कॅप्टन अमरिंदर सिंह ( मार्च ११, इ.स. १९४२) हे भारतीय राजकारणी व पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले अमरिंदर सिंह इ.स. २००२ ते इ.स. २००७ या काळात देखील पंजाबचे मुख्यमंत्री होते. तसेच ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील पतियाळा लोकसभा मतदारसंघातून तसेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातीलच अमृतसर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचा पराभव केला. त्यानंतर ते सोळाव्या लोकसभेत काँग्रेस पक्षाचे उपनेते आहेत.
२०१७ सालच्या पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर अमरिंदर सिंहांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले. २०२१ साली अंतर्गत कलहामुळे काँग्रेस पक्षाने अमरिंदर सिंह ह्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून चरणजीत सिंह छन्नी ह्यांना ६ महिन्यांसाठी मुख्यमंत्री बनवले.