चर्चा:गुढीपाडवा
लेखांचे एकत्रिकरण
[संपादन]@आर्या जोशी: @ज: @अभय नातू:
मराठी विकिपीडियावर गुढी आणि काठी पूजा हे लेख आहेत -ते त्या विषयांचा स्वतंत्रपणे मागोवा घेतात- आणि त्या लेखांचे स्व्तंत्र महत्व त्यांच्या ठिकाणी आहे. पण गुढी पाडवा आणि गुढीपाडवा अशी दोन शीर्षके तयार झाली आहेत. त्यामुळे त्यातील एका लेखाचे दुसऱ्यात विलिनीकरण करणे अभिप्रेत आहे. गुढीपाडवा हे सलग लेखन बरोबर आहे की 'गुढी पाडवा' हे दोन्ही शब्द वेगळे लिहिणे बरोबर आहे या बाबत ठरवून दोन्ही लेखांचे एकत्रिकरण करावे म्हणजे लेखात अधिक सुधारणा करणे शक्य होईल.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:४०, १७ मार्च २०१७ (IST)
- माझ्या मते गुढीपाडवा बरोबर आहे.
- अभय नातू (चर्चा) १९:३२, १७ मार्च २०१७ (IST)
गुढीपाडवा असा सामासिक शब्दच जास्त योग्य आहे.आर्या जोशी
गुढीपाडवा हेच लिखाण बरोबर. ... ज (चर्चा) २१:५६, १८ मार्च २०१७ (IST)
इतरत्र सापडलेला मजकूर येथे समाविष्ट करावा.
अभय नातू (चर्चा) ०९:१२, २४ मार्च २०१७ (IST)
१. गुढीवरील तांब्या उपडा का ठेवतात ?
तांब्याचे तोंड जमिनीकडे असल्याने तांब्याच्या कलशाच्या पोकळीतून प्रक्षेपित होणार्या लहरींमुळे तांब्यात असलेली कडुलिंबाची पाने आणि रेशमी वसन (गुढीवरील रेशमी वस्त्र) हे सात्त्विक लहरींनी भारीत बनते.
भूमीच्या आकर्षणशक्तीमुळे हा रूपांतरित सगुण ऊर्जाप्रवाह जमिनीच्या दिशेने संक्रमित होण्यास आणि त्याचे जमिनीवर सूक्ष्म-आच्छादन बनण्यास साहाय्य होते.
तांब्याची दिशा सुलट ठेवली, तर संपूर्णतः ऊर्ध्व दिशेने लहरींचे प्रक्षेपण झाल्याने जमिनीलगतच्या कनिष्ठ आणि मध्यम स्तराचे शुद्धीकरण न झाल्याने वायूमंडलातील फक्त ठराविक अशा ऊर्ध्व पट्ट्याचेच शुद्धीकरण होण्यास साहाय्य होते.
याउलट तांब्याच्या कलशाच्या तोंडाची दिशा भूमीकडे ठेवल्याने त्यातून प्रक्षेपित होणार्या लहरींचा फायदा जमिनीच्या लगतच्या आणि मध्यम पट्ट्यातील वायूमंडलाला, याबरोबरच उर्ध्वमंडलाला मिळण्यास साहाय्य होते.
२. तांब्याच्या कलशाची ब्रह्मांडातील सात्त्विक लहरी ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असणे ! गुढीवर असलेल्या तांब्याच्या कलशाची ब्रह्मांडातील उच्च तत्त्वाशी संबंधित सात्त्विक लहरी ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असल्याने या कलशातून प्रक्षेपित होणार्या सात्त्विक लहरींमुळे कडुनिंबाच्या (कडुलिंबाच्या) पानातील रंगकण कार्यरत होण्यास साहाय्य होते. या पानांच्या रंगकणांच्या माध्यमातून रजोगुणी शिव आणि शक्ती लहरींचे वायूमंडलात प्रभावी प्रक्षेपण चालू होते.
३. तांब्याच्या कलशातून संक्रमित झालेल्या निर्गुण लहरींचे कडुनिंब आणि रेशमी वस्त्र यांच्याकडून प्रभावी ग्रहण आणि प्रक्षेपण होणे तांब्याच्या कलशातून संक्रमित झालेल्या निर्गुण कार्यरत लहरींचे कडुनिंबाच्या (कडुलिंबाच्या) पानांच्या स्तराला सगुण लहरींमध्ये रूपांतर होते. त्यानंतर या लहरी रेशमी वसनाच्या (गुढीवरील रेशमी वस्त्राच्या) माध्यमातून प्रभावीपणे ग्रहण केल्या जाऊन त्या आवश्यकतेप्रमाणे अधोदिशेकडे प्रक्षेपित केल्या जातात.
४. कडुलिंब, कलश आणि वस्त्र या तिघांमधून निर्माण होणार्या लहरींनी वायूमंडल शुद्ध होणे कडुनिंबाच्या (कडुलिंबाच्या) पानांतून प्रक्षेपित होणार्या शिव-शक्तीशी संबंधित कार्यरत रजोगुणी लहरींमुळे अष्टदिशांचे वायूमंडल, तसेच तांब्याच्या कलशातून प्रक्षेपित होणार्या लहरींमुळे उर्ध्व दिशेचे वायूमंडल आणि रेशमी वसनातून प्रक्षेपित होणार्या लहरींमुळे अधोदिशेचे वायूमंडल शुद्ध आणि चैतन्यमय बनण्यास साहाय्य होते.
५. तांब्याचे तोंड जमिनीच्या दिशेला असूनही उर्ध्व दिशेचे वायूमंडल शुद्ध होणे गुढीतील घटकांना देवत्व प्राप्त झाल्यामुळे तांब्याच्या कलशाच्या पोकळीत घनीभूत झालेल्या नादलहरी कार्यरत होतात. या नादलहरींमध्ये वायू आणि आकाश ही उच्च तत्त्वे सामावलेली असल्याने तांब्याच्या कलशातून प्रक्षेपित होणार्या लहरींची गती ही उसळणार्या कारंजाप्रमाणे आणि ऊर्ध्वगामी असल्याने या लहरींच्या प्रक्षेपणामुळे उर्ध्व दिशेचे वायूमंडल शुद्ध होते.
अधिकृत ऐतिहासिक संदर्भ
[संपादन]- फाल्गुन अमावस्या अर्थात मृत्युंजय अमावस्या हा छत्रपती संभाजी महाराजांचा ‘बलिदानस्मरण दिन'. पाडव्याच्या आदल्या दिवशीची अमावस्येची हीही एक ओळख आहे. औरंगजेबाने गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला संभाजी महाराजांची अतिशय क्रूरपणे हत्या करून जनतेच्या मनात कायमची दहशत बसविण्यासाठी त्यांचे शीर भाल्यावर टांगून पाडव्याच्या दिवशी सर्वत्र फिरवले असा इतिहास सांगितला जातो. पुण्याजवळील वढू-तुळापूर या गावी त्यांचे शरीर तुकडे करून टाकले गेले. तिथे सध्या प्रेरणादायी स्मारक आहे.[१]
या विषयी अधिकृत ऐतिहासिक संदर्भ द्यावा लागेल. संकेतस्थळावरील संदर्भ ऐतिहासिक घटना नोंदविताना पुरेसा नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. गुढीपाडवा हा सांस्कृतिक सण असल्याने ऐतिहासिक घटना या त्याच्याशी जोडताना त्या अभ्यासपूर्वक जोडणे आवश्यक वाटते.आर्या जोशी (चर्चा)
- [ दुजोरा हवा] साचा लावा ना, हायकाय नायकाय.
