Jump to content

गुरबचन सिंग सलारिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया (२९ नोव्हेंबर, १९३५:शकरगढ, पंजाब - ५ डिसेंबर, १९६१:काँगोचे प्रजासत्ताक) हे भारतीय सैन्याधिकारी होते. हे १९६१ च्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतिपथकातील अधिकारी होते. तेथील युद्धातील अतुलनीय पराक्रमासाठी त्यांना परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च सैनिकी सन्मान मरणोत्तर देण्यात आला.