वैवस्वत मन्वंतर
Appearance
ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये (कल्पामध्ये) ४३२ कोटी सौरवर्षे(मानवी वर्षे) होतात.
- त्याच्या १ दिवसामध्ये चौदा मन्वंतरे होतात.
एका मन्वंतरामध्ये ७१ महायुगे होतात. प्रत्येक मन्वंतर संपल्यानंतर दुसरे सुरू होण्यापूर्वी मध्ये एका कृतयुगाएवढा(१७,२८,००० वर्षांचा) संधिकाल असतो.
- असे तेरा संधिकाल असून, नवीन कल्प सुरू होण्यापूर्वी असणारा एक चौदावा संधिकाल असतो.
सध्या चालू असलेल्या स्वेतवाराह कल्पामधली संधिकालांसह ६ मन्वंतरे होऊन गेली आहेत आणि ७वे वैवस्वत मन्वंतर चालू आहे.
- मन्वंतरातील २७ महायुगे पूर्ण होऊन २८वे महायुग चालू आहे.
या अठ्ठाविसाव्या महायुगातली कृत(=सत्य), त्रेता, द्वापार ही तीन युगे संपून सध्या कलियुग चालू आहे.
- इ.स.2023 सालापर्यंत कलियुगातली 5,124 वर्षे पूर्ण होऊन ५,१25वे वर्ष चालू आहे.
१४ मन्वंतरांची नावे
[संपादन]- स्वायंभुव
- स्वारोचिष
- उत्तम
- तामस
- रैवत
- चाक्षुष
- वैवस्वत (चालू मन्वंतर)
- सावर्णि
- दक्षसावर्णि
- ब्रह्मसावर्णि
- धर्मसावर्णि
- रुद्रसावर्णि
- रौच्य आणि * भौत्य.
(काही पंचांगांत रौच्य आणि भौत्य या नावांऐवजी देवसावर्णि आणि इंद्रसावर्णि अशी नावे दिलेली असतात.)