Jump to content

जरबेरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


जरबेरा

जरबेरा (Gerbera jamesonii) हे बिनवासाचे पण बहुवर्षायू फुलझाड असल्यामुळे त्याला सतत फुले येतात. हे फुलझाड “कटफ्लाॅवर” म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील नगर, नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अकोला या ठिकाणी याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.[]

हवामान आणि जमीन

[संपादन]

महाराष्ट्रातील उष्ण व कोरड्या आणि समशीतोष्ण हवामानात जरबेराचे पीक येते. या पिकासाठी ५०० ते ६१५ मिली पाऊस योग्य असतो. दिवसाचे १२ अंश ते २५ अंश से. तापमान, ५० ते ६० % आर्द्रता आणि रात्रीचे १२ अंश से. तापमान या पिकासाठी पूरक असते. चोपण मातीच्या, चुनखडीयुक्त आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत हे पीक चांगले येते. मध्यम खोलीची काळी व ५ ते ७.५ दरम्यान सामू असलेली जमीन या पिकाच्या लागवडीसाठी चांगली असते.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ फुलांचे व्यापारी उत्पादन भाग २. नाशिक: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ. २००१. pp. २०-२८.