शिवगंगा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शिवगंगा
उगम कल्याण
पाणलोट क्षेत्रामधील देश पुणे जिल्हा, महाराष्ट्र

शिवगंगा नदी पुणे जिल्ह्यातील गुंजन मावळात उगम पावते.

खोरे[संपादन]

सिंहगडाच्या मागच्या बाजूच्या कल्याण गावी या नदीचा उगम आहे. तेथून ही नदी पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागात हवेली, भोर तालुक्यातून वाहते. साधारण ३० गावांतून वाहत जाऊन पुढे ही नदी भोर तालुक्यातील नसरापूर गावी गुंजवणी नदीला मिळते. शिवगंगा नदी जून पासून जानेवारी पर्यंत पावसाच्या दिवसातच वाहती असते.

पाणलोट क्षेत्रातील गावे[संपादन]

शिवगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात खालील गावे येतात :- माळवाडी , अवसरवाडी, कोंढणपूर, रहाटवडे, रांजे, कुसगाव(शिवापूर), खेड शिवापूर, आर्वी (हवेली), सणसवाडी, गाउडदरा, शिंदेवाडी, ससेवाडी, वेळू, गोगलवाडी, कासुर्डी, खेड, खोपी, शिवरे, वरवे(बु), वरवे (खु), कांजळे, देगाव, नायगाव, कांबरे, उंबरे, कामथडी, नसरापूर, कल्याण हवेली तालुका, श्रीरामनगर

हे सुद्धा पहा[संपादन]