कोको बेटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोको बेटे - हा बेटसमूह बंगालच्या उपसागरातील ईशान्य भागात आहे. ही बेटे १९३७ पासून म्यानमारच्या यंगून प्रदेशाचा भाग आहेत. ही बेटे यंगून शहराच्या दक्षिणेस ४१४ किमी (२५७ मैल) वर आहेत. या बेट समूहात एकूण पाच बेटे आहेत: यातील चार ग्रेट कोको रीफवर आणि एक लिटल कोको रीफवर आहे. या बेटसमूहाच्या उत्तरेस असलेले प्रीपेरिस बेट, म्यानमारचे आहे. तर दक्षिणेला असलेले लँडफॉल बेट, भारताचे आहे.

इतिहास[संपादन]

एकेकाळी ही बेटे भारतीयांच्या ताब्यात होती. ही बेटे भारत, ब्रह्मदेश आणि आग्नेय आशिया यांच्यातील प्राचीन व्यापारी मार्गावर आहेत व येथे नियमितपणे व्यापारी बोटी येत असत. [१] १६ व्या शतकात, पोर्तुगीज खलाशांनी या बेटांना कोको बेटे असे नाव दिले. कोको या पोर्तुगीज भाषेतील शब्दाचा अर्थ नारळ, असा आहे . 18 व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीने ही बेटे ताब्यात घेतली, व नंतर ती ब्रिटिश राजवटीखाली आली. दक्षिण अंदमान बेटावरील पोर्ट ब्लेअर येथील बंदीगृहाला व तेथील वसाहतीला कोको बेटांनी अन्न, प्रामुख्याने नारळ पुरवले. १८५७ च्या भारतीय स्वातंत्र युद्धातील कैद्यांना ठेवण्यासाठी, १८५८ मध्ये या वसाहतीची स्थापना करण्यात आली होती. [१]

१८६० मध्ये जडवेट कुटुंबाला ही बेटे भाडे कराराने देण्यात आली होती. यांनी या बेट समूहातील टेबल बेटावर दीपगृह बांधले होते. [२] १८७७ मध्ये या दीपगृहात झालेल्या हत्येची माहिती मिळण्यास, पोर्ट ब्लेअरच्या मुख्य आयुक्तांना अनेक आठवडे लागल्याने ही बेटे भारताकडून प्रशासित करण्यासाठी खूप दुर्गम समजली गेली. त्यामुळे १८८२ मध्ये या बेटांचे नियंत्रण ब्रिटिश बर्माकडे हस्तांतरित करण्यात आले. १८७८ पासून ही बेटे व्यावसायिकरित्या भाड्याने देण्यात आली होती, परंतु पुढील ६० वर्षांत या बेटांवर काही विकास होऊ शकला नाही. [१]

१९३७ मध्ये ब्रह्मदेश स्वतंत्रपणे ब्रिटिश वसाहत म्हणून गणले जाऊ लागले तेव्हा ही बेटे ब्रह्मदेश वसाहतीचा भाग बनली. [१] दुसऱ्या महायुद्धात जपानने १९४२ ते १९४५ या काळात बेटांवर ताबा मिळवला होता. [१] १९४८ मध्ये कोको बेटांसह बर्मा स्वतंत्र झाला. जानेवारी १९५९ मध्ये , ने विनच्या सरकारने, राजकीय कैद्यांसाठी ग्रेट कोको बेटावर एका बंदीगृहाची स्थापन केली होती. १९६२ च्या सत्तापालटानंतर बर्मी "डेव्हिल्स आयलंड" म्हणून त्याची ख्याती झाली. १९६९ ते १९७१ या काळात, येथील कैद्यांनी तीन उपोषणे केली, त्यानंतर १९७१ मध्ये हे बंदीगृह बंद करण्यात आले व ते बर्मी नौदलाकडे हस्तांतरित करण्यात आले. [१]

१९९४ मध्ये ही बेटे चीनला करारावर दिली आहेत; असा दावा १९९८ मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांनी केला होता परंतु २००८ पर्यंत या दाव्याच्या समर्थनार्थ कोणतेही पुरावे समोर आले नाहीत [३]

