केनिया फुटबॉल संघ
Jump to navigation
Jump to search
केन्या फुटबॉल संघ (Kenya national football team; फिफा संकेत: KEN) हा पूर्व आफ्रिकेमधील केन्या देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आफ्रिकेमधील आफ्रिकन फुटबॉल मंडळाचा सदस्य असलेला केन्या सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १०६ व्या स्थानावर आहे. आजवर केन्या एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला नाही.
केन्या आजवर आफ्रिकन देशांचा चषक स्पर्धेच्या १९७२, १९८८, १९९०, १९९२ व २००४ ह्या पाच आवृत्त्यांमध्ये खेळला असून प्रत्येक वेळी त्याला पहिल्या फेरीमध्ये पराभव पत्कारावा लागला आहे.