Jump to content

चर्चा:बुद्धिवाद

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तत्त्वज्ञान
विकिपीडिया:विकिप्रकल्प तत्त्वज्ञान हा लेख विकिपीडिया:विकिप्रकल्प तत्त्वज्ञान आणि/अथवा तर्कशास्त्र प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात मोडतो , या प्रकल्पाचा उद्देश विकिपीडियामधील तत्त्वज्ञान सबंधीत विवीध विषय तसेच तर्कशास्त्र, इत्यादी विषयाशी संबधीत लेखांचा आवाका सुधारावा असा आहे. या प्रकल्पात सहभागी होण्याच्या दृष्टीने, कृपया विकिपीडिया:विकिप्रकल्प तत्त्वज्ञान आणि विकिपीडिया:तर्कशास्त्र प्रकल्प पानांना भेट द्या.
??? ह्या लेखास

दर्जापातळी चे मुल्यांकन अद्याप झालेले नाही .

परिचय परिच्छेद

[संपादन]

@श्रीनिवास हेमाडे:

खालील परिचय परिच्छेदाचे पुर्नरचना करणे शक्य होऊ शकेल का

सध्याचा परिचय परिच्छेद खालील प्रमाणे आहे:

"आपल्याला जगाचे होणारे ज्ञान मुख्यतः आपल्या ज्ञानेंद्रियानी होते, इंद्रियानुभव हे ज्ञानाचे आवश्यक साधन असले तरीही ते पुरेसे नाही; माणसाकडे आणखी एक साधन आहे ते म्हणजे त्याची बुद्धी. बुद्धीनेच सत्यज्ञान प्राप्त होते, बुद्धी हाच ज्ञानाचा एकमेव मार्ग आहे, असा सिद्धान्त मांडणारी विचारसरणी म्हणजे 'बुद्धिवाद' होय. जे तत्त्ववेत्ते बुद्धिवाद स्वीकारतात ते बुद्धिवादी (Rationalist) मानले जातात."


परिचय परिच्छेदाची सुरवात, "बुद्धीनेच सत्यज्ञान प्राप्त होते, बुद्धी हाच ज्ञानाचा एकमेव मार्ग आहे, असा सिद्धान्त मांडणारी विचारसरणी म्हणजे 'बुद्धिवाद' होय. जे तत्त्ववेत्ते बुद्धिवाद स्वीकारतात ते बुद्धिवादी (Rationalist) मानले जातात." या वाक्याने करून उर्वरीत लेखाच्या अनुषंगाने पुढील दुसऱ्या ओळीचे पुर्नलेखन करता येईल का ते पहावे असे वाटते. "मानवाला जगाचे होणारे ज्ञान मुख्यतः त्याच्या ज्ञानेंद्रियानीं होते, इंद्रियानुभव हे ज्ञानाचे आवश्यक साधन असले तरीही ते पुरेसे नाही; माणसाकडे आणखी एक साधन आहे ते म्हणजे त्याची बुद्धी."

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:२०, २० ऑगस्ट २०१५ (IST)[reply]

@माहितगार:

असा बदल करणे ठीक राहील, फार अर्थहानी होत नाही. बदल सुचविल्याबद्दल धन्यवाद. फक्त 'आपल्याला' हा शब्द मी तसाच ठेवला आहे. 'मानवाला' असा केला नाही. ते संबोधन परके वाटेल. आधीच लोकांना जाणून घेण्यात रस नसतो. 'मानवाला' म्हणण्याने जास्त त्रयस्थ वाटेल. तेवढे असू द्यावे, 'आपलेपणा' वाटेल, तेवढी मुभा आपण घेवू. ही व्यवहार्य विनंती

'ज'ंची प्रश्नचिन्हे १

[संपादन]

@ आणि श्रीनिवास हेमाडे:

