Jump to content

चर्चा:तिरुपती बालाजी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@अभय नातू आणि सुबोध कुलकर्णी: या लेखाचे नाव तिरुपती बालाजी असे करायला हवे असे वाटते. बालाजी हे दैवत प्रामुख्याने तिरुमला पर्वतशिखरावर असून त्या स्थानामुळे देवता नाव अधिक प्रसिद्ध झाले आहे. बालाजीची मंदिरे अन्यत्रही आहेत, पण प्रमुख मंदिर येथे आहे. तसेच लेखात स्वतंत्र विभाग करून भारतातील अन्य मंदिरे असा भाग घालता येईल. दैवत हे स्थानाच्या नावामुळे अधिक प्रसिद्ध असणे या ठिकाणी अनुभवाला येते. मार्गदर्शन व्हावे. धन्यवाद आर्या जोशी (चर्चा) ११:१७, ७ मे २०१८ (IST)[reply]

इतरत्र सापडलेला मजकूर

[संपादन]

एक प्रसिद्ध हिंदू आणि वैष्णव दक्षिण भारतातील मंदिर आहे. .तिरुमला पर्वतरांगा ह्या शेषाचलम पर्वतरांगांचा एक भाग आहे.

जगातील सर्वात श्रीमंत धार्मिक स्थळांपैकी एक मानले जाते.वैष्णव परंपरेनुसार हे मंदिर १०८ दिव्य देशम मधील एक आहे.

आंध्र प्रदेशातील तिरुपतीपासून २२ किमी अंतरावर असलेल्या तिरुमला टेकड्यांवर भगवान वेंकटेश्वर बालाजीचे एक विशाल मंदिर आहे.

दक्षिण भारतातील तिरुमला येथील तिरुपती बालाजीचे मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. तिरुपती बालाजी हे मुख्य मंदिर आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात तिरुपतीच्या शेषाचलम डोंगरावर वेंकटाद्रीच्या सातव्या शिखरावर आहे.[]दरवर्षी लाखो भाविक येथे येतात. समुद्रसपाटीपासून ३२०० फूट उंचीवर असलेले तिरुमला टेकड्यांवर बांधलेले श्री वेंकटेश्वर मंदिर सर्वात मोठे आकर्षण आहे.

अनेक शतकांपूर्वी बांधलेले हे मंदिर दक्षिण भारतीय द्राविडी शैली वास्तुकलेचे आणि कलाकुसरचे अप्रतिम उदाहरण आहे.

तिरुपती शहर हे आंध्र प्रदेश राज्याच्या दक्षिण टोकावर चित्तूर जिल्ह्यात आहे. हे ठिकाण राजधानी हैदराबादपासून ७४० किंमी अंतरावर आहे.

येथून ३६ किमी अंतरावर श्री कालाहस्ती नावाचे दक्षिणेतील प्रसिद्ध शिवक्षेत्र आहे.

तिरुपती शब्दाचा अर्थ तिरु म्हणजे श्री (Shri). श्रीपती म्हणजे तिरुपती (विष्णू).शहरापासून जवळच असलेल्या डोंगरावर बालाजीचे मंदिर आहे. या डोंगरास तिरुमला असे म्हणतात. तेलुगूतमिळ भाषेत मला/मलई म्हणजे डोंगर/पर्वत होय.बालाजी हा विष्णूचा अवतार मानला जातो. हे ठिकाण रेल्वे व महामार्गाने चेन्नईबंगळूर या शहरांशी उत्तम प्रकारे जोडलेले आहे.[]