शंका रास्त आहे
[संपादन]संभाजीच्या मृत्युदिवशी म्हणजे ११-३-१६८९ रोजी अमावास्या नसावी, असे दृक्-पंचागाच्या नोंदीवरून वाटते. पंचांग आणि मृत्युदिन बरोबर असतील तर त्या दिवशी पंचमी होती. ....ज (चर्चा) १५:५१, २७ मार्च २०१७ (IST)
या लेखाचा मुख्य विषय गुढीपाडवा असा आहे.या दिवशी केल्या जाणार्या पूजनपरंंपरेलाही विशेष महत्व आहे.त्यामुळे बदल करताना तसे संंबंंधित परिच्छेद आधी घेऊन या विषयाला पूरक आशय हा नंंतरच्या परिच्छेदात असावा असा प्रयत्न केला आहे.आर्या जोशी (चर्चा) लेखाचा आशय चांंगला आहे.केवळ क्रमवारितेत सुधारणा करावी असे वाटले त्यामुळे तसे बदल करण्याचा प्रयत्न केला आहे.आर्या जोशी (चर्चा)
@अभय नातू: नमस्कार! सदर लेख सुधारण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या संंपादकांंकडून होत आहेत.मीही माझ्या परीने प्रयत्न करीत आहे.फक्त मला शंंका आहे की इतिहास विषयक लेखन संंकेत साचा काढावा का तसाच ठेवावा? मार्गदर्शन व्हावे.धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) १६:०३, १५ मार्च २०१८ (IST)
आक्षेपार्ह मजकूर काढून टाकला आहे.आर्या जोशी (चर्चा) १४:१७, १८ मार्च २०१८ (IST)
काय तर्क आहेत !!
[संपादन]- मंगलकार्यात कलश सरळ असतो; पण नेमका तो गुढीपाडव्यालाच उटला टांगला जातो,
- गुढीवर कलश सुलटा कसा ठेवावा ?
- कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कडुनिंबाचा पाला घरी आणला जातो.
- पुजेत निंबसाडा नावाचा प्रकार उच्चवर्णीय घरी सुद्धा होता संदर्भ http://www.transliteral.org/dictionary/निंबसाडा/word, निंब नेसणे उच्चवर्णिय नसलेल्यातही पुजेसाठी होते https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand14/index.php/component/content/article?id=9989
- घराच्या दरवाजावर आरोग्यकारक जिव जंतूंना दूर ठेवणारे म्हणून कडूनिंबाचा पाला दरवाजावर बांधणारे आदिवासी समाज परंपराही भारतात आहेत.
- तर बांबूचा वापर हा तिरडीसाठी केला जातो ......., अशुभ आहेत.
- बांबूची घरे आणि असंख्य वस्तू भारतात उच्चवर्णियांसहीत सर्वांनी वापरलेली आहेत . ते सर्व अशूभ होते का काय ?
- काठ्यांना धार्मीक कार्यक्रमात साड्या बांधून काठ्या नाचवण्याच्या प्रथेचा http://www.transliteral.org/dictionary/तरंग/word इथे सुद्धा उल्लेख मिळतो. ते काय अशूभ आहे म्हणून ?
- अनामिक/का, वरील तर्क गुढी ऐवजी भगवा झेंडा उभारणाऱ्या लोकांचे आहेत. आणि पाडव्याला महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हे (मुख्यत: शिवाजी महारांजे चित्र असेलेले) भगवे ध्वज उभारले जात आहेत. --संदेश हिवाळेचर्चा २३:४७, १९ मार्च २०१८ (IST)
- दादा, गुडी लावा लावू नका, नवे झेंडे सोबतीनी लावा एकले लावा , त्या बद्दल काय बी मनायच नाही. दादा ऐकता का जरा, आपून काय म्हणत, कशाततरी अशुभ म्हणून काळ नवा आला म्हणून नव्या अंधश्रद्धा फैलावल्याच पाहीजे का ? शहरात चार बुक शिकली, दाताला टूथपेस्ट वापरली की आपल्या सगळ्यांचे खापरपणजोबा कडूनिंबाच्याच काड्यांनी दात घासायचे याचा विसर पडतो. बांबूला संश्कृतात वेणू म्हणत्यात त्याची बासरी करुन श्रीकृष्ण तोंडात ठेऊन वाजवायचा. या गोष्टी अशूभ कशा असतील.
- चार चांगली माणस मृत्यू पावलेल्या दिवशी, चार चांगली माणस जन्मू शकतात की न्हाई ? का संभाजी महाराजांचा मृत्यू च्या तिथीला जन्मणारी समदी माणस अशुभ गूणाची समजता ? संभाजी महाराज असू द्या शिवाजी महाराज असू द्या, गौतम बुद्ध असू द्या , बाबासाहेब आंबेडकर असू द्या महात्मा गांधी असू द्या त्यांच्या मृत्यू दिनी त्यांच्या पुर्वी त्यांच्या सोबत त्यांच्या नंतर जन्मलेल्यांनी त्यांचे बर्थडे साजरे करूच नयेत का ? तसे तर वर्षाच्या ३६५ दिवसावर जगातल्या कोणत्या न कोणत्या संताच्या मृत्यूची तारीख लिहिलेली असेलच ना ? म्हणून ३६५ दिवस जगात कुठेच कोणते आनंदोत्सव होऊ नयेत का ?
