चर्चा:सात आसरा
हा लेख एकदा आपल्या नजरेखालून गेल्यास बरे असे वाटते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:४५, ६ ऑक्टोबर २०१७ (IST)
@माहितगार: आसरा या केवळ भूत नाहीत. त्या जलदेवताही आहेत. त्यामुळे शीर्षकात केवळ "भूत" असा शब्द योग्य वाटत नाही. अंधश्रद्धा वाढेल अशाने अशी भीती वाटते.आर्या जोशी (चर्चा)
- @V.narsikar: सुशिक्षीत मध्यमवर्गीयांपेक्षा जनसामान्यांमध्ये ह्या विषयाबद्दल विवीध प्रकारे श्रद्धा/अंधश्रद्धा अद्यापही शिल्लक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच वेळी 'आसरा' बद्द्ल संशोधनात्मक बरेच लेखनही झाले असावे. लेख चालू झालाच आहे तर अधिक संदर्भयूक्त करून वाढवावा आणि त्यानंतर अजून वेगळ्या पद्धतीने शीर्षकाचे नि:संदिग्धीकरण करता आल्यास पहावे.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:३०, ६ ऑक्टोबर २०१७ (IST)
शीर्षक पुर्नविचार
[संपादन]या लेखाचे शीर्षक काळाच्या ओघात पुर्नविचारात घेतले जाण्याची गरज असावी. 'सात आसरा' असाही एक शीर्षक पर्याय असू शकतो असे वाटते.
- सात अप्सरा व सप्तमातृका या एकच आहे काय हे पण तपासणे गरजेचे आहे असे वाटते.--V.narsikar (चर्चा) १४:१४, ६ ऑक्टोबर २०१७ (IST)
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:३३, ६ ऑक्टोबर २०१७ (IST)
- ग्रामीण भागात या विषयाचा पगडा अधिक आहे. तेथे जलाशये आहेत व त्यासंबंधी घटनापण/अफवा पण.शहरात हे काहीच शक्य नाही. तेथे जलाशये त्या मानाने कमी आहेत व मानणारी माणसेही कमी.
सात आसरा माझ्या मते आपल्या महाराष्ट्रातील प्रकार नव्हे. तो बंगाल/आसामकडून आलेला प्रकार आहे. (स्टोरी ऑफ सेव्हन सिस्टर्स) वगैरे.
आसराबद्दलच्या कथा/कहाण्या वाचनात आल्यात पण संशोधनत्मक एव्हाना काहीच वाचण्यात आले नाही. तपासायला हवे.
हा पण एक विचार मनात आहे कि, जलाशयापाशी कोणी अपवेळी/ रात्री जाऊ नये, तेथे कोणीच नसते. मदत लागली तर, सहसा कोणीही उपलब्ध रहात नाही.त्यापोटी बालकांना ही घातलेली अशा प्रकारची एक भीती आहे. भीतीने तरी तेथे कोणी बाल-बालके अपवेळी जाणार नाहीत व अपमृत्यू टळतील. त्या बालकास सांगीतलेली 'आसरा' बद्दलची कहाणी तो मोठा झाल्यावरही अनेकांना सांगतो व म्हणून त्या गोष्टी पसरत जातात, असे वाटते.
जेथे मंत्र-तंत्राचा, जादू-टोण्याचा पगडा अद्यापही आहे,अशिक्षितांची संख्या अधिक आहे, आदिवासीबहुल क्षेत्रात वगैरे या कहाण्या जास्त पसरल्या आहेत.यात कपोलकल्पित्व जास्त आहे.
अशीही शक्यता असू शकते कि, मंत्र-तंत्राच्या साधनेत कोणाची दखल होऊ नये म्हणून मांत्रिक लोकांनी यास बळ/पुष्टी दिली असावी.
असेही वाटते कि, १००% नव्हे पण काहीतरी % यात तथ्य असावे. पराचा कावळा करण्यात आला हे ठिक आहे पण, पर तर असते.भूत-प्रेत इत्यादी कमजोर मनवाल्यांच्या कहाण्या असतात असा माझा वैयक्तिक समज आहे.यात सायकॉलॉजी हा भाग असतो. एखादी व्यक्ति कोणत्या वातावरणात मोठी होते हे सर्व त्यावर अवलंबून आहे.
आसरा (जलदेवता) हा मथळा कसा राहिल? आसरा (अमानवी...) हा शब्द असलेला एखादा मथळा सुचतो का बघा. 'पिशाच्चयोनी' मराठी देव, देवी आणि देवता या लेखात देवी मथळ्याखाली सातीआसरा (सतीआसरा?) असा उल्लेख आहे.
यासमवेतच 'ज' यांचेही मत घ्यावे.ते योग्य राहिल असे वाटते. --V.narsikar (चर्चा) १३:५३, ६ ऑक्टोबर २०१७ (IST)
@ज:
ऐन्द्री, वाराही, चामुंडा, कौमारी, माहेश्वरी, वैष्णवी आणि ब्रह्माणी यांना सप्तमातृका (किंवा साती आसरा) म्हटले जाते. यांचा आणि तळ्यात राहणार्या आसराचा काही संबंध नसावा. साती आसरा या शाक्तपंथीय देवी आहेत.
ब्राम्ही माहेश्वरीचैव कौमारी वैष्णवी तथा।
वाराही च तथेंद्राणी चामुंडा: सप्तमातरः॥
सप्तमातृका मूळाच्या अनार्य देवता. कोकणात ह्यांनाच साती आसरा अथवा जलदेवता म्हणत असावेत. सृजनशक्तीची ही प्रतीके आहेत. यांतल्या ब्राह्मी, कौमारी, ऐन्द्राणी आणि वैष्णवी ह्या वैदिक अंश असलेल्या तर माहेश्वरी, वाराही, चामुंडा ह्या मूळच्या अवैदिक अर्थात अनार्य अंशाच्या. काही वेळा सात मातृकांबरोबरच आठवी नारसिंहीही दिसते.
सप्तमातृका ह्या नेहमी पट ह्या स्वरूपात दिसतात. म्हणजे सुरुवातीला वीरभद्र आणि शेवटी गणेश आणि मध्ये सात मातृका त्यांच्या बाळांसह. मातृका ओळखणे फार सोपे असते. मातृकांखालीच प्रत्येकीची वाहने कोरलेली असतात. पहा : देवांची वाहने
- जंचा संदेश
- @ V.narsikar ,@ माहितगार सात आसरा आणि सप्त मातृका यांचा परस्पर संबंध नाही असा उल्लेख देवीकोशात आहे तसेच पुरातत्वाचे ज्येष्ठ अभ्यासम डॉ. म.के. ढवळीकर यांच्याशीही भारत विद्येच्या एका उपक्रमात हा विषय बोलले आहे पूर्वी. त्यांनीही हेच मत नोंदविले आहे.आर्या जोशी (चर्चा)
- मराठी विकिपीडियावर मातृका आणि सप्तमातृका हे स्वतंत्र लेख आधीच दिसत आहेत. इंग्लंड आणि इतरही देशात जल देवता हा प्रकार आहे तेव्हा मला वाटते जलदेवता असाही स्वतंत्र लेख असावा. आणि सात आसरा लेखही स्वतंत्रपणे असू द्यावा.
- कोकणी विकिपीडियावरील gom:जलदेवता लेखात काही माहिती संदर्भा शिवाय दिसते आहे.
- या गूअल बुक्स वरील पुस्तकातील माहिती कोकणी विकिपीडियापेक्षा कदाचित वेगळी असावी.