खडकावणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?खडकावणे
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
गुणक: 19°49′10″N 72°54′59″E / 19.8195°N 72.9165°E / 19.8195; 72.9165
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .६९५१४ चौ. किमी
जवळचे शहर पालघर
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
३१५ (२०११)
• ४५३/किमी
भाषा मराठी
सरपंच -
बोलीभाषा आदिवासी कातकरी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१२०१
• +०२५२५
• एमएच४८

गुणक: 19°49′10″N 72°54′59″E / 19.8195°N 72.9165°E / 19.8195; 72.9165


खडकावणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस मनोर मार्गाने गेल्यावर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय मार्ग क्रमांक ४८ वर डावीकडे हे गाव लागते.पालघरपासून हे गाव ३० किमी अंतरावर आहे.

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन[संपादन]

हे एक छोटे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५७ कुटुंबे राहतात. एकूण ३१५ लोकसंख्येपैकी १५९ पुरुष तर १५६ महिला आहेत. गावाची साक्षरता ४६.४३ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६२.७९ आहे तर स्त्री साक्षरता २९.२७ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ६३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या २० टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन,बकरीपालन सुध्दा ते करतात.

नागरी सुविधा[संपादन]

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस पालघर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शाही पालघरवरुन उपलब्ध असतात.

जवळपासची गावे[संपादन]

उंबरवाडा तर्फे मनोर, खारवडश्री, खारमेंडी, दातिवरे, अशेरी, वाडे, चारीखुर्द, वेळगाव, चिल्हार, पोळे, खुटाळ ही जवळपासची गावे आहेत.खडकावणे गाव अशेरी आणि वाडे गावासह वाडा-खडकोणा ग्रामपंचायतीमध्ये येते.

संदर्भ[संपादन]

1. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html 2. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html