गुडघे
Appearance
गुडघे हे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील गाव आहे. साहित्यिक गोनिदा तथा गो. नी. दांडेकर यांचे हे गाव आहे.
?गुडघे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | दापोली, दाभोळ |
जिल्हा | रत्नागिरी |
तालुका/के | दापोली |
भाषा | मराठी |
सरपंच | |
ग्रामपंचायत | गुडघे |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• ४१५७०६ • एमएच-०८ |
संकेतस्थळ: ग्रुप ग्रामपंचायत गुडघे | |
राकेश टेमकर द्वारा निर्मित |
शिक्षण
[संपादन]या गावात जिल्हा परिषदेची एक प्राथमिक मराठी शाळा आहे. बहुतेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी दापोलीला किंवा मुंबईला जातात.
हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
खेळ
[संपादन]गुडघे गावात क्रिकेट हा अतिशय लोकप्रिय खेळ मानला जातो. याव्यतिरिक्त, खो-खो आणि कबड्डी हे खेळ देखील शालेय स्तरावर खेळले जातात.