इ.स. १९३९
Appearance
(ई.स. १९३९ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९१० चे - १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे |
वर्षे: | १९३६ - १९३७ - १९३८ - १९३९ - १९४० - १९४१ - १९४२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- जानेवारी २६ - स्पॅनिश गृहयुद्ध - इटलीच्या मदतीने फ्रांसिस्को फ्रॅंकोने बार्सेलोना जिंकले.
- मार्च २ - पायस बारावा पोपपदी.
- मार्च ३ - गांधीजींनी मुंबईत आमरण उपोषण सुरू केले.
- एप्रिल १३ - भारतात हिंदुस्तानी लाल सेनेची स्थापना.
- मे २२ - जर्मनी व इटलीत पोलादी तह.
- मे २३ - चाचणीची सफर सुरू असताना अमेरिकेची पाणबुडी यु.एस.एस. स्क्वॉलस बुडाली. २६ खलाशी मृत्युमुखी. ३२ खलाशी, अधिकारी व १ प्रवाश्याला दुसऱ्या दिवशी वाचवण्यात आले.
- जुलै ६ - ज्यूंचे शिरकाण - जर्मनीतील ज्यू व्यक्तींचे उरलेसुरले उद्योगधंदे बंद करण्यात आले.
- नोव्हेंबर ३० - रशियाच्या सैन्याने फिनलंडवर चढाई करून मॅनरहाइम रेषेपर्यंत धडक मारली.
- डिसेंबर १३ - दुसरे महायुद्ध-रिव्हर प्लेटची लढाई - ब्रिटिश नौदलाच्या क्रुझर एच.एम.एस. एक्झेटर, एच.एम.एस. अजॅक्स व एच.एम.एन.झेड.एस. अकिलिसशी दिलेल्या झुंजीत पराभव अटळ दिसत असता जर्मनीच्या कॅप्टन हान्स लॅंग्सडॉर्फने आपली पॉकेट बॅटलशिप ॲडमिरल ग्राफ स्पी बुडविली.
- डिसेंबर १४ - हिवाळी युद्ध - लीग ऑफ नेशन्समधून रशियाची हकालपट्टी.
जन्म
[संपादन]- जानेवारी ३० - अलेहांद्रो टोलेडो, पेरूचा अध्यक्ष.
- एप्रिल २० - ग्रो हार्लेम ब्रुंड्टलॅंड, नॉर्वेचा पंतप्रधान.
- जून ५ - ज्यो क्लार्क, कॅनडाचा १६वा पंतप्रधान.
- जून २० - रमाकांत देसाई, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- जून २९ - ऍलन कॉनोली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- जुलै ६ - मन सूद, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- जुलै २६ - जॉन हॉवर्ड ऑस्ट्रेलियाचा २५वा पंतप्रधान.
- ऑगस्ट ३ - अपूर्व सेनगुप्ता, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट ९ - रोमानो प्रोडी, इटलीचा पंतप्रधान.
- ऑक्टोबर २ - बुधि कुंदरन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- फेब्रुवारी ६ - सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे महाराज
- फेब्रुवारी १० - पोप पायस अकरावा.
- डिसेंबर १९ - हान्स लॅंगडोर्फ, जर्मन आरमारी अधिकारी.
- सप्टेंबर २१ - आर्मांड कॅलिनेस्कु, रोमेनियाचा पंतप्रधान.