कमळ (नेलुंबो)
कमळ | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
![]() निलुंबो नुसिफेरा
| ||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||
| ||||||||||
जीव | ||||||||||
निलंबो ल्युटिया (अमेरिकन कमळ) |
फूल[संपादन]
कमळ हे चिखलात, पाण्यामध्ये आढळते. दिसायला सुंदर असणारी ही जलवनस्पती निलंबियासी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव निलंबो नुसिफेरा असे आहे. तिच्या सुमारे १०० जाती जगभर आढळतात. तिचे मूळस्थान भारत, चीन आणि जपान असावे. इराणपासून पूर्वेस ऑस्ट्रेलियापर्यंत तिचा प्रसार झाला आहे.भारतात जवळपास सर्व प्रदेशात कमळाची फुले सापडतात.कमळ हे भारताचे व व्हिएटनामचे राष्ट्रीय फूल आहे.कमळाची फुले उबदार असतात. कमळ हे विविध रंगात पाहायला मिळते. कमळाचे फळ खाण्यासाठी मखना या नावानी वापरतात . कमळ हे फूल देवी लक्ष्मीच्या हातात आपल्याला दिसते.
कमळाच्या खोडा-पानाचे वर्णन[संपादन]
साधारणपणे गोडय़ा आणि उथळ पाण्यात वाढणारी ही वनस्पती एक ते दीड मीटर उंच आणि एकाच पातळीत दोन मीटरपर्यंत पसरते. खोड लांब असून पाण्याच्या तळाशी जमिनीवर सरपटत वाढते. पाने मोठी वर्तुळाकार, छत्राकृती, ६०-९० से.मी. व्यासाची असतात. पानाचे देठ लांब असतात. पानावरील शिरा पानाच्या मध्यापासून किरणाप्रमाणे पसरलेल्या असतात. कमळाची पाने आणि फुले पाण्याच्या संपर्कात न राहता पाण्यावर येऊन वाढतात. कमळाचे फूल सुगंधी आणि मोठे असते. फुलांचा रंग जातीिनुसार वेगवेगळा असतो. आपल्याकडे मुख्यतः गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची कमळे आढळतात. कमळाकडे विविध कीटक आकर्षित होत असतात त्यामुळे त्यांतील जैविविधता टिकून राहते
कमळाची पुष्पथाली (कमळकाकडी) आणि बी (कमलाक्ष) यांचा वापर अनेक भारतीय, विशेषतः सिंधी लोक खाण्यासाठी करतात.
वैदिक महत्त्व[संपादन]
वैदिक वाड्मय कमळाचे गुणगान करताना थकत नाही. भगवान.श्रीकृष्णाने गीतेमध्ये कमळाला आदर्श मानून तसे जीवन जगण्याचा उपदेश केला. अनासक्तीचा आदर्श- संसारात राहूनही संसाराच्या दोषांपासून मुक्त राहण्याची जीवन दृष्टी कमळ देते. कमळाचे पान (पद्मपत्र) पाण्यात असूनही पाण्याचा एक थेंबही स्वतःला लागू देत नाही, अशी उपमा दिली जाते.