Jump to content

चर्चा:मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने/वगळलेली अविश्वकोशीय संपादने १

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठीच्या संवर्धन, प्रसार आणि विकासासाठी काही उपाययोजना

[संपादन]

कोणतीही भाषा (इथे मराठी) हि वैचारिक देवाणघेवाण करण्याचे साधन असते व त्यासाठी तीन प्रमुख अंगाचा (उपकरणांचा) उपयोग होतो.
कोणतीही भाषा (इथे मराठी) शिकण्यासाठी आणि शिकविण्यासाठी खालील तीन गोष्टींचे असणे गरजेचे असते.
(1) बोलणे/बोलावयास शिकणे (सर्वात आधी मनुष्य बोलावयास शिकतो ) त्यासाठी ज्याव्यक्तीस बोलावयाचे आहे किंवा बोलावयास शिकविणे आहे त्या व्यक्तीच्य़ा संपर्कात ती भाषा येणे आवश्यक बाब असते.त्याच्या संपर्कात ती भाषा येण्याचा सर्वांत सोपा मार्ग हा ती भाषा ऐकणे /ऐकविणे हा आहे.कानांवर शब्द आणि वाक्य पडल्या खेरीज त्यास (शिकणारा) त्या भाषेच्या स्वरांचा,लयीचा, शब्दांचा व वाक्यांच्या व्यवहारातील उपयोगाविषयी ज्ञान होऊ शकत नाही.
(2) लिहीणे (आधी आपण बाराखडी लिहायला शिकतो मगच वाचू शकतो)
(3) आधीच्या दोन गोष्टींची पूर्तता केल्यास तिसरी आपसुकच येते.ते म्हणजे वाचन करणे.

  • ज्या भाषेत रोजचे व्यवहार होतात तिचाच विकास ज्ञानार्जनासाठी आणि अर्थार्जनासाठी होऊ शकतो. हे सर्व होण्यासाठी खालील उपाय सूचविण्यात आले आहेत.

१. सर्वप्रथम मराठीत बोलायला शिका.(चूकांमधून शुद्धतेकडे वाटचाल)
२. त्यानंतर मराठीत लिहायला (संगणकावर देखील,इंग्रजी टंकलेखाद्वारे शुद्ध लिहायला शिका.) शिका.
३. ह्या दोन गोष्टी केल्या कि वाचायला येतच व चक्र पूर्ण होते.

शिक्षणव्यवस्था

[संपादन]
  • सद्यस्थिती
  • उपायात्मक योजना

- मराठीचा वापर शिक्षणात होण्यासाठी (ज्ञानार्जनासाठी)
१) मराठी शाळांची निर्मिती व आस्तित्वातील शाळांचे नूतनीकरणाच्या माध्यमातून सक्षमीकरण करणे.
२) मराठीतून अभ्यासक्रमांचे नियोजन, उच्च व व्यावसायिक शिक्षणात मराठीतून शिकण्याचा पर्याय निर्माण करून देणे.
३) मराठी शिक्षणात विशेष योगदानाबद्दल गौरव किंवा उल्लेखनीय कार्य करणार्यांचा गौरव करणे.
४) मराठी भाषेच्या साहित्य मंडळांची प्रत्येक जिल्ह्यात एक अशी कार्यालय स्थापन करणे.
५) ज्यामुळे नवसाहित्यीकांना आपले योगदान सादर करण्याची संधी मिळू शकेल.
६) मराठी शिक्षण संस्थांचा गौरव व शासकिय अनुदान.
७) मराठी भाषेच्या माहिती तंत्रज्ञानातील योगदानासाठी "मराठी कॉलसेंटर्स" चे व "मराठीतून ग्राहकसेवा" पूरविण्याचे अभ्यासक्रम निर्माण करणे.
८) सर्व व्यावसायिक अभ्यासक्रम मराठीतून केल्याने मराठीतून अनेक रोजगार निर्माण होतील.