'बुद्धी' हा Reason या इंग्लीश शब्दाचे मराठी भाषांतर म्हणून आपण मान्य करतो(?); मात्र ते फारसे योग्य नाही, असे मत महाराष्ट्रातील विवेकवादी तत्त्ववेत्ते दि. य. देशपांडे यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, इंग्लिशमधील intellect, intelligence आणि reason या तिन्ही शब्दांचे मराठी भाषांतर 'बुद्धी' असे केले जाते(?) पण मुळात या तिन्ही इंग्लीश शब्दांचे अर्थ भिन्न आहेत. 'बुद्धी' या शब्दातून ते तीन भिन्न अर्थ व्यक्त होऊ शकत नाहीत. बुद्धी (intelligence) ही शक्ती सर्व प्राण्यात थोड्याफार प्रमाणात असते आणि म्हणून ती मानवाप्राण्यातही आहेच. पण पशुपक्ष्यांच्या ठिकाणी intellect आणि reason आहे, असे आपण म्हणत नाही. Intellect आणि Reason हे दोन्ही शब्द स्थूलमानाने समानार्थी शब्द आहेत. त्यांनी बुद्धीची श्रेष्ठ दर्जाची शक्ती व्यक्त होते. त्यामुळे या शब्दांना 'बुद्धी' हा पर्याय न वापरता 'प्रज्ञा' हा मराठी शब्द वापरावा, असे ते सुचवितात. पशुपक्ष्यांच्या ठिकाणी 'बुद्धी' आहे, पण त्यांच्या ठिकाणी 'प्रज्ञा' आहे, असे आपण म्हणत नाही.

या उपरोक्त परिच्छेदाच्या वाचनावरून दि. य. देशपांडे यांची विशीष्ट मते उधृत केली आहेत असे दिसते, दि. य. देशपांडे त्यांच्या व्यक्तीगत मतांना प्रश्न चिन्ह लावल्यास विकिपीडियावर उत्तर देण्यास दि. य. देशपांडे येऊ शकणार नाहीत. त्यामुळे प्रश्नचिन्हांच्या लावण्याची आवश्यकता तपासली जावयास हवी असे वाटते. कुठे बोध होत नसल्यास चर्चा पानावर चर्चा करून पुर्नलेखन करावे असे वाटते.
परिच्छेद ओळीत मत दि.य. देशपांडेंचे आहे हे चटकन लक्षात न आल्याने सदस्य:ज यांचा वाचनात गोंधळ होतो आहे का ? तसे असेल तर वाक्याची सुरवात "महाराष्ट्रातील विवेकवादी तत्त्ववेत्ते दि. य. देशपांडे यांच्या मते 'बुद्धी' हा Reason या इंग्लीश शब्दाचे मराठी भाषांतर म्हणून आपण मान्य करतो; पण तसे करणे फारसे योग्य नाही. दि. य. देशपांडे यांच्या मते, इंग्लिशमधील intellect, intelligence आणि reason या तिन्ही शब्दांचे मराठी भाषांतर 'बुद्धी' असे केले जाते, पण मुळात या तिन्ही इंग्लीश शब्दांचे अर्थ भिन्न आहेत. 'बुद्धी' या शब्दातून ते तीन भिन्न अर्थ व्यक्त होऊ शकत नाहीत. बुद्धी (intelligence) ही शक्ती सर्व प्राण्यात थोड्याफार प्रमाणात असते आणि म्हणून ती मानवाप्राण्यातही आहेच. पण पशुपक्ष्यांच्या ठिकाणी intellect आणि reason आहे, असे आपण म्हणत नाही. Intellect आणि Reason हे दोन्ही शब्द स्थूलमानाने समानार्थी शब्द आहेत. त्यांनी बुद्धीची श्रेष्ठ दर्जाची शक्ती व्यक्त होते. त्यामुळे या शब्दांना 'बुद्धी' हा पर्याय न वापरता 'प्रज्ञा' हा मराठी शब्द वापरावा, असे ते सुचवितात. पशुपक्ष्यांच्या ठिकाणी 'बुद्धी' आहे, पण त्यांच्या ठिकाणी 'प्रज्ञा' आहे, असे आपण म्हणत नाही.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:३५, २० ऑगस्ट २०१५ (IST)[reply]

@: प्रतिसादाबद्दल धन्यवाद. प्रश्न चिन्ह लावल्यास चर्चा करण्याची जबाबदारी आपल्याचकडे येते, यात शंका नाही. तरीही तूर्तास प्रश्न चिन्ह लावण्यास हरकत नाही. अन्य कुणी तज्ज्ञ चर्चेत येईपर्यंत ते असू द्यावे. पण दि.यं.चे मत नाकारता येत नाही. त्यांनी मराठीत तत्त्वज्ञानात एक नवी विचारप्रवाह सुरु केला आहे. तो चर्चिला जाणे गरजेचा आहे. पण तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात अद्यापि तो सुदिन उगवेलेला नाही. या निमिताने तो उगवेल, अशी आशा आहे. नंतर हवे तर योग्य ते बदल करावेत, असे वाटते.