लष्करी सामर्थ्य[संपादन]

चीन, ग्रेट कोको बेटावरील लष्करी तळ आधुनिक करण्यास मदत करत आहे, असे वृत्त १९९२ मध्ये, एका जपानी वृत्त सेवेने दिले. १९९० ते २००० या दशकात, अनेक पत्रकार आणि तज्ञांनी या बेटावर चीनचा मोठा सिग्नल्स इंटेलिजन्स तळ असल्याचा दावा केला. चीनच्या तथाकथित "स्ट्रिंग ऑफ पर्ल्स" या युद्धनीतीचा हा एक भाग असल्याचे मानले गेले. भारतीय हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी याची निर्मिती केली असल्याचा दावा केला गेला. १९९८ मध्ये, चीनचा या बेटांवर एक प्रमुख नौदल तळ बांधण्याचा हेतू आहे, असा दावा जॉर्ज फर्नांडिस यांनी केला. भारताने चीनचा तळ अस्तित्वात असल्याची सार्वजनिकपणे पुष्टी केली परंतु इतर कोणत्याही देशाने असे पुष्टीकरण केले नाही. २००८ पर्यंत या दाव्याच्या समर्थनार्थ कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत. चीन आणि बर्मा या दोन्ही देशांनी अशाप्रकारच्या तळाचे अस्तित्व नाकारले. २००५ मध्ये भारताने आपले भूमिका मागे घेतली; व त्यानंतर ब्रह्मदेशाच्या निमंत्रणावरून भारताकडून या बेटांची तपासणी करण्यात आली. [३]

२०१४ मध्ये, भारताच्या अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ एअर मार्शल पी. के. रॉय यांनी "चीन नागरी उद्देशांसाठी येथे धावपट्टी विकसित करत आहे." असे निदर्शनास आणून दिले. [४] [५] परंतु प्रत्यक्षात येथे चिनी लोकांच्या उपस्थितीचे कोणतेही अहवाल नाहीत व त्यामुळे परिस्थिती चिंताजनक नाही. असा अहवाल दिला. ते पुढे म्हणाले की, येथे केवळ नागरी पायाभूत सुविधांचा विकास होत असल्याने त्याचा भारताला धोका नाही. [६]

जानेवारी २०२३ मध्ये Maxar Technologies ने घेतलेल्या उपग्रह प्रतिमांनी, कोको बेटांवरील विमानतळाच्या सुधारणा उघडकीस आणल्या. यामध्ये २,३०० मीटर लांब धावपट्टी, एक रडार टॉवर आणि दोन नवीन हँगर्स यांचा समावेश आहे . हा विमानतळ म्यानमार सैन्यादलाच्या किंवा तत्माडॉ च्या अखत्यारीत असून कोणतीही चीनी लष्करी उपस्थिती आढळून येत नाही. [७]

भूगोल[संपादन]

कोको बेटांच्या पश्चिमेस बंगालचा उपसागर आहे व पूर्वेला अंदमान समुद्र आहे. उत्तरेस २५० किलोमीटर (१५५ मैल) वर बर्मी मुख्य भूभाग आहे. या बेटांच्या उत्तर-ईशान्य दिशेस ७७ किमी (४८ मैल) वर प्रीपेरिस बेट आहे. [८] कोको बेटासमूहात तीन मोठी बेटे आहेत. यात ग्रेट कोको बेट व लहान कोको बेट यांचा समावेश होतो. या दोन बेटांमध्ये अलेक्झांड्रा चॅनेल आहे. या शिवाय ग्रेट कोको बेटाच्या जवळ, तिसरे, लहान, टेबल बेट आहे.

भौगोलिकदृष्ट्या, ही बेटे अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाचा एक भाग आहेत. या समूहातील बहुतेक बेटे भारताची आहेत. या द्वीपसमूहाच्या भारतीय भागातील सर्वात उत्तरेकडील बेट म्हणजेच लँडफॉल बेट व कोको बेट समूह, या मध्ये कोको चॅनेल आहे. कोको चॅनेल, २० किलोमीटर (१२ मैल) रुंद आहे. [२]

कोको रीफ[संपादन]

कोको बेटे समुद्रातील अरुंद खडकांची (रीफ) बनलेली आहेत. हा बेटसमूह, दोन रीफ मध्ये विभागला गेला आहे; ग्रेट कोको रीफ व लिटल कोको रीफ.

