Jump to content

उपवासाची मिसळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साहित्य

[संपादन]
  • साबुदाण्याची खिचडी (वाटीभर साबुदाणा असेल तर ३/४ वाटी उकडलेल्या बटाटयाच्या फोडी या प्रमाणात करावे. शेवटी लिंबाचा रस मिसळावा)
  • १ लहान वाटी नॉयलॉन साबुदाणा तळून घेणे
  • काकडी किंवा कोशिंबीर
  • खारे दाणे १ लहान वाटी
  • साखर
  • कोथिंबीर
  • १ मोठी वाटी दही.

कृती

[संपादन]

हे सर्व पदार्थ तयार करून ठेवावे. प्रत्येकाच्या बशीत खिचडी घालून ती बशीत पसरावी. त्यावर २-४ चमचे खारे दाणे, त्यावर तितकाच तळलेला साबुदाणा, त्यावर तितकाच बटाटयाचा कीस, त्यावर डावभर दही, त्यावर ३-४ चमचे काकडी चव, कोथिंबीर हे सर्व पदार्थ पेरावेत. चवीपुरती साखर पेरावी. खाणाऱ्याने आपल्या आवडीप्रमाणे हे सर्व मिसळून घ्यावेत. वरील पदार्थांचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त करावे.


संदर्भ

[संपादन]