सप्तगिरी

[संपादन]
  • भगवान वेंकटेश्वर किंवा बालाजी हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. असे मानले जाते की भगवान विष्णू काही काळ स्वामी पुष्करणी नावाच्या तलावाच्या काठावर राहिले. हा तलाव तिरुमलाजवळ आहे. तिरुमला तिरुपतीच्या सभोवतालच्या टेकड्यांना आदिशेषनागाच्या सात फण्यासदृश डोंगर आहेत. त्यांना 'सप्तगिरी' म्हणतात. वेंकटेश्वराचे हे मंदिर सप्तगिरीच्या सातव्या टेकडीवर आहे, वेंकटाद्री नावानेही ही टेकडी प्रसिद्ध आहे. हे.संगम साहित्य हे तमिळ भाषेच्या प्रारंभीच्या साहित्यांपैकी एक आहे. त्यात तिरुपतीला तिरुवेंकटतन (Thiruvengadadan) असे म्हटले आहे. श्री स्वामी पुष्करणी मंदिर हे पवित्र जलकुंडाच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर वसलेले आहे. हे मंदिर इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात द्राविडी पद्धतीने बांधलेले आहे
  • तिरुमला पर्वतरांगा ह्या शेषाचलम पर्वतरांगांचा एक भाग आहे. ह्या पर्वतरांगा समुद्रसपाटीपासून ८५३ मीटर उंचावर आहेत. ह्या पर्वतरांगेची सात शिखरे ही आदिशेषाची सातिशीरे आहेत असे लोक म्हणतात. शेषाद्री, नीलाद्री, गरुडाद्री, अंजनाद्री, वृषभाद्री, नारायणाद्री व वेंकटाद्री अशी ह्या सात शिखरांची नावे आहेत. हे देऊळ वेंकटाद्री ह्या शिखरावर आहे. म्हणूनच ह्या देवळाला ‘सातव्या शिखरावरचे मंदिर असे म्हटले जाते.[][]
  • गरुड टेकडीवर, नैसर्गिक दगडापासून ही मूर्ती घडली. शास्त्रे-पुराणे, स्थळे, माहात्म्ये, स्तोत्रे, कहाण्या, लक्ष्मीकृपा यांत सर्वच ठिकाणी बालाजी देवाचा उल्लेख आहे.
  • दुसऱ्या निरीक्षणानुसार, ११ व्या शतकात संत रामानुज तिरुपतीच्या या सातव्या टेकडीवर चढले. श्रीनिवास (व्यंकटेश्वराचे दुसरे नाव) त्याच्यासमोर हजर झाले आणि त्याने रामानुजांना आशीर्वाद दिला. असे मानले जाते की परमेश्वराचा आशीर्वाद घेतल्यानंतर ते वयाची १२० वर्षे जगले .
  • वैकुंठ एकादशीनिमित्त लोक येथे भगवानांचे दर्शन घेण्यासाठी येतात. तिथे आल्यानंतर त्यांचे सर्व पाप धुऊन जातात. येथे आलेल्याला जन्म-मृत्यूच्या बंधनांतून मुक्ती मिळते, असा विश्वास आहे..
यांच्यासह मूर्ती वेंकटेश्वर श्रीदेवी , भूदेवी

मूर्तीचे वर्णन

[संपादन]

वेंकटेश्वराची मूर्ती काळ्या दगडाची (शाळिग्रामची) असून चतुर्भुज (चार हाताच्या) विष्णूचे रूप आहे. खालचा उजवा हात वरमुद्रेत तर डावा हात कमरेवर आहे. तो गोल पद्मासनावर उभा आहे. लक्ष्मीदेवी (श्रीदेवी) डाव्या बाजूला तर पद्मावतीदेवी (भूदेवी) उजव्या बाजूला उभी असते. मूर्तीला पूर्ण विधिवत स्नान (अभिषेक) करून नंतर सफेद लाल रंगाचे रामानंदी तिलक वा ऊर्ध्व पुंड्र लावतात. वेंकटेश्वराच्या मूर्तीच्या हनुवटीला चंदनाचा वा शुद्ध कापराचा लेप लावतात. साडी धोती नेसवतात.

मौल्यवान्य हिऱ्याच्या किरीट मुकुटासह सर्व दागिने व कानात रत्नजडित सोनाचे दागिने घालतात. छातीवर भूदेवीची व आणि श्रीदेवीची सोन्याची प्रतीमा असते. वरचे दोन हात खांद्यावर आहेत, ते सुदर्शन चक्र आणि पांचजन्य शंख ठेवण्यासाठी कोरलेले आहेत; व्यंकटेश्वराला विविध रंगांचेया पुष्पहार तसेच तुळशीहार घातले जातात,

पद्मावतीदेवीच्या मूर्तीला दुधाचा व चंदनाचा अभिषेक करून, नंतर मौल्यवान हिऱ्याचा किरीट मुकुट, सुवर्णरत्नांचे दागिने, साडी, विविध रंगांची पुष्पे व पद्महार घालतात.

