Jump to content

झिकेटान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झिकेटान
子科滩镇
चीनचा प्रांत


देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी छिंगहाय
लोकसंख्या १०,०००
घनता ७.४८ /चौ. किमी (१९.४ /चौ. मैल)
संकेतस्थळ http://www.qh.gov.cn/


स्थान

[संपादन]

चीन मध्ये, तिबेटच्या उत्तर-पूर्वेला,छिंगहाय (Qinghai) हे राज्य किंवा प्रांत आहे. शिनिंग(Xining) ही चिंघायची राजधानी, बीजिंगपासून विमानाने प्रवास केल्यास अडीच तासात तुम्ही शिनिंगला पोचता. या राजधानीच्या दक्षिण-पश्चिमेला 144 किलोमीटर अंतरावर झिकेटान (Ziketan) 10000 लोकसंख्या असलेले एक गाव आहे.

भौगोलिक रचना

[संपादन]

या प्रांताचा बहुतेक प्रदेश अतिशय डोंगराळ असून त्यातील गावे अतिशय दुर्गम अशा ठिकाणी असल्याने त्यांच्याशी संपर्क ठेवणेही पुष्कळ वेळा कठीण असते.

मानववंश

[संपादन]

तिबेटियन वंशाचे लोक येथे प्रामुख्याने रहातात.

प्लेगची साथ

[संपादन]

इ.स. २००९ मध्ये येथे प्लेगची साथ आली.सर्वप्रथम या गावात रहाणाऱ्या 32 वर्षाच्या एका मेंढपाळाला प्रथम लागण झाली व तो दगावला. त्याच्या पाठोपाठ 37 वर्षे वयाचा दुसरा एक शेजारी रहाणारा गावकरी व आता 64 वर्षाचा एक मेंढपाळ हेही दगावले आहेत. या मृत व्यक्तींच्या सहवासात आलेल्या 9 व्यक्तींना लागण झाली असल्याने वैद्यकीय उपचार चालू आहेत यापैकी दोन व्यक्ती तरी गंभीर रित्या आजारी आहेत. चिनी अधिकाऱ्यांच्या हवाल्याप्रमाणे, झिकेटान गाव अतिशय दुर्गम अशा प्रदेशात असल्याने त्या गावाला पूर्णपणे एकाकी पाडणे (Isolation)शक्य झाले आहे. मृत व्यक्तींच्या सहवासात, 16 जुलैनंतर ज्या कोणी व्यक्ती आल्या असतील, त्यांचाही शोध घेणे चालू आहे. या गावात आता भितीचे एक प्रचंड सावट पसरले असून कोणीही व्यक्ती रस्त्यावर येण्यास सुद्धा तयार नाही.वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (World Health Organisation (WHO))चे अधिकारी, चिनी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. “आम्ही हा रोग आवाक्यात आणण्याचे सर्व प्रयत्न करत आहोत. औषधे, क्ष-किरण यंत्रे आम्ही तेथे पाठविली आहेत” असे चिनी अधिकारी म्हणत आहेत. त्यांच्याजवळ या प्रकारची उत्तम यंत्रणा असल्याने हा रोग आटोक्यात ठेवण्यात त्यांना बहुदा यश मिळेल.परंतु जर काही कारणांनी हा रोग मर्यादित ठेवण्यात चिनी अधिकाऱ्यांना अपयश आले तर स्वाईन फ्ल्यू किंवा सार्स( Sars or Influenza A (H1N1)) या रोगांच्या मानाने हा रोग इतका जास्त धोकादायक आहे की काय होऊ शकेल याची कल्पनाच करवत नाही.


इतर दुवे

[संपादन]

चित्र फित

[संपादन]