ग्रेट कोको रीफ[संपादन]

उत्तर - दक्षिण पसरलेल्या ग्रेट कोको रीफवर चार बेटे आहेत. सर्वात उत्तरेकडे स्लिपर आयलंड त्या नंतर टेबल आयलंड, ग्रेट कोको बेट आणि सर्वात दक्षिणेला जेरी बेट आहे.

ग्रेट कोको बेट[संपादन]

ग्रेट कोको बेट (14°07′00″N 93°22′03″E / 14.11667°N 93.36750°E / 14.11667; 93.36750) हे १०.४ कि. मी. (६.५ मैल) लांब व २ कि . मी. (१.२ मैल ) रुंद आहे. या बेटाच्या किनाऱ्यावर अनेक हिरवी कासवे (green turtles) घरटे करतात. म्यानमार सरकारने, इथल्या कासवांचा व इतर समुद्री जीवांचा अभ्यास करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत.

टेबल बेट[संपादन]

कुऱ्हाडीच्या आकाराचे टेबल बेट, ग्रेट कोको बेटाच्या उत्तरेस २.५ किमी (१.६ मैल) अंतरावर आहे. हे बेट १.६ किमी (१.० मैल) लांब आणि १.२ किमी (०.७ मैल) रुंद आहे.

१८६७ मध्ये या बेटावर नैऋत्येला, एक दीपगृह बांधलेले होते, हे दीपगृह लाल आणि पांढऱ्या आडव्या पट्ट्यांनी रंगवलेले होते. तसेच येथे काम करणाऱ्यांसाठी दोन एकमजली घरे जवळच बांधलेली होती. सध्या हे दीपगृह वापरले जात नाही व त्याचे सर्व अवशेष आता निर्जन आहे. याच ठिकाणी पूर्वी एक खून झाला होता, ज्याची बातमी पोर्ट ब्लेयरला पोचायला अनेक दिवस लागले होते.

स्लिपर बेट[संपादन]

टेबल बेटाच्या वायव्य दिशेला, ०.२ किमी (०.१ मैल) अंतरावर स्लिपर बेट आहे. हे बेट म्हणजे ०.४ किमी (०.२ मैल) लांबीची एक अरुंद पट्टी आहे. [८]

जेरी बेट[संपादन]

ग्रेट कोको बेटाच्या दक्षिणेकडे, चिंचोळे जेरी बेट आहे. हे १.१ किमी (०.७ मैल) लांब आणि ०.२ किमी (०.१२ मैल) रुंद आहे. या बेटावर पोहोचण्यासाठी, ग्रेट कोको बेटावरून, या दोन बेटांना जोडणाऱ्या सँडबारवरून चालत जाता येते.

लिटल कोको रीफ[संपादन]

या उत्तर- दक्षिण पसरलेल्या रीफवर एकच बेट आहे.

लहान कोको बेट[संपादन]

ग्रेट कोको बेटाच्या नैऋत्येस, १६ किमी (९.९ मैल) अंतरावर लिटल कोको बेट आहे. हे बेट ५ किमी (३.१ मैल) लांब आहे व १.२ किमी (०.७५ मैल) रुंद आहे. अंदमान आणि निकोबार समुद्रातील हे म्यानमारचे सर्वात दक्षिणेकडील बेट आहे. याच्या दक्षिणेकडे असलेले लँडफॉल बेट भारताचे आहे.