'ज'ंची प्रश्नचिन्ह २

[संपादन]

@ आणि श्रीनिवास हेमाडे:

'बुद्धी' या शब्दासाठी प्रज्ञा, विवेक आणि बुद्धिप्रामाण्य(?) असे शब्द मराठीत वापरले जातात, म्हणून प्रज्ञावादास विवेकवाद, बुद्धिप्रामाण्यवाद असेही नाव आहे.

उपरोक्त ओळीत 'ज'ंचे प्रश्न चिन्ह बुद्धिप्रामाण्य(?) या एकाच शब्दापुरते मर्यादीत आहे का ? प्रज्ञा आणि विवेक या शब्दांसाठी सुद्धा आहे ?
इन एनी केस या वाक्यास संदर्भ ओळीतच नोंदवला गेल्यास प्रश्न मिटेल असे माझे व्यक्तीगत मत आहे. पण 'ज" आणि 'श्रीनिवास' यांची आपापसातील चर्चा हा मुद्दा अधिक व्यवस्थीतपणे सोडवू शकतील असे वाटते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:४२, २० ऑगस्ट २०१५ (IST)[reply]

विच् म्हणजे निवड की भेद  ?

[संपादन]

@ आणि श्रीनिवास हेमाडे:

सदस्य:श्रीनिवास हेमाडी यांच्या लेखनातील वाक्य, "विच् म्हणजे निवड करणे." असे होते ते सदस्य:'ज'ंनी "विच् म्हणजे भेद करणे." असे बदलले आहे. या बाबत दोघांकडूनही अधिक संदर्भ आणि माहिती मिळू शकेल्यास बरे पडेल असे वाटते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:४७, २० ऑगस्ट २०१५ (IST)[reply]


बुद्धी, वगैरे

[संपादन]

इंग्लिशमधील intellect, intelligence आणि reason या तिन्ही शब्दांचे मराठी भाषांतर 'बुद्धी' असे केले जाते असे दि.य. देशपांडे यांना वाटत असेल, पण तसे वाटणे उचित नाही.. मराठीच्या अनुक्रमे बुद्धी, बुद्धिमत्ता आणि तर्कबुद्धी या तीन स्वतंत्र शब्दांसाठीचे ते इंग्रजी प्रतिशब्द आहेत.

बुद्धी आणि प्रज्ञा एक नाहीत. बुद्धी म्हणजे intellect, आणि प्रज्ञा म्हणजे Wisdom. बुद्धी म्हणजे बुद्धिप्रामाण्य नाही. असे म्हणणे म्हणजे Cup =Cupboard असे म्हणणे आहे. बुद्धिप्रामाण्य म्हणजे Rationality, बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे Rationalism.

विवेक या मराठी शब्दाला इंग्रजीत Discretion हा प्रतिशब्द आहे.

विच्‌ (विनक्ति विङ्‌क्ते) हा संस्कृतमधील ७ व्या गणाचा धातू आहे. अर्थ अलग अलग करणे, भेद करणे. स्थूलार्थाने निवड करणे हा याचा अर्थ होऊ शकेल. वि+चि (चिनोति-चिनुते) हा वेगळा धातू आहे. विवेक हा शब्द त्या धातूपासून झाला, विच्‌ पासून नाही.

विचार हा शब्द संस्कृतमधील वि+चर्‌ या धातूपासून निघाला.

पहा - संस्कृत शब्दकोश : [१] .... (चर्चा) १६:०५, २० ऑगस्ट २०१५ (IST)[reply]

१. एक बदल केला आहे. तो कृपया संदर्भ म्हणून संस्कारित करावा. मला ते कसे करावे, हे अद्यापि माहित नाही. २. पहिली तीन प्रतिपादने लक्षात घेता एक गोष्ट कृपया लक्षात घ्यावी, ही विनंती. ती अशी : इथे केवळ शब्दांचे भाषांतर करावयाचे नाही तर संकल्पनांचे रूपांतरण करावयाचे आहे. त्यामुळे मूळ मजकुरातील भाषांतरे तत्त्वज्ञानाच्या अन्वयार्थाने केली आहेत. ३. मी करीत असलेली अनुभववाद व बुद्धिवाद ही संपादने अद्यापि अपूर्ण आहेत. तुमचे मुद्दे त्या न लिहिलेल्या भागात स्पर्शिली आहेत. थोडी वाट पहावी, ही विनंती. ४. विच्‌ (विनक्ति विङ्‌क्ते), हे बघून सांगतो.

मदतीबद्दल आभार. चर्चा चालू ठेवूच.

रेगे यांचे मत ही नोंदवावे लागेल.