Jump to content

चिकुनगुनिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चिकनगुनिया या पानावरून पुनर्निर्देशित)

चिकुनगुनिया हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप (CHIKV)विषाणूंमुळे होतो. एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याद्वारे तो प्रसारित केला जातो. रोगाचे पहिले निदान १९५३ मध्ये टांझानिया येथे झाले.

चिकनगुनिया
हातावरील चिकनगुनिया
एडीस इजिप्ती डास

चिकनगुनियाची लक्षणं काय?

चिकनगुनिया हा तापाचा आजार आहे. ताप हा साधारण तीन ते चार दिवस असतो. ताप थंडी वाजून येऊ शकतो. सोबत डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ होणे, उलटी होणे, पुरळ येणे इत्यादी लक्षणं दिसू शकतात. पण तापासोबतचे मुख्य लक्षण म्हणजे सांधेदुखी. सांधेदुखी जोरदार असते. हातापायाचे छोटे आणि मोठे सगळेच सांधे दुखू शकतात. सांध्यांवर सूज सुद्धा येऊ शकते. हे दुखणं इतकं त्रासदायक असतं की पेशन्ट हवालदिल होतात. चिकनगुनिया ह्या आफ्रिकन शब्दाचा अर्थ (दुखण्याने)वाकून गेलेला असा होतो. ही सांधेदुखी काही दिवस असते व ताप कमी झाल्यावर हळूहळू कमी होते. पण काही पेशंट मध्ये ही सांधेदुखी बराच काळ टिकू शकते. डॉक्टरांच्या सल्याने औषध घेतल्याने ही सांधेदुखी बरी होण्यासारखी असते. चिकनगुनियाचं दुखणं हे तीव्र स्वरूपाचं असलं तरी ह्या आजारात जीवाला धोका होत नाही. डेंग्यूत ज्याप्रमाणे रक्तवाहिन्या पाझरून रक्तदाब (बीपी) कमी होउ शकतो किंवा इतर अवयवांवर परिणाम होऊ शकतो तसे गंभीर परिणाम चिकनगुनियात सहसा दिसत नाहीत. त्यामुळे घरी आराम करून इलाज करण्यासारखा हा आजार आहे. पण पण हे नेहमी लक्षात ठेवावं की तुम्हाला चिकनगुनिया वाटणारा आजार हा दुसरा ताप असण्याची शक्यता असू शकते. तापाचे बरेच आजार पहिल्या काही दिवसात सारखेच दिसतात. हिवताप(मलेरिया) किंवा टायफॉईडला विशिष्ट औषध द्यावे लागते. डेंगू मध्ये विशेष लक्ष ठेवावे लागते. त्यामुळे हे आजार नाहीतना ह्याची खात्री काही पेशन्ट मध्ये आपल्याला करून घ्यावी लागते. पुढील काही लक्षणं दिसल्यास आपण डॉक्टरांना लगेच भेटून तपासणी करून घ्यावी. धोक्याची लक्षणे ताप कमी न होणे किंवा वाढत जाणे चक्कर येणे पोटात खूप दुखणे वारंवार उलटी होणे नाकातून/तोंडातून/लघवी संडास वाटे रक्तस्त्राव होणे चक्कर येणे दम लागणे/धाप लागणे लघवी कमी होणे गुंगी येणे हातपाय थंड पडणे, बीपी कमी होणे लहान मुलांमध्ये मुल सारखे रडणे मुलांचे खाणे व पिणे कमी होणे इत्यादी लक्षणं दिसल्यास वेळ न दवडता डॉक्टरांना भेटावं. ही लक्षणं चिकनगुनियाची नसून गंभीर आजारांची असू शकतात.

चिकनगुनियाचे निदान

चिकनगुनिया साठी रक्ताची तपासणी आजाराच्या साधारणतः एक आठवड्यानंतर करतात. अँटिबॉडीची ही तपासणी चिकनगुनिया आहे की नाही हे सांगू शकते. ही तपासणी डॉक्टरांच्या निदानाला पूरक म्हणून करतात. इतर तापाच्या आजारांची शक्यता फेटाळून लावण्यासाठी डॉक्टर इतरही काही तपासण्या सांगू शकतात.

