ग्रीन व्हॅली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


—  पर्यटन स्थळ  —
ग्रीन व्हॅली
ग्रीन व्हॅली
जिल्हा ठाणे
तालुका/के मुरबाड

गुणक: 19°15′46″N 73°38′37″E / 19.262677°N 73.643653°E / 19.262677; 73.643653

ग्रीन व्हॅली[संपादन]

मुंबईपासून ९० किलोमीटर अंतरावर मुरबाड मधील टोकवडे-पळू गावात 'ग्रीन व्हॅली' हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले पर्यटन स्थळ आहे. सुट्टी घालवण्यासाठी हौशी पर्यटक या ठिकाणी येतात. येथे असलेला मोठा तलाव, वाहणारी नदी व नदीवर असणारे छोटे मोठे धबधबे ही येणाऱ्या पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे येथे धूम्रपान आणि मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे.

ग्रीन व्हॅली

राहण्याची आणि जेवण्याची सोय[संपादन]

ग्रीन व्हॅलीला येणाऱ्या पर्यटकांसाठी राहण्याची व जेवण्याची सोय आयोजकांनी येथेच उपलब्ध करून दिली आहे. राहण्यासाठी जांभा दगड वापरून बांधलेले, साधारण १००० चौरस फुटांचे व सर्व सोयी असलेले टुमदार बंगले येथे आहेत. तसेच पर्यटकांच्या गरजेनुसार पर्यटकांची जेवणाची व नाश्त्याची सोय करण्यात येते.

प्रमुख आकर्षण[संपादन]

या ठिकाणी असलेला तलाव हा पर्यटकांसाठी पोहण्याकरता खुला ठेवला आहे. पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी जीवन रक्षक पेहरावही (LIfejacket) पुरवला जातो. याशिवाय येथे ट्रेकिंग, धबधब्यातून रॅपलिंग अशा खेळाच्या प्रकारांचीही मजा अनुभवता येते. या पर्यटन स्थळापासून जवळच सह्याद्रीच्या रांगांत असलेले नाणेघाटजीवधन किल्ला अशी इतर काही प्रेक्षणीय स्थळे आहेत.

कसे पोहचाल[संपादन]

मुंबई--ठाणे--कल्याण--मुरबाड--टोकवडे--पळू--ग्रीन व्हॅली

विरार--चिंचोटी--भिवंडी--कल्याण--मुरबाड--टोकवडे--पळू--ग्रीन व्हॅली