मसूरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मसुरी परिसर

मसूरी हे भारताच्या उत्तराखंड राज्याच्या डेहरादून जिल्ह्यात असलेले एक शहर आहे. डेहरादून शहरापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या या शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ३०,११८ होती.

थंड हवेचे ठिकाण[संपादन]

हे शहर अनेक दशकांपासून थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.


कसे जावे[संपादन]

मसुरी येथील मंदिर

उत्तराखंडची राजधानी देहरादून पासून 28 किलोमीटर अंतरावर उंच डोंगरांच्या रांगेत मसूरी हे थंड हवेचे सुंदर ठिकाण वसलेले आहे तेथे जाण्यासाठी रस्ते चांगले आहेत. एप्रिल ते जून हा काळ तिथला पर्यटन हंगाम म्हणून ओळखला जातो. डिसेंबर ते फेब्रुवारी बर्फाच्छादित प्रदेश बऱ्यापैकी असतो. हॉटेल्स मसुरी पासून खाली सात-आठ किलोमीटर अंतरावर डोंगरउतारावर आहेत.