सामान्य माहिती[संपादन]

बेट स्थान वैशिष्ट्ये क्षेत्रफळ (किमी2) लोकसंख्या
ग्रेट कोको बेट 14°06′00″N 93°21′54″E / 14.10°N 93.365°E / 14.10; 93.365 विमानतळ, नारळाच्या बागा, चीनने टेहळणी साठी येथे स्टेशन उभे केल्याचा आरोप १४.५७ १०००
लिटिल कोको बेट 13°59′17″N 93°13′30″E / 13.988°N 93.225°E / 13.988; 93.225 नारळाच्या बागा ४.४४ १५०
टेबल बेट 14°11′06″N 93°21′54″E / 14.185°N 93.365°E / 14.185; 93.365 दीपगृह १.२८
स्लिपर बेट 14°11′24″N 93°21′25″E / 14.19°N 93.357°E / 14.19; 93.357 ०.०८
रॅट बेट 14°07′41″N 93°22′55″E / 14.128°N 93.382°E / 14.128; 93.382 ०.०१५
बिनॅकल खडक 14°09′00″N 93°22′19″E / 14.15°N 93.372°E / 14.15; 93.372 ०.०११
जेरी बेट 14°03′00″N 93°21′54″E / 14.05°N 93.365°E / 14.05; 93.365 ०.१४
एकूण २०.५३ १३५० +

लोकसंख्या[संपादन]

ग्रेट कोको बेटावर साधारण २०० घरे आहेत आणि त्याची एकूण लोकसंख्या एक हजाराच्या आसपास आहे. येथे या लोकसंख्येला पुरेल इतका मोठा एक मोठा तलाव असून त्यातून पाणीपुरवठ्याची सोय केली गेली आहे.[९]

या बेटांवर नौदल तळ आहे. म्यानमार नौदलाच्या 28 व्या तुकडीकडे याची जबाबदारी आहे. येथे सुमारे 200 सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय राहतात.

हवामान[संपादन]

कोको बेटांवर उष्णकटिबंधीय मान्सून हवामान आहे ( कोपेन हवामान वर्गीकरण Am ). वर्षभर तापमान खूप उबदार असते. डिसेंबर ते मार्च या काळात हिवाळा असतो तर एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत पावसाळी हंगाम असतो. जून ते सप्टेंबरमध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो.

Coco Islands (1981–2010) साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
सरासरी कमाल °से (°फॅ) 29.6
(85.3)
30.0
(86)
31.0
(87.8)
32.6
(90.7)
32.3
(90.1)
30.7
(87.3)
30.3
(86.5)
30.0
(86)
30.2
(86.4)
30.8
(87.4)
31.0
(87.8)
30.0
(86)
30.71
(87.27)
दैनंदिन °से (°फॅ) 25.8
(78.4)
25.6
(78.1)
26.6
(79.9)
28.5
(83.3)
29.0
(84.2)
28.1
(82.6)
27.6
(81.7)
27.5
(81.5)
27.4
(81.3)
27.6
(81.7)
27.7
(81.9)
26.6
(79.9)
27.33
(81.21)
सरासरी किमान °से (°फॅ) 22.0
(71.6)
21.2
(70.2)
22.0
(71.6)
24.3
(75.7)
25.8
(78.4)
25.4
(77.7)
25.0
(77)
25.0
(77)
24.6
(76.3)
24.4
(75.9)
24.4
(75.9)
23.2
(73.8)
23.94
(75.09)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 2.2
(0.087)
5.2
(0.205)
13.2
(0.52)
37.0
(1.457)
240.0
(9.449)
456.3
(17.965)
418.3
(16.469)
438.8
(17.276)
380.2
(14.969)
184.3
(7.256)
138.3
(5.445)
23.0
(0.906)
२,३३६.८
(९२.००४)
सरासरी पर्जन्य दिवस (≥ 1.0 mm) 0.3 0.2 0.7 2.4 12.2 19.9 20.2 20.4 18.6 13.7 7.5 1.4 117.5
स्रोत #1: Norwegian Meteorological Institute[१०]
स्रोत #2: World Meteorological Organization[११]

प्रशासन[संपादन]

हे बेटावर कोकोक्युन शहर वसलेले आहे. २०१५ च्या म्यानमारच्या सार्वत्रिक निवडणुकीत या टाऊनशिपमध्ये भ्रष्टाचार झाल्याने ते प्रकाशझोतात आले होते. या निवडणुकीत, या बेटावर मतपत्रिका न पाठवता, यांगूनमध्येच या बेटातील मतदारांची मते परस्पर नोंदविली गेली. हे उघडकीस आल्यावर या घटनेचा पोलिस तपास झाला. [१२] [१३]

