चर्चा:यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इतरत्र सापडलेला मजकूर[संपादन]

योग्य बदल करुन या लेखात समाविष्ट करावा. -- अभय नातू (चर्चा) ०९:००, २८ ऑक्टोबर २०२२ (IST)[reply]


नाव- सागरेश्वर / यशवंतराव चव्हान अभयारण्य

ता-कडेगाव जिल्हा -सांगली


१०.८७ चौ. कि. मी. क्षेत्रफळ असलेले सागरेश्वर अभयारण्य हे(स्थापना-१९८५)पुणे विभाग महाराष्ट्रातील लहान अभयारण्यांपैकी एक आहे.कडेगाव,वाळवा,पलुस तालुक्यात विस्तार.

सातवाहन काळातील ५१ मंदीरांचा समुह आहे.कराड नजिक कृष्णा नदीच्या खोऱ्यात हे ठिकाण आहे. याठिकाणी सुमारे सात-आठशे वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या प्राचीन मंदिरांचा एक मोठा समूह आहे. त्यात अदमासे ५१ मंदिरं असून सागरेश्वर हे मुख्य मंदिर शंकराचे आहे. याशिवाय इतरही अन्य देवदेवतांची मंदिरे आहेत.

सागरेश्वराच्या या देवळापासून जवळच एक लहानसा घाट ओलांडला की अभयारण्य सुरू होते. या अभयारण्याचा विस्तार अवघा ५-६ चौ. कि. मी. इतकाच असला तरी हे अभयारण्य नैसर्गिक नसून मानवी प्रयत्नातून आकाराला आले आहे हे विशेष होय. एकीकडे माणूस स्वार्थापोटी क्रूर जंगलतोड करीत असल्याचं दिसत असताना दुसरीकडे परिश्रमपूर्वक जंगलाची लागवड करणारे मानवी हात पाहिले की अचंबा वाटते. या परिश्रमांमागे प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक व वृक्षमित्र श्री. धो. म. मोहिते यांचा मोठा पुढाकार आहे. त्यामुळेच उजाड माळरान असलेल्या या ठिकाणी अभयारण्य निर्माण झाले आहे.

सागरेश्वराच्या जंगलात श्वापदांची संख्या फारशी नसली तरीही येथील मृगविहारात सांबर, काळवीट भेर हे प्राणी संख्येने अधिक आहेत. याशिवाय तरस, लांडगे, कोल्हे, ससे, रानमांजरं आदि प्राणीही येथे दिसतात. अनेक भारतीय पक्षी या जंगलात सुखेनैव विहार करतात. मात्र मोरांची संख्या खूप अधिक आहे. वनसंपदाही उत्तम आहे. जवळपास ३०-४० प्रकारचे वृक्ष या जंगलात आढळतात.

[[वर्ग:महाराष्ट्रातील अभयारण्ये]] [[वर्ग:सांगली जिल्हा]]


अभय नातू (चर्चा) ०९:००, २८ ऑक्टोबर २०२२ (IST)[reply]