वेंकटेश्वराच्यामूर्तीच्या छातीवर उजव्या बाजूला त्रिकोणी आकाराचे चिन्ह असते. ते भृगु ऋषींचे पादचिन्ह आहे.

  • वेंकटेश्वर स्वामीच्या म्हणजेच बालाजीच्या मूर्तीचा जो पाठीमागचा भाग आहे तो नेहेमी पाण्याने ओला असतो. ह्या मूर्तीकडे लक्ष देऊन कान लावून ऐकल्यास मूर्तीमधून समुद्राच्या लाटांचा आवाज येतो, असे सांगितले जाते.[]मंदिराच्या दाराजवळील उजव्या बाजूला एक छडी ठेवलेली असते. असे म्हणतात की ह्या छडीचा उपयोग देवांच्या बालरूपाला मारण्यासाठी केला गेला होता. तेव्हा त्यांच्या हनुवटीवर जखम झाली होती. तेव्हापासून त्यांच्या हनुवटीवर चंदनाचा लेप लावायची सुरवात झाली. गर्भगृहात बघितले की ही मूर्ती गर्भगृहाच्या मध्यभागी आहे. पण बाहेरून बघितल्यास देवांची मूर्ती ही उजव्या बाजूला स्थानापन्न असल्याचे दिसते. देवांच्या मूर्तीला वाहिलेली सर्व फुले व तुळशीची पाने प्रसाद म्हणून भक्तांना न देता मागील बाजूस असलेल्या विहिरीत टाकून दिली जातात.दर गुरुवारी देवांच्या मूर्तीवर पांढऱ्या चंदनाचा लेप लावला जातो. जेव्हा हा लेप काढतात तेव्हा मूर्तीवर लक्ष्मी देवीची चिन्हे उमटलेली दिसून येतात.


  • स्थानिक मान्यतेनुसार, येथे मंदिरात स्थापित काळ्या रंगाची दिव्य मूर्ती कोणीही तयार केली नसून ती स्वतः जमिनीतून प्रकट झाली होती.[]

वेंकटेश-सुप्रभातम []

[संपादन]

भक्त कवी शतल्लपाक अन्नम्माचार्यानी 'श्री वेंकटाचलपते तव सुप्रभातम्' हे स्तुतिपर काव्य लिहिले आहे. सुब्बलक्ष्मीच्या आवाजात ते दर शनिवारी सकाळी आकाशवाणीवर ऐकायला मिळत असे. वेंकटेश्वराला झोपेतून उठवण्यासाठी हे भूपाळीवजा स्तोत्र म्हणजे तिरुमला मंदिराच्या गर्भगृहातील शयन मंडपम येथे भगवान वेंकटेश्वरला केलेली सर्वप्रथम आणि पूर्वोत्तर सेवा आहे.

श्रीपद्मनाभ पुरुषोत्तम वासुदेव

वैकुण्ठ माधव जनार्दन चक्रपाणे ।

श्रीवत्सचिन्ह शरणागतपारिजात

श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् ॥ २२॥

बालाजी आणि पद्मावती ,विशाखापट्टणम

तेलुगु: వెంకటేశ్వరుడు,

तमिल: வெங்கடேஸ்வரர்,

कन्नड़: ವೆಂಕಟೇಶ್ವರ,

संस्कृत: वेंकटेश्वरः,"वेंकट" म्हणजे "पापांचा नाश करणारा", ईश्वर(देव)

गोविंदा, श्रीनिवास.

मराठी: बालाजी


प्राचीनमान्यतेनुसार

[संपादन]

काही लोकांमते[], वेंकटेश्वर हा विष्णूचा १०व्या अवतार, कल्कि आहे.

