एच.एम.एस. अजॅक्स (२२)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg
क्रुझर एच.एम.एस. अजॅक्स

एच.एम.एस. अजॅक्स ही रॉयल नेव्हीची लियॅंडर वर्गाची हलकी क्रुझर होती. हीने दुसऱ्या महायुद्धातील रिव्हर प्लेटच्या लढाईत तसेच क्रीटची लढाईमाल्टाची लढाई यांत भाग घेतला होता. याशिवाय ही क्रुझर टोब्रुकच्या वेढ्यात रसदपुरवठ्याची रक्षकनौका म्हणून तैनात होती.

अजॅक्स नाव असलेली ही रॉयल नेव्हीची आठवी नौका होती. हीची बांधणी फेब्रुवारी ७, १९३३ रोजी सुरू झाली व एप्रिल १२, १९३५ रोजी ही लढाऊ सेवेसाठी रुजू झाली.