कासटवाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?कासटवाडी
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
गुणक: 19°52′59″N 73°11′06″E / 19.8831°N 73.1851°E / 19.8831; 73.1851
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .५२०८९ चौ. किमी
जवळचे शहर जव्हार
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
४५२ (२०११)
• ८६८/किमी
भाषा मराठी
सरपंच -
बोलीभाषा आदिवासी कातकरी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१६०३
• +०२५२०
• एमएच४८

गुणक: 19°52′59″N 73°11′06″E / 19.8831°N 73.1851°E / 19.8831; 73.1851


कासटवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

जव्हार बस स्थानकापासून विक्रमगड मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव ६.८ किमी अंतरावर आहे.

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन[संपादन]

हे मध्यम आकाराचे लहान गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १०९ कुटुंबे राहतात. एकूण ४५२ लोकसंख्येपैकी २१४ पुरुष तर २३८ महिला आहेत. गावाची साक्षरता ४९.१८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ५८.१९ आहे तर स्त्री साक्षरता ४०.६४ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ८८ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १९.४७ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन,बकरीपालन सुध्दा ते करतात.

नागरी सुविधा[संपादन]

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्शासुध्दा जव्हारवरुन उपलब्ध असतात.

जवळपासची गावे[संपादन]

हडे, करधण, तुळजपूर, देंगाचीमेट, कलमविहिरा, जयेश्वर, रामनगर, गराडवाडी, ग्रामीण जव्हार, गणेशनगर, नंदनमाळ ही जवळपासची गावे आहेत.कासटवाडी ग्रामपंचायतीमध्ये अधखडक, गणेशनगर, गराडवाडी, हडे, ग्रामीण जव्हार, जयेश्वर, कासटवाडी, रामनगर ही गावे येतात.

संदर्भ[संपादन]

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/

५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

६. https://palghar.gov.in/

७. https://palghar.gov.in/tourism/