काशीनाथ घाणेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉ. काशीनाथ घाणेकर (१९४० - २ मार्च, १९८६) हे एक दंतवैद्यक असून मराठी नाट्यअभिनेते व हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते होते. सन १९६० ते १९९० या काळातले ते मराठीतले पहिले सुपर स्टार होते. स्त्रीरोगतज्ज्ञ इरावती कर्णिक या काशीनाथांच्या पहिल्या पत्नी. त्यांच्याशी घटस्फोट घेतल्यावर काशीनाथ घाणेकर यांनी अभिनेत्री कांचन लाटकर यांच्याशी लग्न केले. कांचन घाणेकरांनी दोघांच्या सहजीवनावर 'नाथ हा माझा' नावाचे पुस्तक लिहिले आहे. इरावती घाणेकर या पुढे डाॅ. इरावती भिडे झाल्या.[१]

काशीनाथ घाणेकर यांची भूमिका असलेली नाटके[संपादन]

काशीनाथ घाणेकर यांची भूमिका असलेले चित्रपट[संपादन]

★ अभिलाषा

★ एकटी

★ झेप

★ देवमाणूस

★ पाठलाग

★ हा खेळ सावल्यांचा

काशीनाथ घाणेकर यांच्यावर लिहिलेले आठवणीवजा पुस्तक[संपादन]

नाथ हा माझा (लेखिका - कांचन घाणेकर)

चित्रपट[संपादन]

काशीनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर 'आणि..डॉ. काशीनाथ घाणेकर' नावाचा चित्रपट आहे. त्यात घाणेकरांची भूमिका सुबोध भावे यांनी केली आहे.

  1. "Uma & Prakash Bhende Remember Dr.Kashinath Ghanekar". ZEE Talkies. 2018-11-08 रोजी पाहिले.