कवठे महांकाळ तालुका
कवठे महांकाळ कवठे महांकाळ | |
---|---|
राज्य | महाराष्ट्र, भारत |
जिल्हा | सांगली जिल्हा |
लोकसभा मतदारसंघ | सांगली लोकसभा मतदारसंघ |
विधानसभा मतदारसंघ | तासगाव कवठेमहांकाळ |
आमदार | रोहितदादा पाटील ( आर आर पाटील यांचे चिरंजीव) |
कवठे महांकाळ तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचा एक तालुका आहे.
कवठे महांकाळ हा तालुका सांगली जिल्ह्यातील राजकारणातील एक प्रसिद्ध व वादग्रस्त तालुकाही मानला जातो. या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने दंडोबा, गिरलिंग, मेघराजा मंदिर, ग्रामदेवता श्री महांकाली मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर व शुकाचार्य डोंगर ही देखील आहेत. तसेच कवठेमंकाळ मध्ये पद्मभूषण वसंतराव दादा पाटील जुनियर कॉलेज, श्री महांकाली हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज ही विद्यालय ही आहेत. महेश कोठारे दिग्दर्शित धडाकेबाज या मराठी चित्रपटातील कवट्या महाकाळ या पात्राला नाव या गावावरूनच पाडले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये बैलगाड्यांची शर्यत जेव्हा पुन्हा सुरू करण्यात आली त्यावेळेस सर्वात पहिले शर्यत कवठे महांकाळ तालुक्यातील नांगोळे या गावामध्ये झाली होती. कवठे महांकाळ शहरातील आगळगाव या रस्त्यालगत नवनाथ महाराजांचे मंदिर आहे या मंदिराच्या पूर्व कालीन अख्यायिका मध्ये भगवान श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांच्या सोबत वनवासाला जाण्या वेळेस याच मंदिराच्या जागेत राहिले असल्याचे आख्यायिका मध्ये लिहिले गेले आहे. कवठे महांकाळ शहराची लोकसंख्या जवळपास २८ हजार असू शकते तरीही स्वतंत्र मतदारसंघ नाही तर तासगाव - कवठे महांकाळ मतदारसंघ असेच बोलले जाते. आध्यात्म, ज्ञान प्राप्ती व जगातील सर्वात जास्त ताकदवर ठिकाण म्हणून असणारे 'भगवद्पुरी' हे देखील याच शहरात आहे.
तालुक्यातील गावे
[संपादन]- आगळगाव (कवठेमहांकाळ)
- अळकूद
- अळकूद एस
- आरेवाडी (कवठेमहांकाळ)
- बाणेवाडी
- बसप्पावाडी
- बोरगाव (कवठेमहांकाळ)
- चोरोची
- चुडेखिंडी
- देशिंग
- ढालेवाडी (कवठेमहांकाळ)
- ढाळगाव
- ढोळेवाडी
- धुळगाव (कवठेमहांकाळ)
- दुधेभावी
- गारजेवाडी
- घाटनांदरे
- घोरपडी (कवठेमहांकाळ)
- हारोळी
- हिंगणगाव (कवठेमहांकाळ)
- इरळी
जाधववाडी (कवठेमहांकाळ) जाखापूर जांभुळवाडी (कवठेमहांकाळ) जयगव्हाण कदमवाडी (कवठेमहांकाळ) करळहेट्टी कारोळी कवठेमहांकाळ केरेवाडी खरशिंग कोगनोळी (कवठेमहांकाळ) कोकाळे कुची कुकटोळी कुंदळापूर लांडगेवाडी लंगरपेठ लोणारवाडी (कवठेमहांकाळ) माळणगाव म्हैसाळ मोघमवाडी मोरगाव (कवठेमहांकाळ) नागज नांगोळे निमज पिंपळवाडी (कवठेमहांकाळ) रामपूरवाडी रांजणी (कवठेमहांकाळ) रायवाडी सारटी (कवठेमहांकाळ) शेळकेवाडी (कवठेमहांकाळ) शिंदेवाडी (कवठेमहांकाळ) शिरढोण (कवठेमहांकाळ) थाबाडेवाडी तिसंगी (कवठेमहांकाळ) विठूरायाचीवाडी वाघोली (कवठेमहांकाळ) झुरेवाडी
संदर्भ
[संपादन]- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सांगली जिल्ह्यातील तालुके |
---|
शिराळा तालुका | वाळवा तालुका | तासगाव तालुका | खानापूर (विटा) तालुका | आटपाडी तालुका | कवठे महांकाळ तालुका | मिरज तालुका | पलुस तालुका | जत तालुका | कडेगाव तालुका |