चिकनगुनियाचा उपचार इतर व्हायरल तापांप्रमाणेच चिकनगुनिया हा आपोआप बरा होणारा आजार आहे. ह्या व्हायरसच्या विरोधात कुठलेही औषध सध्या तरी आपल्याकडे नाही. त्यामुळे उपचार हा लक्षणं कमी करण्यासाठी दिला जातो. आराम करावा. दुखण्यासाठी व तापासाठी पॅरासीटामॉल व गरज पडल्यास वेदनाशामक औषधे घावी. भरपूर पाणी व पेये घ्यावीत. ताप गेल्यावरही दुखणे सुरू राहिल्यास डॉक्टरांना भेटावे. ही सांधेदुखी जवळपास सगळया पेशंट मध्ये ठीक होते. जर रक्तदाब, डायबेटिस , किडनीचे आजार किंवा हृदयविकार ह्यासारखे काही आजार असतील तर अधिक काळजी घेण्याची गरज असते. डास हा आपला राष्ट्रीय शत्रू आहे. आपल्या शेजारी राष्ट्रांपेक्षा जास्त नुकसान डास करतात. त्यामुळे डासांचा नायनाट करणं हे प्राधान्य आहे. वैयक्तिक पातळीवर आपल्या घरातील व परिसरातील डासांचा नायनाट करणे व स्वच्छता ठेवणे तसेच नगरपालिका/ ग्रामपंचायत पातळीवर प्रयत्न करून गावातील डासांचा नायनाट करणे आवश्यक आहे. डासांपासून वाचण्यासाठी मच्छरदाणी, हातपाय झाकणारे कपडे, डास दूर ठेवणाऱ्या क्रीम इत्यादींचा वापर करू शकतो.

इतिहास

[संपादन]

ह्या रोगचे वर्णन प्रथम मारॉन रॉबिन्सन आणि लुमस्कन केले होते. हे प्रथम टांझानियामध्ये पसरले होते.

कारणे

[संपादन]

हा रोग जेव्हा शरीरात येतो तेव्हा २ ते ४ दिवस लागतात पूर्ण शरीर भर पसरायला.या रोगाच्या लक्षणानुसार 39 डिग्री [102.2 एफ] पर्यंत त्याचा ज्वर,धड मग हात आणि पाय यावर तो त्याच ज्वरच वर्तुळ पूर्ण करतो. त्याव्यतिरिक्त डोके दुखी, अंधारी येणे, डोळ्यांची आग होणे,अश्या समस्या ही येतात.ज्वर सामान्यतः दोनपेक्षा अधिक दिवस राहतो. आणि अचानक समाप्त होते परंतु इतर लक्षण ज्यामध्ये अनिद्रा आणि निर्बलता देखील समाविष्ट होते. साधारणतः 5 ते 7 दिवस चालू शकते.हा रोग रुग्णांना शरीरात बराच काळ राहतो आणि त्यावर त्याचं जीवन अवलंबून आहे. मूळतः हा रोग उष्ण्काटाबंधातच्या भागात जास्त राहतो. आफ्रिका व आशिया जास्त आहे जिथे हा रोग एडिस प्रजातींचे मच्छर मानवांना पसरवत आहे.

लक्षणे

[संपादन]

ताप येणे, तसेच तोंड, पाठ, पोट येथे पुरळ उठणे ही चिकुनगुनियाची लक्षणे आहेत. या रोगाचा संसर्ग झाल्यास सांधे प्रचंड दुखतात. त्यामुळे रुग्णांना हालचाल करताना त्रास होतो, सांध्यांना सूज येते. रोग बरा झाला, तरी ही लक्षणे कमी होण्यास काही आठवडे लागतात. काही रुग्णांमध्ये दीर्घ संधिवाताची लक्षणे दिसतात. स्नायू, कंबर, डोके दुखणे, प्रकाशाकडे पाहताना त्रास होणे आदी लक्षणेही आहेत.

चिकनगुनियाची लक्षणे जरी डेंग्यूसारखी असली तरीही haemorragic feverची अवस्था मात्र या रोगात त्यात जवळजवळ कधीच दिसत नाही. त्यामुळे चिकुनगुनियामुळे सहसा मृत्यू ओढवत नाही.

उद्रेक

[संपादन]

भारतामध्ये या रोगाचा उद्रेक कुठे होतो त्याची यादी खालीलप्रमाणे

  • १९६३(कोलकाता),
  • १९६५(पॉंडीचेरी आणि चेन्नई,
  • आंध्र प्रदेशातील
  • राजामुंद्री
  • विशाखापट्टणम्
  • काकीनाडा, मध्य प्रदेशातील सागर
  • महाराष्ट्रातील नागपूर
  • १९७३(बार्शी,महाराष्ट्र).
  • २०२१ साली नासिक मध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे.