चर्चा:मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख मराठी भाषेच्या संवर्धनाबद्दल विविध माध्यमात होणार्‍या चर्चेचा आढावा घेण्याकरिता आहे. मराठी भाषकांमध्ये मराठी भाषेच्या संवर्धनाबद्दल जागृती निर्माण करणे ह्या हेतूने वेळोवेळी विविध व्यक्ती, संस्था, माध्यमे, आणि महाराष्ट्र शासन आवाहन करत असतात. या लेखात याबद्दल कृपया संदर्भासहितच लेखन करावे; स्वतःच्या वैयक्तिक मताचे प्रतिबिम्ब यात पडणार नाही याची दक्षता घ्यावी. स्वतःची मते आपण या लेखाच्या चर्चा पानावर मांडू शकता. आपल्या याबाबत काही सूचना असतील तर त्यासुद्धा चर्चापानावर नोंदवाव्यात. लेखाचे विश्वकोशीय स्वरूप जपण्यास सहकार्य करावे.

संदर्भांशिवायचे लेखन वगळले जाण्याची शक्यता ध्यानात घ्या.


खालील अनेक विभागांत मजकूर कोणी लिहिला आहे हे कळण्यास मार्ग नाही, तरी आपण येथे आपले मत दिल्यावर खाली सही करावी म्हणजे आपल्या विधानांना संदर्भ येण्यास थोडीशी मदत होते. ~~~~ असले लिहिले असता तुमचे सदस्यनाव व लिखाणाच्या वेळेची नोंद होते.

अभय नातू ००:५६, २५ मार्च २०१० (UTC)

चर्चेचा मूळ उगम[संपादन]

विशेषत: उत्तर भारतातील अप्रगत राज्यांमधून अनेक लोक स्थायिक झाल्यामुळे महाराष्ट्रातील मराठी बोलणार्‍यांचे प्रमाण कमी होत आहे. तसेच गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे व राज्यातील सोयीसुविधांवर ताण वाढत चालला आहे.

मराठी संवर्धन या लेखात "गुन्हेगारीचे प्रमान परप्रांतीयांमुळे वाढते आहे" लिहिणे योग्य वाटत नाही. त्यासाठी स्वतंत्र लेख लिहावा व तेथे ही माहिती हलवावी. जर परप्रांतीय मराठी भाषा शिकले तर ते गुन्हेगारी करणार नाहीत किंवा सोयीसुविधांवर ताण पाडणार नाहीत असे सुचवायचे असल्यास तसे लिहावे. शिवाय याच विषयावरील सर्व कात्रणेही हलवल्यास बरे होईल. - कोल्हापुरी

विकिपीडियावर या लेखाला जागा नसावी.[संपादन]

हा लेख कोणत्याही प्रकारची विश्वकोषीय माहिती देतो असे वाटत नाही. आपल्या भाषेविषयी जागृती निर्माण करणे हे विकिपीडियाचे उद्दिष्ट नाही. जर खरेपणाची पडताळणी केलेली मराठी भाषेबद्दलची आकडेवारी येथे दिली तर चालेल पण त्या लेखाचे नाव मराठीचे संवर्धन असे योग्य वाटणार नाही.

Hello,

1. I agree with the statement: मराठी संवर्धन या लेखात "गुन्हेगारीचे प्रमान परप्रांतीयांमुळे वाढते आहे" लिहिणे योग्य वाटत नाही. I can change/take that out. But I would like to have a wikipedia article/page to convey the message of empowerment of Marathi Language and culture.

What I wanted to say is: Due to no strict implementation of Marathi (like southern languages in southern states), it is easy to settle in the state. Due to that, migration is increasing and use of Marathi is at decline. Also there are other drawbacks of excessive migration.

2. I talked to Abhay Natu about this. He agreed to use wikipedia to the cause of promotion and empowerment of Marathi. Please see सदस्य चर्चा:अभय नातू २५ मराठीचे संवर्धन , सदस्य चर्चा:Heramb ८ Promotion of Marathi language.

3. Wikipedia's goal is to make knowledge free to all language users around the globe. Promote knowledge and languages. If Marathi is empowered and promoted (and popularized), more users will support Marathi Wikipedia.

हेरंब एम. १२:०७, २० डिसेंबर २००७ (UTC)

This article should be cleaned up to make sure that no unreferenced, uncited material exists. Also, it should be moved into 'wikipedia' page, rather than an article.
अभय नातू १५:०१, २० डिसेंबर २००७ (UTC)

मराठीचे संवर्धन[संपादन]

This article seems to be against something rather than for something as suggested in the title. If the author wants to discuss the crime then he also highligh the contributions for non marathi speaking people.

उत्तर भारतातील अप्रगत राज्यांमधून - statements like this should be avoided. Article looks like a hatred propoganda rather than promotion of marathi.

Maihudon ०६:४८, २१ डिसेंबर २००७ (UTC)


मराठीचे संवर्धन लेखातील बदल व उत्तरे[संपादन]

नमस्ते,

इंग्रजीमध्ये विचार मांडत आहे त्याबद्दल क्षमा असावी. पण खालील मुद्यांचा विचार व्हावा असे मला वाटते.

1. I have taken out all points against "परप्रांतीय" from this article as it is totally related to "मराठीचे संवर्धन". But for मराठीचे संवर्धन, I think it is vital if परप्रांतीय learn Marathi in Mah. I don't think it is against something now. If all disagree, you are free to delete the references in लोकभाषा section.
2. I do not want this article to be against anyone/any community. I have removed all statements about immigration. But the in-migration from N. India is a fact. Pl. see http://www.maharashtra.gov.in/english/ecoSurvey/ecoSurvey2005-06/eng/cha_3e.pdf, [Out of the 32.32 lakh in-migrants from other states, large number of in-migrants were from Uttar Pradesh (28.5 per cent)]
3. Section 4. "४ मराठीच्या संवर्धनासाठी आवाहन: आपण काय करु शकता?" has all the suggestions for "मराठीचे संवर्धन". I encourage you to go through it.
4. The statistics has been taken from English Wikipedia and I have tried to give references whereever possible.
5. The news screen shots have been used as the proof/reference of the points. So I think it is better to keep.
6. Abhay, can you explain what do you exactly mean by "it should be moved into 'wikipedia' page, rather than an article"
7. By मराठीचे संवर्धन, I not only mean just the empowerment and promotion of the language, but of culture and people as well (in broader sense). It includes wikipedia and all Marathi related activities. No language can be empowered unless people are empowered. And I think for this, we can use Wikipedia.
8. My genuine intention is to spread the word about Empowerment of Marathi, Marathi Wikipedia, Marathi people and culture.
9. Those of you who ever travelled to S. India like Bangalore, Chennai must have observed that there is very strict implementation of state language. So people feel the need to learn it. This is not true about Marathi. It is the responsibility of we Marathi people to empower our language.
e.g. All signboards have to be in state language (includes IT comps and Central Govt Establishments, Railways and other jobs have employees from the same state, FM channels air local songs, Most theatres show local movies (even in cosmo cities like bangalore), Automated telephones have first message in state language etc.
10. With all this, I hand it over to the Admins, the fate of this article. I would be happy if the word about Marathi is spread among all my Marathi brothers and sisters all over the world. Wikipedia is a nice boost to Marathi. Thanks all for the support. I conclude by the last verse of Dnyaneshwari "पुढती पुढती पुढती । इया ग्रंथपुण्यसंपत्ती । सर्वसुखीं सर्वभूतीं । संपूर्ण होईजो"

धन्यवाद.
हेरंब एम. १४:१७, २१ डिसेंबर २००७ (UTC)

Abhay, can you explain what do you exactly mean by "it should be moved into 'wikipedia' page, rather than an article"
By moving it to a wikipedia article, it is not represented as a knowledge page, rather a 'support' page or a point-of-view page.
अभय नातू १७:२६, २१ डिसेंबर २००७ (UTC)


मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने[संपादन]

नमस्कार!

Thanks for changing the category of this article from "delete| अवैश्वकोषीय मजकूर" to "बदल करण्याजोगे लेख".

