीला चीता असेही एक नाव आहे. तांदळाचे पीठ पाण्यात कालवून मिश्रण तयार केले जाते. यापीठाचा वापर करून वर्तुळ, अर्धवर्तुळ, त्रिकोण, अशा भौमितीय आकृतींचा उपयोग करूननक्षी तयार केली जाते.यामधेलक्ष्मीची पावलेही चितारली जातात.मानबासा गुरूबार या उत्सवात महालक्ष्मीची पूजा केली जाते. त्याप्रसंगी ही विशेष रांगोळी काढली जाते.[४]
मुरुजा
[संपादन]मुरुजा म्हणजे पांढऱ्या दगडाच्या भुकटीपासून फक्त जमिनीवर काढलेली रांगोळी. या रांगोळीमधे रंग भरण्यासाठी वाळलेली झाडाची पाने, जळलेल्या नारळाच्या करवट्या, झेंडूच्या पाकळ्या,हळद,गेरू यांचा वापर करून रंगसंगती साधली जाते.मुरुजा काढण्यासाठी भुकटी दोन बोटांच्या चिमटीत घेऊन विशिष्टपद्धतीने रांगोळी काढण्यासाठी सरावाची आवश्यकता असते.दक्षिण भारतात विशेषकरून अशाप्रकारे ठिपके जोडून रांगोळी काढण्याची पद्धती प्रचलित आहे.[३]
विविध उत्सवांमधील महत्त्व
[संपादन]ओरिसा मधील विविध उत्सवांमधे काढण्यात येणाऱ्या झोटीची संकल्पनाही वेगवेगळी आहे.यामधे केवळ कलेची संकल्पना नसून लौकिक आणि पारलौकिक गोष्टींना एकमेकांशी जोडणार दुवा म्हणून या चिह्नाकडे पाहिले जाते.[५][६] उदाहरणार्थ, लक्ष्मीपूजनाच्या वेळी भिंतीवर वा जमिनीवर भाताच्या लोंब्या साठवून केलेल्या ढिगाचे चित्र काढले जाते.दुर्गापूजेच्या काळात लाल गेरूवर पांढरे ठिपके उमटवून चित्रे काढली जातात. हे शिव आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते.[२]
हे ही पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ Publication, Mocktime. Odisha Objective GK General Knowledge Based on Previous Papers OPSC & OSSCExams (इंग्रजी भाषेत). by Mocktime Publication.
- ^ a b "Utkaliya Jhoti Diwas observed amid gaiety - OrissaPOST". Odisha News, Odisha Latest news, Odisha Daily - OrissaPOST (इंग्रजी भाषेत). 2018-12-13. 2020-12-05 रोजी पाहिले.
- ^ a b Ltd, Data and Expo India Pvt; Goyal, Ashutosh (2014-05-01). RBS Visitors Guide INDIA - Odisha: Odisha Travel Guide (इंग्रजी भाषेत). Data and Expo India Pvt. Ltd. ISBN 978-93-80844-82-4.
- ^ Nagarajan, Vijaya (2018-10-25). Feeding a Thousand Souls: Women, Ritual, and Ecology in India- An Exploration of the Kolam (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. ISBN 978-0-19-517082-5.
- ^ "Believing in tradition - OrissaPOST". Odisha News, Odisha Latest news, Odisha Daily - OrissaPOST (इंग्रजी भाषेत). 2019-11-17. 2020-12-05 रोजी पाहिले.
- ^ "Rangoli designs and their importance - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2020-12-05 रोजी पाहिले.