साबुदाण्याचं थालीपीठ
Appearance
(साबुदाणा थालिपीठ या पानावरून पुनर्निर्देशित)
साहित्य
[संपादन]- २ वाट्या साबुदाणा
- २ मध्यम बटाटे (शिजवलेले)
- १/२ वाटी शेंगदाण्यांचा कूट
- ५-६ हिरव्या मिरच्या
- अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
- १ चमचा लिंबाचा रस
- १ चमचा जीरे
- १/२ चमचा जीरेपूड
- चवीपुरते मिठ
- तेल/ तूप
- थालिपीठ थापण्यासाठी प्लास्टिकची शिट
कृती
[संपादन]- साबुदाणे पाण्यात भिजवावे.उरलेले पाणी काढून टाकावे. ३-४ तास भिजत ठेवावेत.
- शिजलेले बटाटे नीट कुस्करून घ्यावे.
- मिरच्या बारीक वाटून घ्याव्यात.
- शेंगदाण्याचा कूट : शेंगदाणे भाजून त्याची साले काढावीत आणि मिक्सरवर बारीक करावेत.
- भिजवलेला साबुदाणा, शिजवलेले बटाटे, मिरच्यांचे वाटण, जीरे, जीरेपूड, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि चवीपुरते मीठ घालून नीट मिक्स करावे. मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करावे.
- प्लास्टिक शिटला तूपाचा हात लावून गोळे थापावे. थालिपीठाच्या मध्यभागी तूप सोडण्यासाठी एक छिद्र करावे.
- नॉनस्टीक तव्यावर थोडे तूप सोडावे. मिडीयम हाय हिटवर थालिपीठाला झाकण ठेवून वाफ काढावी. दोन्ही बाजूने खरपूस करून घ्यावे. दही, मिरचीचा ठेचा, किंवा लिंबाचे गोड लोणचे यांबरोबर हे थालिपीठ छान लागते.