पुणे रेल्वे स्थानक: फक्त हिंदी फलक
बंगळूर रेल्वे स्थानक: प्रथम कन्नड भाषेचा वापर

लोकभाषा/सार्वजनिक भाषा

[संपादन]
  • सद्यस्थिती- एक लोकभाषा म्हणून व सार्वजनिक ठिकाणी व्यवहाराची भाषा म्हणून मराठीचा वापर हळूहळू कमी होतांना दिसतो.मराठी भाषेवाचून कोणताही व्यवहार आडत नाही असे समाजात दिसून येते त्यामुळे मराठीचा वापर होत नसला तरी इतर सर्व सार्वजनिक व्यवहार सुरळीत होतांना दिसतात.मराठी लोकांना हिंदी बोलता येते किंवा मराठी लोक सहज हिंदी शिकतात असे दिसते,त्यामुळे इतर अमराठी भाषकांशी ते सहजपणे हिंदीत (किंवा वेळप्रसंगी इंग्रजीतही) व्यवहार करू शकतात असे समाजात होतांना दिसते,ह्यामुळे हिंदीत व्यवहार करण्याची एक अलिखीत (जे कायद्याने नाही.)धारणा निर्माण झाल्याचे चित्र मुंबई,पुण्यासारख्या मोठया महानगरांप्रमाणे इतर महानगरात व अगदी लहान खेड्यांत देखील पहावयास मिळते.
  • उपायात्मक योजना

राजकारण आणि शासन

[संपादन]
  • सद्यस्थिती- महाराष्ट्रातील राजकारणात आणि शासनात देखील मराठीविषयी उदासीनता दिसून येते.वाढत्या अमराठी पुढार्यांमुळे (मंत्री,कार्यकर्ते व उत्तरेतील पक्ष) हळूहळू राजकारणात हिंदी प्रवेश करत आहे.अगदी निवडणुकीच्या प्रचारसभा असो ,भाषण किंवा शपथविधी असो त्यात हिंदीचा वाढता वापर पहावयास मिळतो व मराठी भाषेला डावलले जाते.अनेक मराठी राजकारणी महाराष्ट्राच्या प्रचारसभेत देखील हिंदीत भाषण देतात.शासकिय कार्यालयात इंग्रजीचा वापर अधिक प्रमाणात पहावयास मिळतो जसे इंग्रजीतून नामफलक किंवा सूचना.मराठी भाषेच्या व्यवहाराविषयी कायदे असतांना राजकारणी मात्र त्याचे पालन करण्यात कमी पडतात असेच चित्र सध्या दिसते.ह्याच कारणामुळे मराठीच्या नावावरून राजकारण करणारे पक्ष महाराष्ट्रात स्थापन होण्यास वाव मिळतो किंवा मराठीची पोकळी भरून काढण्याच्या नावखाली अनेक राजकिय आंदोलनं निर्माण केली जातात.मराठी भाषेचे संवर्धन,कामकाजासाठी वापर व विकास ह्या सर्व बाबी शासनाच्या अखात्यारीतल्या आहेत परंतु त्यांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नसल्याने मराठी भाषा महाराष्ट्रात दुय्यम स्थानावर गेल्याचे दिसते.
  • उपायात्मक योजना

पाट्या,सार्वजनिक फलक आणि सूचना

[संपादन]
  • सद्यस्थिती - महाराष्ट्रात कायद्याने दुकानांच्या पाट्या किंवा फलक तसेच सूचना ह्या मराठीत असणे बंधनकारक आहे असा कायदा आहे.