I am trying to give references wherever it is possible in ( ) below:
1. संस्कृत भाषेपासून उगम पावलेली १३०० वर्षांपेक्षा जुनी भाषा. (http://en.wikipedia.org/wiki/Marathi_language, Marathi is estimated to be over 1300 years old,[11])
2. भारतात ४था व जगात १५वा क्रमांक[ संदर्भ हवा ]. (Marathi is the 4th most spoken language in India[9] and the 15th most spoken language in world[5].)
3. एक लोकभाषा म्हणून व सार्वजनिक ठिकाणी व्यवहाराची भाषा म्हणून मराठीचा वापर हळुहळु कमी होत आहे[ संदर्भ हवा ]. मराठी लोक सहजपणे हिंदी बोलतात, त्यामुळे मराठी भाषा येत नसेल तरीही महाराष्ट्रात व्यवहार करणे अत्यंत सोपे आहे[ संदर्भ हवा ]. मराठीवाचून कोणाचेही काही अडत नाही[ संदर्भ हवा ]. (This is obvious as Cities are becoming Cosmo. In Mumbai, Hindi is more prevalent, due to immigration. Also, see http://www.maharashtra.gov.in/english/ecoSurvey/ecoSurvey2005-06/eng/cha_3e.pdf, [Out of the 32.32 lakh in-migrants from other states, large number of in-migrants were from Uttar Pradesh (28.5 per cent)])
4. परप्रांतीयांनी मराठी शिकण्यासाठी आपणही महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरला पहिजे[ संदर्भ हवा ]. Arun Sadhoo, अध्यक्ष, Marathi sahitya sammelan: http://esakal.com/esakal/02032007/8324694075.htm. Also this is logical.
5. दक्षिण भारताप्रमाणे महाराष्ट्रातही फलकांवर मराठीचा वापर झाला पहिजे[ संदर्भ हवा ]. (In article, I have put two pictures: पुणे रेल्वे स्थानक: फक्त हिंदी फलक, बंगळूर रेल्वे स्थानक: प्रथम कन्नड भाषेचा वापर. These are the actual photographs taken by me. Anyone can visit any Railway Station in Mah and see Marathi is not used. This is not the case in south.)
6. साडे माडे तीन, डोंबिवली फास्ट, अगं बाई अरेच्चा, शुभमंगल सावधान यांसारखे अनेक दर्जेदार चित्रपट मराठीमध्ये आज निर्माण होत आहेत[ संदर्भ हवा ]. तरीदेखील महाराष्ट्रात अनेक चित्रपटांना थिएटर मिळत नाहीत[ संदर्भ हवा ]. मराठीपेक्षा इतर भाषांना जास्त महत्त्व दिले जाते[ संदर्भ हवा ]. थिएटर मिळाले तरी प्राईम टाईम मिळविण्यास अवघड जाते[ संदर्भ हवा ]. दक्षिण भारतात बंगळुरसारख्या शहरात स्थानिक चित्रपटांनाच प्राधान्य दिले जाते[ संदर्भ हवा ]. याबाबत मराठी भाषकांनी व शासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे[ संदर्भ हवा ]. (In article, I have added news screen shot from मटा. Dec 2007)
7. तसेच अनेक एफ. एम. वाहिन्यांवर फक्त हिंदी गाणीच लावली जातात[ संदर्भ हवा ]. मराठी गाणी प्रसारित केली जात नाहीत[ संदर्भ हवा ]. This is the fact. Anyone can tune in FM channel in Mah and observe that most Hindi songs are aired. In South, Local language songs are aired as well.
8. महाराष्ट्रात अनेक नोकर्‍यांमध्ये मराठी माणसाला प्राधान्य दिले जात नाही[ संदर्भ हवा ]. (See news screen shot मराठी माणसांना नोकर्‍यांमध्ये डावलले जाते. Also, anyone can go to any railway stations in Mah and most of the staffers are non-mah.)
9. ==मराठीच्या संवर्धनासाठी मराठी लोक काय करू शकतात?== [ संदर्भ हवा ]. This is an appeal to all Marathi people. Just like: "मराठी भाषाप्रेमींनी ह्या उपक्रमाला हातभार लावल्यास विकिपीडिया लवकरच प्रगती करेल." on front page of Mar wikipedia.


