एपिफनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एपिफनी हा एक ख्रिश्चन सण आहे. या दिवशी येशू ख्रिस्त यांनी देव म्हणून अवतार घेतल्याचे साजरे केले जाते. याची पारंपारिक तारीख ६ जानेवारी आहे. १९७० पासून काही देशांमध्ये १ जानेवारीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी हा सण साजरा केला जातो. जुलियन दिनदर्शिका वापरणारे चर्च हा सण १९ जानेवारी रोजी साजरा करतात. जुलियन आणि ग्रेगरीय दिनदर्शिकांमधील सध्याच्या १३ दिवसांच्या फरकांमुळे ही तारीख निवडली गेली आहे..