परंतु आज मोठ्या महानगरांमध्ये ह्या कायद्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही.ह्याचे कारण कदाचित मराठीत पाटी नसल्याने किंवा असल्याने व्यवहारावर विशेष परिणाम होत नसावा असे असावे व वर नमूदकेल्याप्रमाणे मराठीचा सार्वजनिक वापर घटल्याने हिंदीत किंवा इंग्रजीत व्यवहाराचा पायंडा पडला असावा त्यामुळे बर्याचदा दुकानदार हिंदीत किंवा इंग्रजीत पाट्या लिहितांना दिसतात.तसेच राज्यशासनाच्या कायद्यानुसार सर्व सार्वजनिक फलक व शासकिय सूचना ह्या मराठीत असणे बंधनकारक असतांना इथेही आज हिंदी भाषेचे प्रभुत्त्व पहावयास मिळते.जसे केंद्र सरकारची कार्यालये विमानतळ,रेल्वेस्टेशन्स,बसस्थानकांवर इ.ठिकाणी व खासगी बसचालक किंवा वाहतूकसेवा प्रदानकर्ते मराठी ऐवजी हिंदी व इंग्रजीचा वापर करतांना दिसतात.ह्याचे उदाहरण म्हणुन उजवीकडे चित्र दर्शविण्यात आले आहे.

  • उपायात्मक योजना

चित्रपट,आकाशवाणी आणि मनोरंजन वाहिन्या

[संपादन]
  • सद्यस्थिती -महाराष्ट्राबाहेर इतर सर्व राज्यांत स्थानिक अस्मिता जपली जाते असे पहावयास मिळते.

१) दक्षिणेतील राज्यांत ज्ञानार्जनाचे चॅनल्स (वाहिन्या) जशा डिस्कव्हरी,हिस्ट्री,नॅशनल जिओग्राफिक इत्यादी ह्या त्यांच्या स्थानिक भाषेत प्रसारीत होतात हि सुविधा विविध डिटूएच कंपन्या देखील देतात.परंतु महाराष्ट्रात मात्र इतर उत्तर भारतातील राज्यांप्रमाणे ह्या सर्व वाहिन्या हिंदी/इंग्रजीतच प्रसारीत होतांना दिसतात .
२) दक्षिणेतील राज्यांत कार्टून्स चॅनल्स (वाहिन्या) जशा कार्टून नेटवर्क,निकलोडिअन,पोगो इत्यादी व स्थानिक लहान मुलांच्या स्वतंत्र वाहिन्या ह्या त्यांच्या स्थानिक भाषेत प्रसारीत होतात हि सुविधा विविध डिटूएच कंपन्या देखील देतात.परंतु महाराष्ट्रात मात्र इतर उत्तर भारतातील राज्यांप्रमाणे ह्या सर्व वाहिन्या हिंदी/इंग्रजीतच प्रसारीत होतांना दिसतात .
३) दक्षिणेकडे तसेच उत्तरपूर्वेकडील राज्यात स्थानिक भाषेत चित्रपटांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते व त्यांचे प्रदर्शनासाठी अनेक चित्रपटगृह राखीव असतात इतकेच नव्हे तर स्थानिक चित्रपटांना अधिक पसंती मिळत असल्याने त्यांचे चित्रपट कित्येकदा व्यावसायिक उच्चांक गाठतात. त्यामुळे नवनविन स्थानिक कलाकारांना रोजगाराच्या संधी निर्माण होतात.चित्रपट हा खूप मोठा व्यवसाय असल्याने त्यात निर्मितीपासून विपणनापर्यंत अनेक घटकांचा समावेश होतो व त्यात खूप मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज असते त्यायोगे स्थानिक भाषेचा प्रसारही होतो व त्यात्या भाषेतील कलाकारांना कला सादर करण्याचे हक्काचे व्यासपीठ मिळते.
४) दक्षिणेकडे तसेच उत्तरपूर्वेकडील राज्यात दूरदर्शन वाहिन्यांवर स्थानिक भाषेत जाहिरात करणे बंधन कारक असते आणि पहावयास मिळते,तसेच तेथील अनेक स्थानिक कंपन्या आपल्या वस्तूंच्या जाहिराती स्थानिक वाहिन्यांवरून स्थानिक चित्रपट कलाकारांना घेऊन करत असतात (उदा.जी जाहिरात हिंदीत हिंदी कलाकाराने केली असेल अगदी हुबेहुबपणे तीच जाहिरात तमिळनाडूमध्ये तमिळ कलाकार त्याच कंपनीसाठी करेल असे पहावयास मिळते ह्यात डबिंग न करता पुन:निर्मिती करतात.) त्याने जाहिरात उद्योगात देखील रोजगार उपलब्ध होतात. परंतु महाराष्ट्रात मात्र इतर उत्तर भारतातील राज्यांप्रमाणे सर्वच वाहिन्यांवरील जाहिराती बर्याचदा हिंदी/इंग्रजीतच प्रसारीत होतांना दिसतात व काहीवेळा मराठीत डबिंग केलेल्या असतात.

