उमेश वीरसेन कदम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रा. डॉ. उमेश वीरसेन कदम हे एक कायदेतज्ज्ञ असलेले मराठी कथालेखक आणि कादंबरीकार आहेत. त्यांचे वडील बाबा कदम यांचेकडून उमेश कदम यांनी लेखनाची प्रेरणा घेतली.

उमेश कदम यांचे शालेय शिक्षण बार्शी, जयसिंगपूर, गडहिंग्लजकोल्हापूर येथे, तर आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण व प्रशिक्षण इंग्लंड (लंडन विद्यापीठ), हॉलंड, स्वित्झर्लंडग्रीस या देशांत झाले. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कदम यांना राष्ट्रकुल शिष्यवृत्ती मिळाली होती.

प्रा. उमेश कदम यांनी १९८० ते १९९८ पर्यंत कॉलेजांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा या विषयाचे अध्यापन केले. १९९८ पासून ते आंतरराष्ट्रीय रेड क्रॉसमध्ये वरिष्ठ कायदा सल्लागार या पदावर काम करीत आहेत. या नोकरीच्या काळात २००३ सालापर्यंत त्यांनी दिल्ली येथील दक्षिण आशिया विभागीय कार्यालयात, त्यानंतर २००८ सालापर्यंत मलेशियातील कुआलालंपूर येथील पूर्व आणि आग्नेय आशिया विभागीय कार्यालयात आणि पुढे २०११ सालापर्यंत इथिओपियातील कार्यालयात काम केले. २०११ पासून ते आजतागायत (२०१४ साल) उमेश कदम हे केन्याची राजधानी नैरोबी येथील कार्यालयात आहेत.

उमेश कदम यांना लेखनाव्यतिरिक्त चित्रकला, शिल्पकला आणि पाककला यांतही रस आहे. उमेश कदम यांचे ‘धर्मांतर’ हे १२वे पुस्तक २०१६मध्ये प्रकाशित झाले.

प्रा. (डॉ.) उमेश कदम यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

युद्धावर आधारित कादंबऱ्या[संपादन]

  • अमानुष
  • उद्‌ध्वस्त
  • निर्दय
  • फ्रेंच-मराठा संबंध
  • संहार

अन्य विषयांवरील कादंबऱ्या[संपादन]

  • जिहाद
  • धर्मांतर

कथासंग्रह[संपादन]

  • एक होता मित्र
  • केवळ मैत्रीसाठी
  • दूरची माती, जवळची नाती
  • दृष्टीपलीकडील सृष्टी (आफ्रिकी गूढपरंपराधारित सत्य कथा)
  • शापित भूमी (आफ्रिकेतील सत्य घटनांनर आधारित कथा)[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ शुभांगी गबाले. "आफ्रिकन समाजमनाचं करुण आक्रंदन". १ आॅक्टोबर २०१४ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)