इ.स. १९८०
Appearance
(ई.स. १९८० या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९६० चे - १९७० चे - १९८० चे - १९९० चे - २००० चे |
वर्षे: | १९७७ - १९७८ - १९७९ - १९८० - १९८१ - १९८२ - १९८३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- फेब्रुवारी १४ - अमेरिकेत लेक प्लॅसिड येथे तेरावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
- फेब्रुवारी २२ - बर्फावरील चमत्कार - लेक प्लॅसिड येथे तेराव्या हिवाळी ऑलिंपिक खेळात अमेरिकेच्या आइस हॉकी संघाने बलाढ्य अश्या सोवियेत संघाला हरवले.
- एप्रिल १२ - लायबेरियात लश्करी उठाव. सॅम्युएल डोने राज्यसत्ता हाती घेतली.
- एप्रिल १८ - झिम्बाब्वेला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- एप्रिल २४ - इराणमध्ये ओलिस असलेल्या अमेरिकेच्या नागरिकांना सोडवण्याच्या निष्फळ प्रयासात ८ अमेरिकन सैनिक ठार.
- मे ५ - ६ दिवस घेराव घातल्यावर ब्रिटिश कमांडोंनी लंडनमधील ईराणच्या वकिलातीवर हल्ला चढवला.
- मे ९ - फ्लोरिडातील सनशाईन स्कायवे ब्रिजला लायबेरियाच्या मालवाहू जहाज एस.एस. समिट व्हेन्चरची धडक. ३५ ठार.
- मे १७ - विद्यार्थ्यांची निदर्शने रोखण्यासाठी दक्षिण कोरियात लश्करी कायदा लागू.
- मे १८ - अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील माउंट सेंट हेलेन्स या ज्वालामुखीचा उद्रेक. ५७ ठार. ३,००,००,००,००० अमेरिकन डॉलरचे नुकसान.
- मे १८ - पेरूमध्ये शायनिंग पाथ या अतिरेकी संघटनेने मतदान केन्द्रावर हल्ला चढवून आपल्या कारवायांची सुरुवात केली.
- जून २७ - एरोलिनी इटाव्हिया फ्लाइट ८७० हे डी.सी.८ प्रकारचे विमान इटलीत युस्टीका शहराजवळ कोसळले. ८१ ठार.
- जुलै २८ - फर्नान्डो बेलॉॅंडे टेरी परत पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- ऑगस्ट २ - इटलीतील बोलोन्या शहराच्या रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोट. ८५ ठार, २०० जखमी.
- डिसेंबर ८ - मार्क चॅपमनने न्यू यॉर्क मध्ये डकोटा बिल्डींगच्या बाहेर जॉन लेननचा खून केला.
जन्म
[संपादन]- फेब्रुवारी २१ - जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक, भूतानाचा राजा.
- जुलै ३ - हरभजनसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १३ - वीरेन रास्किन्हा, भारतीय हॉकी खेळाडू.
- सप्टेंबर २१ - करीना कपूर, भारतीय अभिनेत्री.
- ऑक्टोबर ३ - सॅराह कॉल्येर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- डिसेंबर १ - मोहम्मद कैफ, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- एप्रिल १२ - विल्यम आर. टॉल्बर्ट, जुनियर, लायबेरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- मे ४ - जोसेफ ब्रोझ टिटो, युगोस्लाव्हियाचा राष्ट्राध्यक्ष.
- जुलै १३ - सेरेत्से खामा, बोत्स्वानाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- जुलै १९ - निहात एरिम, तुर्कस्तानचा पंतप्रधान.
- जुलै २४ - पीटर सेलर्स, ब्रिटिश अभिनेता.
- जुलै २७ - मोहम्मद रझा पहलवी, ईराणचा शहा.
- जुलै ३१ - मोहम्मद रफी, भारतीय पार्श्वगायक.
- ऑगस्ट १० - याह्या खान, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.