क्लॉड ऑचिनलेक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फील्ड मार्शल सर क्लॉड जॉन आयर ऑचिनलेक (२१ जून, १८८४:ॲल्डरशॉट, हॅम्पशायर, इंग्लंड - २३ मार्च, १९८१:माराकेश, मोरोक्को) हे ब्रिटिश सेनापती होती. यांनी आपले बरेचसे सैनिकी जीवन ब्रिटिश भारतात व्यतीत केले. ते अनेक भारतीय भाषा अस्खलितपणे बोलू शकत. ऑचिनलेक भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील ब्रिटिश सैन्याचे सर्वोच्च सेनापती होते.

सैनिकी कारकीर्द[संपादन]

सुरुवात आणि पहिले महायुद्ध[संपादन]

ऑचिनलेकने सॅंडहर्स्टच्या रॉयल मिलिटरी कॉलेजमधून सैनिकी शिक्षण घेतल्यावर त्यांची नेमणूक ब्रिटिश भारतीय लष्करात सेकंड लेफ्टनंट म्हणून २१ जानेवारी, १९०३ रोजी झाली. एप्रिल १९०४मध्ये ते ६२व्या पंजाबी रेजिमेंटमध्ये रुजू झाले. १९०५मध्ये लेफ्टनंट पदावर बढती घेउन ते पुढील दोन वर्षे तिबेट आणि सिक्कीममध्ये राहिले. १९०७मध्ये वाराणसीला आल्यावर त्यांना डिप्थेरिया झाला होता. १९०९मध्ये वाराणसीला परतल्यावर ते पुन्हा ६२व्या पंजाबीमध्ये रुजू झाले व १९१२मध्ये कॅप्टनपदावर चढले. पहिल्या महायुद्धात ऑचिनलेकना आपल्या रेजिमेंटसह सुएझ कालव्याचे रक्षण करण्यासाठी पाठविले गेले. १९१५मध्ये तेथून ६२वी पंजाबी रेजिमेंट एडनला गेली. त्यावर्षी ३१ डिसेंबरला ६२व्या पंजाबीसह ६वी भारतीय डिव्हिजन इराकच्या बसरा शहरात आली व मेसोपोटेमियातील अनेक लढायांमध्ये लढली. जानेवारी १९१६मधील हॅनाच्या लढाईतून वाचलेल्या मोजक्या ब्रिटिश अधिकाऱ्यांपैकी ऑचिनलेक एक होते. त्यानंतर त्यांना आपल्या बटालियनचे ॲक्टिंग कमांडिंग ऑफिसर[मराठी शब्द सुचवा] अशी बढती मिळाली. त्यांनी आपल्या रेजिमेंटचे कुटच्या दुसऱ्या लढाईत आणि बगदादच्या पाडावात नेतृत्त्व केले व तेथील कर्तृत्त्वाबद्दल त्यांना डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस ऑर्डर हा पुरस्कार मिळाला. १९१८मध्ये त्यांना मेजर पदी तर १९१९च्या सुरुवातीस लेफ्टनंट कर्नल आणि नंतर ब्रेव्हेट लेफ्टनंट कर्नल पदी बढती मिळाली

दोन महायुद्धांदरम्यान[संपादन]

दुसरे महायुद्ध[संपादन]

भारताची फाळणी आणि निवृत्ती[संपादन]