  • कलियुगातील दुःख व दु: खापासून मानवी समाजाला मुक्त करण्यासाठी तिरुमला 'वेंकटेश्वर ' आहेत. म्हणूनच या मंदिराला 'कलियुग वैकुंठम् ' म्हणतात आणि वेंकटेश्वरला कलियुगातील विष्णूचा अवतार म्हणतात. वेंकटेश्वर यांना 'बालाजी', 'गोविंद' आणि 'श्रीनिवास' म्हणूनदेखील ओळखले जाते. वराहपुराणात भगवान वेंकटेश्वर व देवी पद्मावती यांची कथा आहे
  • कलियुगात एकदा काही ऋषी यज्ञ करीत होते. या यज्ञाचे फळ त्रिमूर्तींपैकी कोणाला द्यावे ह्याबद्दल देवर्षी नारदांनी ऋषींना सल्ला दिला. भृगु ऋषींना त्रिमूर्तींची परीक्षा घेण्यासाठी पाठवण्यात आले. ह्या ऋषींना त्यांच्या पायाच्या तळव्याजवळ एक डोळा होता. ते आधी ब्रह्मदेवांना भेटायला गेले आणि नंतर त्यांनी भगवान शंकर ह्यांची भेट घेतली. त्यानंतर ते भगवान विष्णूंना भेटायला गेले. परंतु भगवान विष्णूंनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी मुद्दाम त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. ह्यामुळे क्रोधित होवून त्यांनी भगवान विष्णूंच्या छातीवर पायाने प्रहार केला. हे बघून लक्ष्मीदेवी रागावल्या व वैकुंठ सोडून पृथ्वीवर कोल्हापूर येथे जाऊन ध्यानस्थ बसल्या. तेव्हाही भगवान विष्णूंनी त्याकडे दुर्लक्ष करून उलट ऋषींची त्यांच्या पायाला झालेल्या दुखापतीसाठी माफी मागितली. असे करत त्यांनी भृगु ऋषींच्या पायात असलेला डोळा नष्ट करून टाकला. त्यानंतर भगवान विष्णू ह्यांनी श्रीनिवास म्हणून मानव अवतार घेतला आणि ते वैकुंठ सोडून पृथ्वीवर आले. लक्ष्मीदेवींचा शोध घेता घेता ते ध्यानस्थ झाले. इकडे लक्ष्मी देवींना भगवान विष्णू ह्यांची स्थिती समजली आणि त्यांनी महादेव व ब्रह्मदेव ह्यांची प्रार्थना केली. ब्रह्मदेवांनी व महादेवांनी अनुक्मे गाईचे व वासराचे रूप धारण केले. लक्ष्मीदेवींनी गोपीरूपात तिरुमलाचा राजा चोला ह्याच्याकडे त्या गायीला व वासराला दिले. ती गाय रोज चरायला जाई तेव्हा श्रीनिवासांना दूध देत असे. एकदा गवळ्याने हे बघितले आणि त्याने काठीने गाईला मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा श्रीनिवासांच्या कपळावर जखम झाली. ह्यामुळे श्रीनिवास क्रोधित झाले आणि त्यांनी राजा चोला ह्याला राक्षस बनण्याचा शाप दिला. कारण धर्मानुसार नोकराच्या चुकीची संपूर्ण जबाबदारी त्याच्या मालकाची असते. राजाने श्रीनिवासांची माफी मागितली तेव्हा श्रीनिवास त्याला म्हणाले की, पुढील जन्मी त्याला आकाशराजाचा जन्म मिळेल आणि तेव्हा त्याने त्याच्या मुलीचा, पद्मावतीचा विवाह श्रीनिवास ह्यांच्याशी करून द्यायचा. त्यानंतर श्रीनिवास त्यांच्या मातेकडे-वकुला देवी-कडे गेले आणि त्यांनी काही काळ तिरुमला पर्वतावर वास्तव्य केले. शाप मिळाल्यानंतर चोला राजाने आकाशराजा म्हणून जन्म घेतला आणि एका मुलीला जन्म दिला. तिचे नाव पद्मावती असे ठेवले. ह्या कन्येचा जन्म पद्मपुष्करिणीमध्ये झाला होता. ह्यानंतर श्रीनिवासांनी पद्मावतीशी विवाह केला आणि ते तिरुमला पर्वतावर राहावयास गेले. काही काळाने जेव्हा लक्ष्मी देवींना श्रीनिवास ह्यांच्या विवाहाविषयी कळले तेव्हा त्या तिरुमला पर्वतावर त्यांना जाब विचारण्यासाठी गेल्या. असे म्हणतात की पद्मावती व लक्ष्मीदेवींनी श्रीनिवासांना जाब विचारला, तेव्हा त्यांनी स्वतःचे रूपांतर एका दगडाच्या मूर्तीमध्ये केले. हे बघून ब्रह्मदेव व महादेव तिथे प्रकट झाले व त्यांनी असे होण्याचे कारण विचारले. तेव्हा दोन्ही देवींनी सांगितले की देवांनी मानवाला कलियुगातील संकटांपासून तारण्यासाठी इथे राहण्याचा निर्णय घेतला. ह्यानंतर देवींनीसुद्धा देवांबरोबर मूर्ती स्वरुपात तिरुमला पर्वतावर राहण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच लक्ष्मीदेवी बालाजीच्या डाव्या बाजूला तर पद्मावतीदेवी उजव्या बाजूला असते.[]
  • पुराणात तिरुमला क्षेत्राला आदिवराह क्षेत्र असे म्हटलेले जाते. हिरण्याक्ष नावाच्या असुराचा वध केल्यानंतर आदिवराहांनी ह्या ठिकाणी निवास करण्याचा निर्णय घेतला.