- दादा मी काय म्हनतुया, नव्या अंधश्रद्धांची बाजू लेखात लिवली तर नाण्याची जरा दुसरी बाजू बी दावा की आपल्या वेबसाईटीवर् खोट लिवून डोळ्यात धूळफ्येक करायची आणि खर झाकायच ह्ये बर हाय का ह्याचा दादा तुमीच जरा ईचार करा अन् तुमीच काय त्ये ठरवा.
प्रताधिकार भंग अहवाल
[संपादन]- @अभय नातू आणि V.narsikar: या अहवालात ज यांनी नकल-डकव करुन ह्या ब्लोगवरून मजकूर भरला हे स्पष्ट दिसत आहे.
- हा तडीपार केल्यानंतर आत्ता परत केलेला प्रताधिकार भंग आहे.
- प्रचालकांनी आवश्यक ती कारवाई करावी वास्तविक पूर्ण परिच्छेदच प्रताधिकार भंग करून लिहिलेला आहे, पण काही शब्द इकडे तिकडे केल्यामूळे थोड्याफ़ार फ़रकाने काही ओळीच अहवालात दिसत आहेत.
- मला प्रचालकांकडून त्यांचा निर्णय ऐकण्यात जास्त रस आहे. QueerEcoFeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ०३:०७, २३ ऑक्टोबर २०१८ (IST)
काठीपूजा आणि गुढीपाडवा
[संपादन]इंद्रध्वजाचा उल्लेख आणि पाश्चात्य संस्कृतीतील काठीपूजा यामधे काही वैचारिक अंतर आहे.ध्वज शब्दात पताका अशा अर्थी शब्ध गृहीत आहे. गुढीपाडव्याला आपण काठीची पूजा करत नसून गुढी हे एक समग्र रूप आहे ती फक्त काठीपूजा नव्हे.त्यामुळे सदर लेखातून काठीपूजेसंबिंधित मजकूर काढावा असे मला वाटते आहे. धन्यवाद! आर्या जोशी (चर्चा) १८:०५, ११ मार्च २०१९ (IST)
पुनर्निर्देशन काढणे
[संपादन]@अभय नातू: कृपया याचे पुनर्निर्देशन तातडीने काढावे.उगादी हा आंध्र प्रदेशातील स्वतत्र सण आहे.शोध चौकटीत उगादी लिहीले की हाच लेख उघडतोय त्यामुळे मला उगादीचा स्वतँत्र लेख करण्याला पंचाईत होते आहे.आपण पाहत असालच की मी सर्व प्रांतांचे नववर्ष लेख करायला किंवा सुधारायला घेतले आहेत.सहकार्य मिळावे.धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) १८:३०, १४ मार्च २०१९ (IST)
@अभय नातू:तसेच या लेखातील मोठा मजकूर काढला गेला आहे तो कशासाठी?इतिहास पहा मधे ते दिसतं आहेच कोण कर्ता आहे ते!!! आपण लक्ष घालून सहकार्य करावे ही विनंती.आर्या जोशी (चर्चा) २२:३७, १४ मार्च २०१९ (IST)
शकसंवत्सराचा पहिला दिवस?
[संपादन]" गुढीपाडवा हा शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे."
ज्यावर्षी अधिक चैत्र असतो, त्यावर्षी गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा पहिला दिवस नसतो. नववर्षाचा पहिला दिवस नंतर येणाऱ्या निज चैत्राच्या प्रतिपदेला येतो. उदा० २०२९ साली १४ एप्रिलला पाडवा आहे, पण नवीन शकसंवत्सर त्या आधीच १६ मार्चला सुरू होईल. ...ज (चर्चा) १३:१४, ३ मे २०१९ (IST).