चर्चा:नाताळ
@संदेश हिवाळे: या लेखाला मुखप्रुष्ठ सदर करायचे असल्यास एकत्र काम करुया जेणेकरून कमी वेळात अधिक काम होईल. अधिक काम तुम्ही केल्याचे दिसत आहे. काम चांगलेच आहे तथापि भर घालायला सहाय्य करते. आपण अनमान करून घेवू नका ही विनंती. आर्या जोशी (चर्चा)
- धन्यवाद, तुमचे स्वागत आहे. तुम्ही या लेखाच्या विस्तारास व सौंदर्यीकरणास मला साहाय्य करताय ही तर आनंदाची बातमी आहे.
- --संदेश हिवाळेचर्चा १७:०१, १२ नोव्हेंबर २०१७ (IST)
- अनमान ?, अपमान/अवमान म्हणायचे आहे का तुम्हाला? जर असेल तर तुम्ही मदत करीत आहात यात मी अपमान वाटून घेण्याचे कारण नाही.
- --संदेश हिवाळेचर्चा १७:०९, १२ नोव्हेंबर २०१७ (IST)
@संदेश हिवाळे: @अभय नातू: नमस्कार! हा लेख अद्ययावत करण्याच प्रयत्न केला आहे. इंगजी विकी वर यासंबंधी पुष्कळ वेगवेगळे लेख सापडले पण ते खूपच सविस्तर आहेत. या लेखांमधील महत्वाचा आशय सारांशरूपाने येथे जोडण्याचा प्रयत्न आहे. मुखपृष्ठावर हा लेख घेता यावा.संदेश यांनी त्या त्या परिच्छेदात आवश्यक ती अधिक छायाचित्रे घातली तर छानच होईल.आर्या जोशी (चर्चा)
- नक्कीच. सध्या माझी परीक्षा सुरू आहे वेळ मिळेल तसे सहकार्य करतो.
- --संदेश हिवाळेचर्चा १९:०१, १३ नोव्हेंबर २०१७ (IST)
- @संदेश हिवाळे: @अभय नातू: @आर्या जोशी: @ज: सद्या एक महिना आपण हा लेख सर्व मिळून पूर्ण करूया. दिसेम्बर १५ पासून आपण त्याला मुखपृष्ठवर प्रसिद्ध करूया. ते वेळ क्रिसमस सिझन सुद्धा आहे. सध्या काही परीक्षेत आहे यामुळे हा शेड्युल बरोबर असेल असे वाटते. --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:१०, १३ नोव्हेंबर २०१७ (IST)
@Tiven2240: हरकत नाही. तुमचे प्राधान्य अभ्यास असावे हेच सध्या योग्य आहे.आर्या जोशी (चर्चा)
माहिती
[संपादन]६,७,१९ असे नाताळ साजरा केले जाते?. याची माहिती दुरुस्त करा करण त्या दिवशी एपिफनी साजरा केला जाते. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:०४, १ डिसेंबर २०१७ (IST)
- @आर्या जोशी आणि Tiven2240: या लेखात येथे मजकूर पेस्ट केलेला दिसत आहे कृपया तपासावा ही विनंती प्रसाद साळवे (चर्चा) २२:५४, २ जून २०१८ (IST)
@प्रसाद साळवे: मजकूर विकिपीडिया वरून बातम्या संकेतस्थळावर गेल्याचे दिसत आहे. लेखात मजकूर १ डिसेंबर पूर्वी उपलब्ध आहे व संकेतस्थळावर २३ डिसेंबर ला तो टाकला गेला --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २३:५१, २ जून २०१८ (IST)
- धन्यवाद टायविन.. शंका समाधान झाले. प्रसाद साळवे (चर्चा) ०७:५५, ३ जून २०१८ (IST)
- @Tiven2240:,
- मराठी विकिपीडियावरुन इतर संकेतस्थळांवर मजकूर कॉपी केला गेला तर त्यांनी मराठी विकिपीडियाला श्रेय देणे अपेक्षित आहे. असे न केल्यास कॉपी करणाऱ्या पत्रकाराचे अज्ञान किंवा बेदरकारी दिसते.
- असे आढळल्यास आणि शक्य असल्यास त्या संकेतस्थळांवर नोंद करावी. या शिवाय अशा लेखांच्या चर्चा पानावर दुव्यासह नोंदत करावी.
- वरील प्रक्रिया/प्रोसिजर आपल्या धोरणांमध्ये घातली जावी.
- स्वतःच्या संकेतस्थळावर, विशेषतः मोठ्या संख्येने वाचक असलेल्या संकेतस्थळावर श्रेय न देता विकिपीडियावरुन उचलेगिरी करणे ही जरी ही पत्रकाराची चूक असली तरी मराठी विकिसमाजासाठी ती अभिमानाची बाब आहे.
- अभय नातू (चर्चा) २१:१५, ४ जून २०१८ (IST)
@Tiven2240:,
या लेखात ठळक मजकूर आहे तो कृपया तपासावा. मला त्याची येथे गरज वाटत नाही.--वि. नरसीकर , (चर्चा) २१:११, १६ सप्टेंबर २०१८ (IST)
- २५ डिसेंबर : नाताळ (क्रिसमस)
वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ज्या एका अनमोल सुवर्णक्षणासाठी इस्राएली जनता आतुरतेने थांबलेली होती. तो क्षण शेवटी जवळ आला. देवाने ......
मी या मजकूराबद्दल म्हणत आहे.ते आधीच्या संदेशात नमूद करावयाचे राहिले.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:०२, १७ सप्टेंबर २०१८ (IST)