५) दक्षिणेकडे तसेच उत्तरपूर्वेकडील राज्यात खेळाच्या, चित्रपटांच्या ,संगीताच्या,मनोरंजनाच्या आणि बातम्यांच्या अशा अनेक स्थानिक भाषेतील वाहिन्या निर्माण झाल्याने त्यात खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झालेली दिसते ,त्यायोगे भाषेचा प्रसार आणि प्रचार होण्यास निश्चितच मदत होते असे दिसते.उदा.ज्यावेळी हिंदी स्टारप्लसवर कौन बनेगा करोडपती सादर होत असे त्याच दिवशी तेच केबीसी तमिळ भाषेत स्टार विजय ह्याच वाहिनीवर प्रसारीत होत असे जेणेकरुन तमिळ लोकांपर्यंत कार्यक्रम त्यांच्या भाषेत पोहोचेल.
६) दक्षिणेकडे तसेच उत्तरपूर्वेकडील राज्यात आकाशवाणीचे ए.एम.व एफ.एम.वाहिन्या अधिकाधीक प्रमाणात किंवा बर्याचदा संपूर्णपणे स्थानिक भाषेतीलच कार्यक्रम,गाणी व परिसंवाद इ. प्रसारीत करतांना दिसतात,इतकेच नव्हे तर स्थानिक चित्रपटांच्या गाण्यांचे अनेक खासगी एफ.एम.वाहिन्या निर्माण झाल्या आहेत असे पहावयास मिळते त्याउलट महाराष्ट्रात मात्र एफ.एम.वाहिन्यांवर हिंदी गाणी व चित्रपटसंगीतालाच प्राधान्य दिले जाते असे पहावयास मिळते.(उदा.बिग९२.७ एफ.एम हे भारतात (सर्वात मोठी एफ.एम.वाहिनी) सर्वच राज्यात कार्यरत आहे आणि त्यांचे मुख्य गाणे (टायटल सॉंगः बिगएफएम)हे मराठी सोडून इतर सर्व प्रमुख भाषांमध्ये निर्माण करण्यात आले आहे व ते त्या त्या राज्यात वाजविले जाते मात्र महाराष्ट्रात ते हिंदीतच वाजविले जाते असे दिसते.)
७) दक्षिणेकडे हॉलीवूडचे चित्रपट स्थानिक भाषेत प्रदर्शित करण्याचा प्रघात आहे,मात्र महाराष्ट्रात हॉलीवूडचे इंग्रजी चित्रपट सर्‍रासपणे हिंदीत(अब हिंदीमैं) असे प्रदर्शित होतात.उदा.कोणताही नविन हॉलिवूडचा चित्रपट सर्वप्रथम भारतात प्रदर्शित करतांना इंग्रजी सोबतच हिंदी (उत्तरेतील किंवा हिंदी समजणार्यां लोकांना समजावा ह्या हेतूने),तमिळमध्ये,तेलुगूमध्ये व मल्याळम मध्ये प्रदर्शित होतात.त्याने स्थानिक डबिंग आर्टिस्टला रोजगार उपलब्ध होतो व अनेकांपर्यंत चित्रपटाचा विषय व आशय पोहोचण्यास मदत होते.
८) वरील कारणांमुळे तमिळ ,तेलुगू,मल्याळम,कन्नड आणि बंगाली या प्रत्येक भाषातील सर्वच प्रकारच्या वाहिन्यांची (चॅनल्सची)संख्या मराठी भाषेतील वाहिन्यांपेक्षा अधिक आहे असे दिसते.
९) संदर्भ जाहिराती: उदाहरण दाखल काही जाहिराती.यूट्युब वर पहावयास मिळतील.

