शुक्राचार्य
Jump to navigation
Jump to search
हा लेख शुक्र नावाचा हिंदू पौराणिक ऋषी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, शुक्र (निःसंदिग्धीकरण).
शुक्र उशनस्, अर्थात शुक्राचार्य (अन्य नावे: उशनस काव्य) हा हिंदू पुराणांनुसार भृगूचा पुत्र व असुरांचा गुरू होता. ऋग्वेदातील उल्लेखांनुसार तो सूक्तद्रष्टा ऋषी होता. हिंदू फलज्योतिषानुसार शुक्र ग्रहाशी याचे ऐकात्म्य मानले जाते.
वैवस्वत मन्वंतरातील पुरंदर इंद्राची कन्या जयंती हिच्याशी शुक्राचार्यांचा विवाह झाला. त्यांच्यापासून जयंतीला देवयानी नामक कन्या झाली.
शुक्राचार्यांना संजीवनीविद्या प्राप्त असल्याने, असुरांचा राजा वृषपर्वा याने त्यांचे शिष्यत्व पत्करले व त्यांच्या त्या विद्येच्या आधाराने युद्धांत देवांचा वारंवार पराभव केला.