हेरंब एम. ११:३८, २३ डिसेंबर २००७ (UTC)

अयोग्य व्यासपीठ[संपादन]

माझ्या मते विकिपीडिया मराठी संवर्धन चळवळीसाठी व्यासपीठ बनणे अयोग्य आहे. यासाठी सदस्यांकडून कौल घेऊन मगच यापुढील बदल घेण्यात यावेत. जर बहुमत या लेखाकडून मिळाले तर हे प्रयत्न चालू ठेवण्यास हरकत नाही. --- कोल्हापुरी ०९:०४, २६ डिसेंबर २००७ (UTC)

चळवळ नको, फक्त एक लेख/हातभार (सपोर्ट) पान हवे[संपादन]

नमस्कार कोल्हापुरी, कृपया विकिपीडिया:कौल, १० कौल:मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने हा लेख विकिपीडियावर असावा काय? पाहा.

धन्यवाद.

हेरंब एम. ०८:२४, २७ डिसेंबर २००७ (UTC)

साधी गोष्ट[संपादन]

"मराठीचे संवर्धनाबद्दलची आवाहने" लेख वाचला,भावना पोहोचल्या वेदना पोहोचल्या.ह्या सगळ्यावर माझे मतः

मराठीचा इतका मोठा विषय करण्याची /बाऊ करण्याची अजिबातच गरज मला वाटत नाही.मराठीच काय किंवा कोणतीही भाषा काय तिला वाढविण्याचा सर्वांत सोपा आणि विनाखर्चीक मार्ग म्हणजे तिचा दैनंदिन जीवनात अधिकाधिक उपयोग करणे आणि हे करणे सर्वांत आधी मराठी माणसांचे काम आहे आणि त्यांनी आधी मराठी शिकणे गरजेचे आहे,कित्येक मराठी लोकांना माहितही नसते एखाद्या गोष्टीस मराठीत काय म्हणतात?जर त्यांच्यात तोंडात ती भाषा नसेल तर ती कोणाच्याच कानावर पडणार नाही म्हणजे इतरांनी शिकणे अशक्यच.
मराठी विषयी जागरूकता वाढविणे म्हणजे खूप मोठे आंदोलन किंवा चळवळ वगैरे असले शब्द प्रयोग वापरून काहीच साध्य होणार नाही. त्यापेक्षा सर्वकाही सूरळीत आहे अशा भावना ठेऊन उगाचच दूसर्याला मराठी समजत नसावी असला गोड गैरसमज दूर् सारून कोणत्याही ठिकाणी ,प्रसंगी मराठीत बोलून पहावे.इंग्रजीत असे म्हणतात "Be the change you want to see in the world." तुम्हाला इतरांनी मराठीत बोलावे लिहावे असे मनापासून वाटत असेल तर आधी तुम्ही ते करत आहात का? हा प्रश्न विचारा आणि कामाला लागा. झाले इतकी साधी गोष्ट आहे ही.

तमिळ भाषेत वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण[संपादन]

तमिळ भाषेत वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण (वृत्त: दै० डेक्कन क्रॉनिकल, २० फेब्रु० २०१०)

तमिळ भाषेचे संवर्धन करणे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण स्वतःच्या मातृभाषेत सुलभतेने शिकणे शक्य व्हावे या हेतुने तमिळनाडू राज्यशासनाने व्यावसायिक अभ्यासक्रम तमिळ भाषेत उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे.


या बाबतीत जपानसारख्या देशांचा दाखला देऊन “कुठलाही विषय स्वतःच्या मातृभाषेत शिकल्यास तो सहजच अधिक चांगला समजतो” असे मत व्यक्त केले गेले.

अर्थात हे तत्त्व भारत वगळता जगातील इतर सर्वच देशातील शिक्षणतज्ज्ञांच्या मताला धरूनच आहे.

कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील बी०ए०, एम०ए० साठीचे जवळ-जवळ सर्वच अभ्यासक्रम स्थानिक भाषेच्या माध्यमातून तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश अशा राज्यांत आधीपासूनच उपलब्ध आहेत.

