जैतापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जैतापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये वसलेले एक गाव आहे. जैतापूर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे जैतापुरच्या खाडीला काजवी नदीचा संगम होतो..[१].

इतिहास[संपादन]

जैतापूर हे प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील एक महत्त्वाचे बंदर होते.[२]

भूगोल[संपादन]

जैतापूर 16°35′N 73°21′E / 16.59°N 73.35°E / 16.59; 73.35 या अक्षांश-रेखांशावर वसलेले आहे. गावाची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची ८० मीटर आहे.

अणुऊर्जा प्रकल्प[संपादन]

न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बनवत असलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे जैतापूर प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. या अणुऊर्जा प्रकल्पाला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष निकोला सार्कोझी यांच्या डिसेंबर इ.स. २०१०मधील भेटी दरम्यान मंजुरी देण्यात आली. त्यासाठी करण्यात आलेल्या करारान्वये फ्रान्सच्या अरिवा या कंपनीला १६५० मेगावॅटांची एक याप्रमाणे एकूण ९९०० मेगावॅट क्षमतेपर्यंत नेणार्‍या ६ अणुभट्ट्या उभारून देण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रकल्पाची खरी जागा, जैतापूर शेजारील माडबन या गावात आहे, पण जैतापूरला बंदर असल्यामुळे प्रकल्पाला जैतापूरचे नाव देण्यात आले आहे.

हा प्रकल्प जर पूर्णपणे चालू झाला, तर ९९०० मेगावॅटांचा हा प्रकल्प जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प ठरेल आणि ९२०० मेगावॅटांच्या जपानमधील काशिवाझाकि-कारिवा अणुऊर्जा प्रकल्पालाही तो मागे टाकेल.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "विकिमॅपियावर जैतापुराचे स्थान दर्शवणारा नकाशा" (इंग्लिश मजकूर). 
  2. ^ हेबाळकर, शरद (इ.स. २००१). एन्शियंट इंडियन पोर्ट्स: विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र (इंग्लिश मजकूर). मुन्शीराम मनोहरलाल पब्लिशर्स. pp. १७५. आय.एस.बी.एन. 8121508584, 9788121508582 Check |isbn= value (सहाय्य). ३ डिसेंबर, इ.स. २०१० रोजी पाहिले.