भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाची स्थापना सन 1861 मध्ये झाली .या विभागाचे पहिले महानिर्देशक म्हणून अलेक्झांडर कनिंगहॅम यांची नेमणूक झाली. यांच्या कारकिर्दीत प्रामुख्याने बौद्ध स्थळे शोधण्यात आली. सर जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत भारतामध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागला.
सध्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग हे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत एक सरकारी आस्थापन आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे प्रमुख कार्य राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या प्राचीन स्मारकांचे तसेच पुरातत्वीय स्थळांचे आणि अवशेषांचे संवर्धन करणे हे आहे.[१]
महासंचालक[संपादन]
- १८६१ - १८८५ अलेक्झांडर कनिंघम
- १८८६ - १८८९ जेम्स बर्गस
- १९०२ - १९२८ सर जॉन मार्शल
- १९२८ - १९३१ हैरोल्ड हर्ग्रीव्स
- १९३१ - १९३५ राय बहादुर दया राम साहनी
- १९३५ - १९३७ जे.एफ.ब्लॅकिस्टन
- १९३७ - १९४४ राय बहादुर के.एन.दीक्षित
- १९४४ - १९४८ सर मॉर्टिमर व्हीलर
- १९४८ - १९५o एन.पी.चक्रवर्ती
- १९५० - १९५३ माधोस्वरूप वत्स
- १९५३ - १९६८ अमलानंद घोष
- १९६८ - १९७२ बी.बी.लाल
- १९७२ - १९७८ एम. एन. देशपांडे
- १९७८ - १९८१ बी. के. थापर
- १९८१ - १९८३ देबाला मित्रा
- १९८४ - १९८७ एम. एस. नागराज राव
- २०१४ - २०१७ राकेश तिवारी
- २०१७ - सध्याच्या महासंचालिका उषा शर्मा [२]
हे सुद्धा पहा[संपादन]
- पुरातत्त्वीय उत्खनन
- नाणेशास्त्र
- नाणेशास्त्र
- शिवराई
- होन
- डॉ. मधुकर ढवळीकर
- हसमुख धीरजलाल सांकलिया
- भारतीय नाणेशास्त्र शोधसंस्था, अंजनेरी, नाशिक