ग्रीन व्हॅली
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
— पर्यटन स्थळ — | |
जिल्हा | ठाणे |
तालुका/के | मुरबाड |
ग्रीन व्हॅली
[संपादन]मुंबईपासून ९० किलोमीटर अंतरावर मुरबाड मधील टोकवडे-पळू गावात 'ग्रीन व्हॅली' हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले पर्यटन स्थळ आहे. सुट्टी घालवण्यासाठी हौशी पर्यटक या ठिकाणी येतात. येथे असलेला मोठा तलाव, वाहणारी नदी व नदीवर असणारे छोटे मोठे धबधबे ही येणाऱ्या पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे येथे धूम्रपान आणि मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे.
राहण्याची आणि जेवण्याची सोय
[संपादन]ग्रीन व्हॅलीला येणाऱ्या पर्यटकांसाठी राहण्याची व जेवण्याची सोय आयोजकांनी येथेच उपलब्ध करून दिली आहे. राहण्यासाठी जांभा दगड वापरून बांधलेले, साधारण १००० चौरस फुटांचे व सर्व सोयी असलेले टुमदार बंगले येथे आहेत. तसेच पर्यटकांच्या गरजेनुसार पर्यटकांची जेवणाची व नाश्त्याची सोय करण्यात येते.
प्रमुख आकर्षण
[संपादन]या ठिकाणी असलेला तलाव हा पर्यटकांसाठी पोहण्याकरता खुला ठेवला आहे. पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी जीवन रक्षक पेहरावही (LIfejacket) पुरवला जातो. याशिवाय येथे ट्रेकिंग, धबधब्यातून रॅपलिंग अशा खेळाच्या प्रकारांचीही मजा अनुभवता येते. या पर्यटन स्थळापासून जवळच सह्याद्रीच्या रांगांत असलेले नाणेघाट व जीवधन किल्ला अशी इतर काही प्रेक्षणीय स्थळे आहेत.
कसे पोहचाल
[संपादन]मुंबई--ठाणे--कल्याण--मुरबाड--टोकवडे--पळू--ग्रीन व्हॅली
विरार--चिंचोटी--भिवंडी--कल्याण--मुरबाड--टोकवडे--पळू--ग्रीन व्हॅली