श्री० राममोहन खानापूरकर यांनी पाठवलेली दैनिक ’डेक्कन क्रॉनिकल’ मधील मूळ इंग्रजी बातमी अशी आहे: Medical, B.E. courses in Tamil Deccan Chronicle, February 20th, 2010

  • वरील गोष्ट उदाहरण म्हणून देत आहे..कि भाषेच्या संवर्धनासाठी इतर प्रांतात (विशेषत:दक्षिणेत)काय काय केले जाते ,महाराष्ट्रातील लोक मात्र मराठीबाबत तितकेसे जागरूक नाहीत. मराठी भाषेत बोलणे (परप्रांतातील लोकांसमोर) किंवा शिकणे (शहरातील मंडळी) अडाणीपणाचे लक्षण समजतात ,Prasannakumar ०६:१७, १४ मार्च २०१० (UTC)

अधिक माहिती[संपादन]

लेखक मित्रहो आपण वारंवार दक्षिणेचा उल्लेख केला आहे तसाच मी देखील केला आहे परंतु एकट्या दक्षिणेत नव्हे तर सर्वच हिंदी न बोलणार्या राज्यात त्यांच्या स्थानिक भाषेची आणि संस्कृतीची छाप जाणवतेच विशेषतः पूर्वेकडील राज्ये ह्या बाबतीत अधिकच कडवे आहेत. मागे साप्ताहिक सकाळ च्या एका अंकात मी बंगाल बद्दल वाचले होते ते असे. बंगाली लोकांबद्दल स्थानिक लोक असे म्हणतात कि ज्या माणसाला बंगाली खाद्य (विशेषतः मासे),बंगाली संगीत आणि बंगाली पुस्तकं साहित्याची आवड नसते तो बंगाली नाहीच म्हणजेच सर्वसाधारण बंगाली माणसाला ह्य सर्व गोष्टींची आवड असतेच इतकेच नव्हे तर बंगाली माणसं जेवढी बंगाली पुस्तकांवर पैसे खर्च करतात तेवढी भारतात इतर कोणत्याही भाषेतील पुस्तके विकली जात नाहीत हे देखील त्याच अंकात वाचण्यात आले.मराठीपेक्षा कमी लोकसंख्या असलेले मल्याळम,पंजाबी आणि गुजराथी भाषकांत देखील त्यांच्या भाषेतील वृत्तपत्र अधिक लोकप्रिय आहेत आणि त्यांची वाचक संख्या मराठी वृत्तपत्रांपेक्षाही अधिक आहे. http://en.wikipedia.org/wiki/List_of_newspapers_in_India_by_circulation

तेलुगूमधील सहीविणा पगारवाढ रोखली[संपादन]

लोकसत्तेत २० डिसेंबर २००९ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या ’एकच अमोघ उपाय – मराठी+एकजूट’ या लेखात केलेल्या आवाहनाला मराठीप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला. पत्राद्वारे व ई-मेलद्वारे अनेक मराठी+एकजुटीचे पाईक आपली विविध मते, अनुभव मांडले आहेत व सूचनाही कळवीत आहेत. त्यापैकीच एक सुरस पत्र ’मराठी+एकजूट’ उपक्रमाने आमच्याकडे प्रसिद्धीस पाठवले, ते सोबत टाचले आहे.


पत्रात एका वयोवृद्ध (वयवर्षे ८६) पण मनाने तरूण अशा आपल्या अतूट मराठीप्रेमी ज्येष्ठ मित्रवर्यांच्या पत्रातील हा एक महत्त्वाचा उतारा:

“परप्रांतीय भाषेचे उदाहरण देतो. माझा भाचा हैद्राबादेत पाटबंधारे खात्यात कामाला आहे. त्याने मस्टरवर ’तेलुगू’ भाषेत सही करावी यासाठी त्याचे १ वर्ष increment थांबविले. तर त्याने त्याची ’तेलुगू’ सही १ महिनाभर घोटली व दप्तरात ’तेलुगू’त सही केली. (त्यानंतरच) त्याचे increment सुरू झाले. यावरून (महाराष्ट्र राज्य) शासनाने हा प्रश्न धसास लावला तर हा प्रश्न सोपा होईल असे वाटते. आपल्या भाषेवरील सडेतोड लेखनाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन ! कळावे.” असे अनेक बळजबरीने राज्यभाषा लादण्याचे प्रयत्न इतर राज्यांत बिनबोभाट चालू असतात. त्या राज्यांत कॉंग्रेसचे राज्य असो, कम्युनिस्टांचे असो, भाजपचे असो वा इतर पक्षांचे. पण त्यांच्या अशा स्वभाषाभिमानात व राज्यभाषा राज्यभर सक्तीने लादण्याच्या धोरणाखाली चाललेल्या नवनवीन प्रयत्नांत कसलाही खंड पडत नाही. त्यांना कोणीही संकुचित, देशद्रोही, फुटीरतावादी म्हणायला धजत नाही. तसे म्हटले तर न बोलता धीटपणे राज्यशासनाने करण्यासारखे खूप आहे; अगदी इतर राज्यांप्रमाणे टोकाची भूमिका न घेतासुद्धा ! पण इतर सर्व राज्यभाषांना असणारे घटनादत्त व कायदेशीर किमान अधिकारही मराठीला अंमलात आणायचे अधिकार नाहीत असा आज अलिखित नियमच झाला आहे.

इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात राज्यभाषा शाळांत, न्यायालयांत, शासनसंबंधित पत्रव्यवहारात, विधानसभेत, विविध शासकीय विभागांत, टॅक्सीचालक किंवा इतर परवान्यांसाठी, अनुदानासाठी, शासकीय मदतीसाठी, करार-दस्त व इतर कायदेशीर कागदपत्रांसाठी, विविध फॉर्म्ससाठी, जनसंपर्कासाठी, व अशा इतर शेकडो-हजारो क्षेत्रांमध्ये इतर राज्यांप्रमाणे अनिवार्य होऊ शकत नाही.

बंगाल, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र व इतर राज्यांतील मंडळी अनेक दृष्टींनी स्वभाषा व स्वसंस्कृतीच्या बाबतीत अतिरेकी पद्धतीने वागत असले तरी त्यांना संकुचित, देशद्रोही, फुटिरतावादी असे कोणी म्हणत नाही कारण त्या विषयांत तेथिल सर्व जनता व सर्वच राजकीय पक्ष एकाच सुरात ते अभिमानगीत गातात. राज्य कॉंग्रेसचे आहे, की कम्युनिस्टांचे, किंवा भाजपचे वा एखाद्या राज्यस्तरीय पक्षाचे. त्यांच्या स्वाभिमानी वृत्तीत खंड पडत नाही.

मात्र मराठी माणसाला भाषाभिमानाचा अधिकारच नाही असे इतरांनी (व आपल्यापैकी बर्‍याच जणांनीसुद्धा) परस्पर ठरवून टाकले आहे. त्यामुळे इतर राज्ये अगदी सहजच योजित असलेले उपाय योजून मराठी माणसाने स्वाभिमान व्यक्त करण्याचा जरादेखील प्रयत्न केला तर त्याच्यावर केवळ परकीयच नव्हे तर त्यांच्याबरोबरीने आपले तथाकथित विशालहृदयी स्वकीयसुद्धा गिधाडासारखे तुटून पडतात. स्वतंत्र भारतात होणारा असा भेदभाव भारतावरील इंग्रजांच्या परकीय राजवटीत कधीतरी एखाद्या विशिष्ट समाजावर झाला असेल असे काय याबद्दल शंका वाटते. अर्थात हा सर्व आपणच आपणहून आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे.

आणखी काय लिहावे? मन सुन्न होऊन जाते नि बोलायला शब्द सुचत नाहीत. इतर सर्व भाषक आपल्या भाषेची आपल्या स्वतःच्या राज्यात जोपासना, संवर्धन, प्रसार करीत असताना आपले शासन, आपले नेते व आपण मात्र स्वाभिमानाच्या अभावामुळे व स्वभाषेबद्दलच्या औदासिन्यामुळे आपल्या मायबोलीला व मातृसंस्कृतीला अशीच पिचून लयाला नेणार का?

