एडी रेडमेन
| लिंग | पुरूष |
|---|---|
| नागरिकत्व | युनायटेड किंग्डम |
| स्थानिक भाषेतील नाव | Eddie Redmayne |
| जन्म-नाव | Edward John David Redmayne |
| दिलेले नाव | Edward, जॉन, David |
| आडनाव | Redmayne |
| जन्म तारीख | ६ जानेवारी 1982 |
| जन्मस्थान | लंडन |
| वडील | Richard Charles Tunstall Redmayne |
| आई | Patricia Burke |
| वैवाहिक जोडीदार | Hannah Jane Bagshawe |
| अपत्य | Iris May Redmayne, Luke Richard Bagshawe Redmayne |
| बोलण्याची वा लेखनाची भाषा | इंग्लिश भाषा |
| व्यवसाय | चित्रपट अभिनेता, मंच अभिनेता, मॉडेल, दूरदर्शन अभिनेता, अभिनेता |
| शिक्षण घेतलेली संस्था | एटोन कॉलेज, ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज, Colet Court |
| कार्य कालावधी (प्रारंभ) | 1998 |
| वैद्यकीय स्थिती | color blindness |
| गट-प्रकार | Shakespearean comedy |
| नामांकने प्राप्त | ऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, ऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, European Film Award – People's Choice Award for Best European Film, European Film Award – People's Choice Award for Best European Film, Golden Globe Award for Best Supporting Actor – Motion Picture |
एडवर्ड जॉन डेव्हिड "एडी" रेडमायने (६ जानेवारी १९८२) एक इंग्रजी अभिनेता आहे. एक अकादमी पुरस्कार, एक टोनी पुरस्कार, एक बाफ्टा पुरस्कार, दोन ऑलिव्हिये पुरस्कार यासह त्याला विविध पुरस्कार मिळाले आहेत.
रेडमायनेने १९९६ मध्ये दूरचित्रवाणीवर पदार्पण करण्यापूर्वी वेस्ट एंड थिएटरमध्ये व्यावसायिक अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली. लाइक माइंड्स (२००६), द गुड शेफर्ड (२००६) आणि एलिझाबेथ: द गोल्डन एज (२००७) हे त्यांचे पहिले चित्रपट होते. रंगमंचावर, रेडमायनने २००९ ते २०१० पर्यंत रेड आणि २०११ ते २०१२ पर्यंत रिचर्ड दुरसा च्या निर्मितीमध्ये काम केले. रेड या नाटकासाठी त्याने नाटकातील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यीकृत अभिनेत्याचा टोनी पुरस्कार आणि सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा लॉरेन्स ऑलिव्हिये पुरस्कार जिंकला.
द थिअरी ऑफ एव्ह्रीथींग (२०१४) मधील भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि द डॅनिश गर्ल (२०१५) मधील ट्रान्सजेंडर कलाकार लिली एल्बे यांच्या भूमिकेसाठी रेडमायनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या अकादमी पुरस्कारासाठी सलग नामांकन मिळाले व २०१४ मध्ये त्याने हा पुरस्कार जिंकला.[१][२] २०१६ ते २०२२ पर्यंत, त्याने फॅन्टास्टिक बीस्ट चित्रपट मालिकेत न्यूट स्कॅमंडर म्हणून काम केले जी हॅरी पॉटर सोबत जोडलेली मालिका आहे.[३][४][५]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Eddie Redmayne wins first Oscar for 'Theory of Everything'". Reuters. 23 February 2015. 8 March 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 March 2015 रोजी पाहिले.
- ↑ "Watch Eddie Redmayne's Charming Best Actor Acceptance Speech at the Oscars". Time. 6 March 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 March 2015 रोजी पाहिले.
- ↑ "Life Is a Cabaret! The Shimmering Kander and Ebb Classic Heads Back to Broadway Starring Eddie Redmayne". Vogue (इंग्रजी भाषेत). 2024-03-05. 2024-03-06 रोजी पाहिले.
- ↑ "Eddie Redmayne to star in J. K. Rowling's Fantastic Beasts - BBC News". BBC News. 2 June 2015. 2 June 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 June 2015 रोजी पाहिले.
- ↑ Graeme McMillan (1 June 2015). "Eddie Redmayne Officially Cast in 'Harry Potter' Prequel 'Fantastic Beasts and Where to Find Them'". The Hollywood Reporter. 3 June 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 February 2016 रोजी पाहिले.