वाहतूक[संपादन]

ग्रेट कोको बेटाच्या उत्तरेस कोको बेट विमानतळ ( ICAO कोड: VYCI) आहे. या विमानतळाची धावपट्टी १,८००-मीटर (५,९०० फूट) लांब आहे. या विमानतळा जवळच बेटावरील वस्ती आहे. नुकतेच या विमानतळाचे नूतनीकरण करण्यात आले. [१४]

वनस्पती आणि प्राणि[संपादन]

या बेटावर अत्यंत दुर्मिळ असे सरपटणारे प्राणी, पक्षी आणि सस्तन प्राणी बघायला मिळतात. यातील काही फक्त याच बेटांवर आढळतात. [१५]

चित्र पट्टी[संपादन]

विविध देशांची टोके
  • रोंडो बेट, इंडोनेशियाचे सर्वात उत्तरेकडील बेट, इंदिरा पॉइंटच्या सर्वात जवळ आहे
  • नारकोंडम बेट, अंदमान निकोबार बेट समूहाचा भारताचा सर्वात पूर्वेकडील बिंदू
  • लँडफॉल बेट, अंदमान निकोबार बेट समूहातील भारतातील सर्वात उत्तरेकडील बेट
  • भारताची टोकाची ठिकाणे
  • इंडोनेशियाची टोकाची ठिकाणे
  • म्यानमारची टोकाची ठिकाणे
  • बांगलादेशची टोकाची ठिकाणे
  • थायलंडची टोकाची ठिकाणे
  • बर्मा बेटांची यादी
म्यानमारच्या सीमा

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c d e f Selth 2008.
  2. ^ a b Selth, Andrew (Nov 2008b). "Burma's Mythical Isles". Australian Quarterly. 80: 24-48. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "selth" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  3. ^ a b Selth 2008, पाने. 9-11.
  4. ^ "Runway, other infrastructure being developed at Coco Islands | Kolkata News – Times of India". The Times of India. 8 February 2014.
  5. ^ "Chinese naval ships detected near Andamans | India News – Times of India". The Times of India. 4 September 2015.
  6. ^ "China a strategic partner, not a threat". Business Standard. 8 February 2014. 14 February 2014 रोजी पाहिले.
  7. ^ "Is Myanmar building a spy base on Great Coco Island?". Chatham House. 31 March 2023. 2 April 2023 रोजी पाहिले.
  8. ^ a b National Geospatial-Intelligence Agency (2005). Sailing Directions (Enroute): India and Bay of Bengal (8th ed.). Prostar Publications. p. 224. ISBN 9781577856627. 14 August 2021 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "ReferenceA" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  9. ^ "News (Monday, 9 June, 1997)" (PDF). New Light of Myanmar. 9 June 1997. Archived (PDF) from the original on 24 November 2019. 14 August 2021 रोजी पाहिले.
  10. ^ "Myanmar Climate Report" (PDF). Norwegian Meteorological Institute. pp. 23–36. Archived from the original (PDF) on 8 October 2018. 30 November 2018 रोजी पाहिले.
  11. ^ "World Meteorological Organization Climate Normals for 1981–2010". World Meteorological Organization. Archived from the original on 17 July 2021. 16 July 2021 रोजी पाहिले.
  12. ^ "Turnout vote" (PDF). Archived from the original (PDF) on 28 April 2016. 21 April 2016 रोजी पाहिले.
  13. ^ "News". Myanmar NOW.
  14. ^ "Senior General Min Aung Hlaing opens mobile telecom service in Cocokyun". Global New Light of Myanmar. 27 December 2014. Archived from the original on 4 August 2021. 14 August 2021 रोजी पाहिले.
  15. ^ "Great Coco Island and Little Coco Island Official site". Archived from the original on 8 May 2016. 21 April 2016 रोजी पाहिले.

स्रोत[संपादन]

 

बाह्य दुवे[संपादन]