अर्थात इतरांनी गाय मारली म्हणून आपण वासरू मारावे असे आमचे म्हणणे नाहीच. पण इतरांनी राजरोस अतिरेक केला तरी त्याबद्दल सर्व तथाकथित उच्चभ्रू मंडळी मूग गिळून गप्प बसतात व मराठी माणसाने आपले कायदेशीर हक्क बजावायचा प्रयत्न केला तरी त्याच्यावर संकुचितपणाचा व फुटिरतावादाचा आरोप करून त्याला नामोहराम करून टाकतात ह्याकडे आम्हाला सर्वांचेच व विशेषतः स्वतः मराठी माणसाचे लक्ष वेधून घ्यायचे आहे. अशा पक्षपाती लोकांच्या मतांच्या आहारी जाऊन त्यांच्याकडे आपण आपला स्वाभिमान गहाण ठेवण्यात काहीच अर्थ नाही. म्हणूनच आपण एकमेकांचे दोष काढत आपापसात भांडत बसण्यापेक्षा मराठी भाषा, मराठी संस्कृती व मराठी माणसापुढील इतर सर्वच आव्हान क्षेत्रांच्या (challenge areas) बाबतीत एकजूट करून स्वाभिमानपूर्वक व निश्चयाने मराठी माणसाची सर्वच आघाड्यांवर अधिकाधिक प्रगती साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अर्थात अशी एकी साधण्यासाठी केवळ आपले धर्म, जात, पंथच नव्हे तर आपल्या राजकीय निष्ठांनाही आपल्याला बाजूला ठेऊन केवळ मायबोलीच्या हितासाठी एकत्र आले पाहिजे.

वर उल्लेखलेल्या पत्राची छानणीकृत प्रत सोबत टाचली आहे, ती खालील दुव्यावरून अवश्य वाचावी.

बाह्य दूवा[संपादन]

http://www.petitiononline.com/19652007/petition.html माझ्या पहाणीतील एक दूवा ,एकदा अवश्य वाचावा.

  • ह्या चर्चेबाहेरचे परंतु एक वेगळीच माहिती आपल्यासाठी = सर्वांनी अवश्य वाचावी अशी.

भारतेंदू हरिश्चंद्र (आधुनिक हिंदी साहित्याचे जनक)(साहित्य हरिश्चंद्र ),1885 ह्या विद्वान साहित्यीकाने आपल्या मातृभाषेविषयी काय म्हटले आहे ते अवश्य वाचावे.अधिक माहितीकरिता इंग्रजी विकिपीडीयावर भारतेंदू हरिश्चंद्र ह्या लेखाचा शोध घ्यावा. The following two rhyming couplets are taken from his famous poem, मातृ-भाषा के प्रति (For the Sake of Mother-Tongue or Towards Mother-Tongue). The poem has ten couplets in total. The poet asserts the importance of using mother tongue as a medium of instruction – conversational and educational.

   निज भाषा उन्नति अहै, सब उन्नति को मूल ।
बिन निज भाषा-ज्ञान के, मिटत न हिय को सूल ।।
विविध कला शिक्षा अमित, ज्ञान अनेक प्रकार।
सब देसन से लै करहू, भाषा माहि प्रचार ।।
Translation:
Progress is made in one's own language (the mother tongue), as it the foundation of all progress.
Without the knowledge of the mother tongue, there is no cure for the pain of heart.
Many arts and education infinite, knowledge of various kinds.
Should be taken from all countries, but propagated in own mother tongue.

ह्या लेखाचा अधिक सकारात्मक विस्तार व्हावा[संपादन]

इथे दिलेला लेख जरी अविश्वकोशीय वगैरे असला तरी सध्या एक विषय म्हणून त्याचे सकारात्मक विस्तारणे आवश्यक वाटते. त्यातील नकारात्मक मजकूर कमी करून अगदीच एका ओळीत लिहिला असता लेख मुळमुद्याकडे वळेल असे दिसते. मराठीची सद्यस्थिती ठिक नाही किंवा अन्याय होतो अशा आशयाचा जास्त उल्लेख आढळतो तेव्हा त्या ऐवजी सक्षमीकरणाकडे भर कसा देता येईल किंवा तत्संबंधी मुद्दे कसे उचलून धरता येतील हे पहावे.जाणकारांनी लक्ष घातल्यास नक्कीच सुंदर लेख निर्माण होण्यास संधी आहे.क.लो.अ. Pra.K. ०९:३१, २४ मार्च २०१० (UTC)

असे झाले पाहिजे, लोकांनी असे केले पाहिजे असे लिहिण्यापेक्षा असे आहे, असे असते अशी भाषा (शक्य तेथे संदर्भांसहित) वापरल्यास सकारात्मक दृष्टिकोन येण्यास मदत येईल. वानगीदाखल मी एक छोटा बदल केला आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते?
अभय नातू ००:५३, २५ मार्च २०१० (UTC)