जयंती (इंद्रकन्या)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिंदू पुराणांनुसार जयंती (संस्कृत: जयन्ती ;) ही वैवस्वत मन्वंतरातील पुरंदर नावाच्या इंद्राची कन्या होती. हिला जयंत नावाचा भाऊ होता. देवांचे विरोधक असणाऱ्या दैत्यांचा गुरू असलेला भृगुपुत्र शुक्राचार्य यांच्याशी हिचे लग्न झाले. शुक्राचार्यापासून हिला देवयानी ही कन्या झाली.[१] विष्णू पुराण, वायु पुराण आणि भागवत पुराण यांमध्ये दैत्यगुरू शुक्राचार्याला स्वतःकडे आकर्षून त्याच्या तपस्येत विघ्न आणण्याची जबाबदारी हिच्यावर इंद्राने सोपवल्याचे व तिने ती कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडल्याचे उल्लेख आढळतात. शुक्राचार्याची सेवा करून जयंतीने त्यांचे मन जिंकले. पुढे शिवाकडून ईप्सित वर मिळाल्यानंतर शुक्राचार्यांनी तिच्याशी विवाह करून गृहस्थाश्रम स्वीकारला.

स्कंद पुराणातील फरक[संपादन]

दक्षिण भारतात प्रचलित स्कंद पुराणात मात्र इंद्रकन्या आणि जयंताची बहीण म्हणून देवयानीचा उल्लेख होतो. स्कंद पुराणातील देवयानीचा विवाह कार्तिकेयाशी झाला.


पहा : प्रसिद्ध पुरुषांच्या बहिणी

संदर्भ[संपादन]

  1. ^ "जेनी.कॉम - जयंती" (इंग्रजी भाषेत). १२ जानेवारी, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)