श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानक
Appearance
(कटरा रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
श्री माता वैष्णोदेवी कटरा भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | कटरा, रियासी जिल्हा |
गुणक | 32°58′56″N 74°56′7″E / 32.98222°N 74.93528°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | २,६७० फूट |
मार्ग | काश्मीर रेल्वे |
फलाट | ३ |
इतर माहिती | |
उद्घाटन | इ.स. २०१४ |
विद्युतीकरण | नाही |
संकेत | SVDK |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | उत्तर रेल्वे |
स्थान | |
|
श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानक हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील कटरा येथील रेल्वे स्थानक आहे. उत्तर रेल्वेच्या फिरोजपूर विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या ह्या स्थानकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी ४ जुलै २०१४ रोजी केले. जम्मूला श्रीनगरसोबत जोडणाऱ्या मार्गावरील कटरा हे एक स्थानक आहे. आजच्या घडीला सर्व गाड्या कटरापर्यंतच धावतात. ह्या स्थानकामुळे वैष्णोदेवी ह्या तीर्थस्थळी प्रवास करणाऱ्या भाविकांना रेल्वे प्रवास शक्य झाला आहे.
कटरा स्थानक चालू झाल्यानंतर पूर्वी जम्मू तावी रेल्वे स्थानकापर्यंत धावणाऱ्या अनेक गाड्या कटरापर्यंत वाढवण्यात आल्या.
महत्त्वाच्या गाड्या
[संपादन]- कटरा-नवी दिल्ली उत्तर संपर्क क्रांती एक्सप्रेस
- नवी दिल्ली-कटरा वंदे भारत एक्सप्रेस
- कटरा-वांद्रे टर्मिनस स्वराज एक्सप्रेस
- कटरा-चेन्नई सेंट्रल अंदमान एक्सप्रेस
- हिमसागर एक्सप्रेस