इतिहास

[संपादन]

प्रसाद\नैवेद्य

[संपादन]

तिरुपतीचे लाडू फार प्रसिद्ध आहेत. हा लाडू भल्या मोठ्या आकारमानाचा असतो.

यांशिवाय वेंकटेश्वराला पुष्कळ प्रसाद सादर केले जातात. दादोजानम (दही भात), पुलीओहोरा (चिंचेचा भात), वडा आणि चककेरा-पोंगाली (मिठाई पोंगल), मिरयाला-पोंगाली, अप्पम, पायसम, जिलेबी, मुरुक्कु यांचे भाविकांना वाटप होते. डोसा, केशरी शिरा, मल्होरा यांसह. यात्रेकरूंना दररोज मोफत जेवण दिले जाते. गुरुवारी तिरुपावडा सेवा केली जाते, तेथे भगवान वेंकटेश्वराला नैवेद्य म्हणून खाद्यपदार्थ ठेवले जातात.

वेंकटेश्वराचे उत्सव

[संपादन]

ब्रह्मोत्सव, वैकुंठ एकादशी, रथ सप्तमी




हे पण पहा

[संपादन]

तिरुपती

बालाजी


संदर्भ

[संपादन]
  1. ^ Talentedindia https://www.talentedindia.co.in/tourism/india-tourism-tirupati-balaji-tour-andhrapradesh-andhra-tourism. 2019-08-30 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ श्रीमंत दादासाहेब करांडे स्किल डेव्हलपमेंट सेंटर पुणे https://shrimantdadasaheb.blogspot.com/p/blog-page_30.html. 2019-08-30 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ InMarathi.com (इंग्रजी भाषेत) https://www.inmarathi.com/interesting-facts-about-tirupati-balaji-temple/. 2019-08-30 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ Dainik Jagran (हिंदी भाषेत) https://www.jagran.com/spiritual/mukhye-dharmik-sthal-tirupati-balaji-temple-story-11476.html. 2019-08-31 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ www.rozbuzz.com https://www.rozbuzz.com/article/90f13763cad2497487050d68d76733ab. 2019-08-31 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ टाईम्स, राष्ट्रलेख. RLT NEWS (इंग्रजी भाषेत) http://rashtralekhtimes.com/?p=2548. 2019-08-31 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ sa.wikisource.org https://sa.wikisource.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%99%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D. 2019-08-31 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ swastik.org https://swastik.org/aboutwebsite.htm. 2019-08-31 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ टाईम्स, राष्ट्रलेख. RLT NEWS (इंग्रजी भाषेत) http://rashtralekhtimes.com/?p=2548. 2019-08-31 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

पुनर्निर्देशन

[संपादन]

"तिरुपतीबालाजी मंदिर,तिरुमला हे पान पुनर्निर्देशन बालाजी मध्ये बदलं का केलं.--Vishnu888 (चर्चा) ००:३१, ९ जानेवारी २०२० (IST)[reply]