गंगा (निःसंदिग्धीकरण)
Appearance
उत्तर प्रदेशातून वाहणारी गंगा नदी ही समस्त हिंदूंसाठी सर्वाधिक पवित्र समजली जाते. आमच्या गावची नदीही पवित्र आहे हे दर्शवण्यासाठी गावोगावच्या नद्यांच्या नावांमध्ये गंगा हा शब्द असतो. याचा विस्तार म्हणून कोणत्याही वाहत्या प्रवाहाला गंगा म्हणायची प्रथा पडली आहे.
अशाच काही नद्या आणि प्रवाह :-
- आकाशगंगा
- गटारगंगा : कधीकाळी स्वच्छ असलेला पण कालांतराने गलिच्छ व घाणेरडा झालेला वाहत्या पाण्याचा प्रवाह
- देव गंगा : गंगा नदीचे एक नाव
- पंचगंगा नदी
- पाताळगंगा नदी
- पैनगंगा नदी
- बाणगंगा नदी
- वाक्गंगा : माणसाच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या सुमधुर शब्दांचा प्रवाह
- वैनगंगा नदी
- शिवगंगा नदी : या नावाच्या दोन नद्या आहेत, एक पुणे जिल्ह्यात व दुसरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात.
- स्वरगंगा : सुरांची गंगा, सुरेल गायन
- स्वर्गंगा : स्वर्गातून आल्याची मान्यता असलेल्या उत्तर प्रदेशातील गंगा नदीचे दुसरे नाव
- ज्ञानगंगा : विद्वान माणसाच्या मुखातून वहात असलेले शब्दरूपी ज्ञान