कर्‍हाडे ब्राह्मण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कऱ्हाडे ब्राह्मण या पानावरून पुनर्निर्देशित)
कर्‍हाडे (कर्‍हाडा) ब्राह्मण
Rani of jhansi.jpg
Golwalkar.jpgPandit Govind Ballabh Pant.jpg
Dr. mohan rao Bhagwat1.jpg
झाशीची राणी लक्ष्मीबाई नेवाळकर • श्री.गोळवलकर गुरुजी • स्वातंत्र्य सेनानी व राजकीय नेते गोविंद वल्लभ पंत• राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री. मोहन भागवत
प्रमुख लोकसंख्या ;
लक्षणीय लोकसंख्या ;
 • कर्नाटक
 • केरळ
 • मध्य प्रदेश
इतर ;
भाषा =मराठी, कन्नड, हिंदी
एकूण लोकसंख्या
लोकसंख्येचे प्रदेश
भाषा
धर्म


नर्मदा ते तुंगभद्रा नदी या दरम्यान करहाटक प्रांत

हिंदू धर्मात ब्राह्मणांच्या असंख्य पोटजाती[१] आहेत. अनावला ब्राह्मण, अय्यंगार, अय्यर, आदिगौड, उत्कल ब्राह्मण, औदिच्य ब्राह्मण, कन्नड ब्राह्मण, कानडे सोनार, कान्यकुब्ज ब्राह्मण, कोकणी सोनार ब्राह्मण, कोटा ब्राह्मण, गंगारी, गारूड ब्राह्मण, गौड ब्राह्मण, खसिया ब्राह्मण, तेलंगी ब्राह्मण, देवांग सोनार, नागर ब्राह्मण, पंचगौड ब्राह्मण, पंचद्रविड ब्राह्मण, पांचाल ब्राह्मण, प्रशनोरा, बडनगरा ब्राह्मण, भाटेला ब्राह्मण, माथुर ब्राह्मण, माध्व, राजगोर, विशनगरा ब्राह्मण, विश्वब्राह्मण, वैष्णव, शिवल्ली ब्राह्मण, श्रोत्रिय ब्राह्मण, सारस्वत ब्राह्मण, सुरोली, स्मार्त, हव्यका वगैरे.

मराठी ब्राह्मणांत सात प्रमुख पोटजाती आहेत. ’कर्‍हाडे ब्राह्मण' ही त्यांपैकी एक पोटजात आहे. महाराष्ट्रीय ब्राह्मण जातीतील इतर ६ पोटजाती देशस्थ, चित्पावन, देवरुखे , दैवज्ञ, सारस्वत ब्राह्मण व गौड सारस्वत ह्या आहेत.


कर्‍हाडे नावाची व्युत्पत्ती[संपादन]

प्राचीन ग्रंथातील उल्लेखांनुसार तुंगभद्रा नदीपासून ते नर्मदा वा गोदावरी नद्यांपर्यत करहाटक प्रांत पसरला होता. त्या प्रांतातील राहणार्‍या ब्राह्मण 'कर्‍हाडे ब्राह्मण' हे नाव पडले. सर्व कर्‍हाडे ब्राह्मण हे ऋग्वेदी, आश्वलायन सूत्राचे व शाकलशाखी आहेत.

कर्‍हाडे ब्राह्मणांतील गोत्रे[संपादन]

 1. अत्रि
 2. अंगिरस
 3. उपमन्यु
 4. काश्यप
 5. कुत्स
 6. कौंडिण्य
 7. कौशिक
 8. गार्ग्य
 9. गौतम
 10. जामदाग्नि
 11. नैधृव
 12. पार्थिव
 13. बादरायण
 14. भार्गव
 15. भारद्वाज
 16. मुद्गल
 17. लोहिताक्ष
 18. वत्स
 19. वाशिष्ठ
 20. वैम्य
 21. वैश्वामित्र
 22. शांडिल्य
 23. शालाक्ष

कर्‍हाडे ब्राह्मणांतील उल्लेखनीय व्यक्ती[संपादन]