कामशेत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कामशेत हे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. पुणे-मुंबई महामार्गावर कामशेत नावाचा छोटासा घाट आहे. त्या घाटाच्या पायथ्याशी हे गाव आहे. हे गाव पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात येते. रियासतकार सरदेसाई यांचा मृत्यू कामशेत येथे झाला..

कामशेत हे पुणे-लोणावळा मार्गावरील एक रेल्वे स्थानक असून इंद्रायणी नदी या स्थानकाला लागून आहे.

कामशेतला भात सडण्याच्या खूप गिरण्या आहेत. त्यामुळे येथे आंबेमोहर, इंद्रायणी या स्थानिक जातींचे तांदूळ किमान किमतीत मिळतात.

कामशेतमधील शाळा[संपादन]

  • पंडित नेहरू विद्यालय
  • महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची आश्रमशाळा

कामशेतमधील मशिदी[संपादन]

  • अमिना मशीद
  • जामा मशीद