  • हिंदीत व्हिवेलच्यासाबण जाहिरातीत करीनाकपूरने काम केले आहे तर तेच तमिळमध्ये तृषाकृष्णन ने काम केले आहे.
  • हिंदीत कोकाकोलाच्या जाहिराती मध्ये हिंदीतले कलाकार आहेत तर तमिळमध्ये जोसेफ विजय किंवा तमिळ अभिनेते असतात .
  • हिंदीत कोकाकोलाच्या जाहिराती मध्ये हिंदीतले कलाकार आहेत तर तेलुगू,मल्याळम,कन्नड मध्ये स्थानिक अभिनेते असतात .
  • हिंदीत फेअर अँड लव्हली मेन्झ ऍक्टिव्ह मध्ये शाहरुख खान आहे तर तमिळमध्ये सुर्या शिवकुमार आहे.
  • हिंदीत सनफिस्ट बिस्किट्स मध्ये शाहरुख खान आहे तर तमिळमध्ये सुर्या शिवकुमार आहे.
  • हिंदीत क्लिनिक ऑल क्लिअर मध्ये बिपाशाबासू आहे तर तमिळमध्ये असिन आहे.
  • हिंदीत एअरटेलच्या जाहिरातीत शाहरुखखान असतो तर तमिळमध्ये आर.माधवन असतो.
  • हिंदीत एअरसेल च्या जाहिराती मध्ये एम.एस.ढोणी आहे तर तमिळमध्ये सुर्या शिवकुमार आहे.
  • हिंदीत टाटास्काय मध्ये आमीरखान आहे तर तमिळमध्ये फक्त असिनच असते.अशा अनेक जाहिराती आहेत ज्यात स्थानिक चेहर्यांना संधी दिली जाते. ईत्यादी.
  • उपायात्मक योजना

राज्यातील नोकर्या आणि उद्योगधंदे

[संपादन]
  • सद्यस्थिती
  • उपायात्मक योजना

-.मराठीचा वापर सार्वजनिक ठिकाणी होण्यासाठी (अर्थार्जनासाठी)

  • सर्व व्यावसायिक अभ्यासक्रम मराठीतून केल्याने मराठीतून अनेक रोजगार निर्माण होतील.
  • व्यावसायिकांना मराठीतून सेवा देणे बंधनकारक असावे.(लहानकंपन्यापासून- मल्टीनॅशनल पर्यंत सर्वांनाच)
  • नोकरीत मराठी भाषेचा अधिकाधिक उपयोग होण्यासाठी ,मराठीतून व्यवहाराचे ईमेल्स किंवा परिसंवाद,मराठी भाषा पंधरवडा असे दिवस साजरे करावे.
  • इंग्रजीतील सर्व व्यवहारांचे मराठीत अनुवाद करणारे अनुवादकर्ते निर्माण करण्यास/ होण्यास प्रोत्साहन द्यावे.त्याने रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. (उदा.स्टॉकमार्केट, फायनान्स, रिअल इस्टेट इत्यादी व्यवहार)

उपाययोजना/सूचना- संक्षिप्त स्वरूपात

[संपादन]

खालील गोष्टींचा आवर्जून वापर वाढविणे व त्यास प्रोत्साहन देणे