Jump to content

दीपगृह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हर्णे बंदर येथील दीपगृह
उशुआया, अर्जेंटिना येथे जगाच्या शेवटी दीपगृह

समुद्र सफरी करणाऱ्या जहाजांचा भरवशाचा साथीदार म्हणजे दीपगृह. किनाऱ्यावरील जमीन, खडक यांची माहिती जहाजांना व्हावी हा दीपगृहांचा मुख्य उद्देश असतो.सुरुवातीच्या काळात उंच जागेवर लाकडाच्या जाळ्याचा किंवा पेटलेल्या कोळशाच्या राशीचा वापर करीत असत. किनारा कुठे आहे याचा अंदाज येणे, धोका दर्शवणे, एका बंदरातून दुसऱ्या बंदरात जाताना मार्गदर्शक, सुरक्षित मार्ग दाखविणे आणि बंदराची सीमा दाखविण्यासाठी दीपगृहांची उभारणी केलेली असते.[१]

इतिहास[संपादन]

पोर्तुगीज काळात मुंबई बंदर परिसरात एकही दीपगृह बांधल्याचे आढळत नाही. ब्रिटिशांच्या काळात मुंबई बंदराचा विकास करताना बंदरात येणाऱ्या जहाजांच्या सुरक्षितेसाठी दीपगृहांची निमिर्ती करण्यात आली.कुलाब्याच्या दिशेने मुंबई बंदरात प्रवेश करताना प्राँग्स रिफ, संक राॅक आणि डाॅल्फिन राॅक ही दीपगृहे बांधण्यात आली.आता प्राँग्स रिफ दीपगृह ऊर्फ कुलाब्याची दांडी कार्यान्वित आहे. हे कुलाब्यापासून २.५ किमीवर खोल समुद्रात आहे .हे दीपगृह इसवी सन १८७४ मध्ये बांधून पूर्ण झाले. आधी ह्या जागेवर इसवी सन १८४२ मध्ये लाइटशिप स्टेशन ऊर्फ दिवा असलेले जहाज होते.प्राँग्स रिफ दीपगृह चालू झाल्यानंतर कुलाब्याच्या दक्षिणेला आणि समुद्र किनाऱ्यावर असलेले कुलाबा सिग्नल स्टेशन बंद केले. थाॅमस आॅर्मीस्टोन यांच्या देखरेखीखाली बांधलेल्या ह्या दीपगृहाला सुमारे ६ लाख रुपये खर्च झाला होता.समुद्रात चाच्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तोफा असलेले हे मुंबईतील एकमेव दीपगृह आहे.हे दीपगृह बांधण्यासाठी दगडाचा वापर केलेला आहे.ह्याची उंची ४१ मीटर उंच आहे. दीपगृहाला लाल, पांढरा आणि काळा रंग दिलेला आहे. दीपगृहाचा प्रकाशझोत सुमारे ३० किलोमीटर अंतरावरून दृष्टीस पडतो.या दीपगृहात कर्मचारी चोवीस तास तैनात असतात.[२]

  1. ^ #महाराष्ट्र टाईम्स सोमवार १९ जुलै २०२१
  2. ^ # महाराष्ट्र टाईम्स सोमवार १९ जुलै २०२१