Jump to content

इमॅन्युएल मॅक्राँ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इमॅन्युएल मॅक्राँ

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१४ मे २०१७
मागील फ्रान्स्वॉ ओलांद

अर्थव्यवस्था, उद्योग आणि डिजिटल कार्य मंत्री
कार्यकाळ
२६ ऑगस्ट २०१४ – ३० ऑगस्ट २०१६
पंतप्रधान मॅनुएल वाल्स
मागील आरनॉद मॉंतबूर्ग
पुढील मिशेल सापिन

जन्म २१ डिसेंबर, १९७७ (1977-12-21) (वय: ४६)
अमियॉं, फ्रान्स
राजकीय पक्ष ऑन् मार्श! (२०१६-वर्तमान)
मागील इतर राजकीय पक्ष अपक्ष (२००९-२०१६)
समाजवादी पक्ष (२००९ पूर्वी)
आई फ्रान्स्वा नोगेस-मॅक्रॉं
वडील जॉं-मिशेल मॅक्रॉं
पत्नी ब्रिजिट त्रोनिउ (२००७-वर्तमान)
सही इमॅन्युएल मॅक्राँयांची सही

इमॅन्युएल मॅक्राँ ( २१ डिसेंबर १९७७ (1977-12-21), अमियॉं) हे फ्रान्स देशातील एक राजकारणी आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहेत. ते माजी नागरी अधिकारी आणि गुंतवणूक बँकर आहेत. २०१७ च्या फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणूकीत त्यांनी मरीन ले पेन यांचा पराभव केला.

३९व्या वर्षी राष्ट्राध्यक्ष झालेले मॅक्रॉं फ्रान्सचे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष आहेत आणि नेपोलियन नंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात तरुण फ्रान्सचे प्रमुख आहेत.