इंद्रा नूयी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
इंद्रा नूयी

इंद्रा कृष्णमूर्ती नूयी (तमिळ: இந்திரா கிருஷ்ணமூர்த்தி நூயி) (२८ ऑक्टोबर, १९५५:चेन्नई, तमिळनाडू, भारत - ) ह्या पेप्सीको' कंपनीच्या २ मे २००६ पासून चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. या अमेरिकन नागरिक असून जन्माने भारतीय आहेत.

फोर्ब्स मासिकाच्या जगातील १०० शक्तिशाली महिलांच्या यादीत इंद्रा नूयी यांना २००८ साली तेराव्या क्रमांकावर स्थान मिळाले होते. फाॅॅर्चुन मॅॅगझिनने त्यांना २००६ सालच्या सर्वात शक्तिशाली महिला व्यावसायिक जाहीर केले.[१]

इंद्रा नूयी यांचे शिक्षण[संपादन]

  • बी.एस्‌‍सी. (मद्रास ख्रिश्‍चन कॉलेज)
  • एमबीए (आयआयएम कलकत्ता)
  • एम.ए. (येल स्कूल ऑफ मॅनेजमेंट)

महाविद्यालयीन कालखंंड[संपादन]

इंंद्रा यांच्या माहेरच्या कृष्णमूर्ती कुटुंबात संगीताला विशेष महत्त्व दिले जाई.त्यांच्या काकू अरूणा साईराम या प्रख्यात गायिका असल्याने इंद्राना संगीताविषयी आवड निर्माण झाली.कर्नाटकी संगीतातील वर्णम व किर्तनाई यांचा सराव इंद्रा घरी करत असत. १९७२ मध्ये त्यांनी एमसीसी महाविद्यालयात प्रवेश घेतला.इंद्रा या काळात राॅक बँडच्या सदस्या होत्या आणि त्या गिटारही वाजवत असत.

संगीताच्या जोडीनेच त्या आपल्या बहिणीसह अलायन्स फ्रान्सकेस या संस्थेत फ्रेंच भाषा शिकायला गेल्या.कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करणे, महाविद्यालयासाठी देणगी मिळविणे अशी विविध कामे त्यांनी यशस्वीपणे केली आहेत.क्रिकेट या खेळातही त्यांचं त्यांच्या संघातील योगदान विशेष आहे.[२]

कामाचा अनुभव[संपादन]

आयआयएम मधून पदवी प्राप्त केल्यावर इंद्रा यांनी पहिली नोकरी टुटाल या ब्रिटीश टेक्सटाईल कंपनीत केली. त्यानंतर जाॅन्सन अँड जाॅन्सन या कंपनीत ब्रँड मॅनेजर म्हणून स्टेफ्री विभागाची जबाबदारी त्यांनी पार पाडली.१९७८ मध्ये त्यांची येल विद्यापीठात पब्लिक मॅनेजमेंट ॲन्ड प्रायव्हेट मॅनेजमेंट या अभ्यासक्रमासाठी निवड झाली.येथे अभ्यासक्रमाव्यतिरीक्त इंद्रा विविध गोष्टी शिकल्या. त्यातून व्यवसायात लागणारी अंतःप्रेरणा,ज्वलंत इच्छाशक्ती आणि निर्णयक्षमता हे गुण त्यांनी आत्मसात केले. त्या येल काॅर्परेशनच्या विश्वस्त म्हणूनही काम पाहतात.१९८० मध्ये त्यांनी बोस्टन समूहात नोकरी स्वीकारली. येथे त्यांनी सहा वर्षे आंतरराट्रीय काॅर्पोरेट नीतिमत्ता या प्रकल्पावर कार्य केले.या नोकरीमुळेच एक बुद्धीमान व्यावसायिक म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या.

विवाह[संपादन]

चेन्नई येथील पारंंपरिक अणि सनातनी कृृष्णमूर्ती कुटुंंबात इंंद्रा यांंचा जन्म झाला. आई शांंता यांंचा त्यांंच्या आयुष्यावर विशेष प्रभाव आहे. १९८३ साली इंद्रा अणि राजकिशन नूयी यांचा विवाह झाला.त्यांचे पती व्यवसायाने इंजिनीअर असून मास्टर्स इन बिझनेस मॅनेजमेंट या विषयात त्यांनी शिकागो विद्यापीठातून पदवी घेतली.इंंद्रा यांंना दोन मुली आहेत.

कारकीर्दीतील महत्वाचे टप्पे[संपादन]

आपल्या मुलीच्या जन्मानंतर इंद्रा यांनी १९८६मध्ये मोटोरोला कंपनीत काॅर्पोरेट स्टेटजी आणि प्लॅनिंग या विभागाची प्रेसिडेंट आणि डायरेक्टर म्हणून कार्यभार स्वीकारला.त्यांच्या कारकीर्दीतच पहिला पेजर या कंपनीने जगासमोर आणला ज्यातून मोबाईल क्षेत्रात क्रांती झाली.

१९९०मध्ये त्यांनी एएसए ब्राऊन या स्वीस स्वीडीश कंपनीत काम केले.येथील त्यांचे योगदान पाहून जॅक वेल्च यांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले अणि १९९४मध्ये पेप्सिको कंपनीच्या तसेच जनरल इलेट्रिक या दोन्ही कंपन्यांकडून त्यांना सीईओ पदासाठीचे प्रस्ताव आले.इंद्रा यांनी पेप्सिको या शीतपेयांची कंपनी स्वीकारली.[३]

लक्षणीय कारकीर्द[संपादन]

इंद्रा यांनी वयाच्या ४४ व्या वर्षी पेप्सिकोच्या ज्येष्ठ उपाध्यक्षा म्हणून कार्यभार सांभाळला.ईओ एन्रिको रोजर यांच्यासह त्यांनी काम केले.त्यांचा विभाग काॅर्पोरेट स्ट्रॅटेजी ॲन्ड डेव्हलपमेंट हा होता.त्यावेळी गगनाला भिडलेला कंपनीचा रेस्टाॅरंट व्यवसाय अचानक ढासळू का लागला? यावर त्यांनी काम केले.इंद्रा आणि ऐन्रिको यांनी पेप्सिकोच्या पूर्ण कार्यप्रणालीचा अभ्यास केला व तर्कशुद्ध निर्णय घेतले. या सर्व विभागाची पुनर्रचना करण्यात इंद्रा यांनी जबाबदारीची भूमिका बजावली.१९९७ च्या पेप्सिकोच्या फास्ट फूड चेन यंत्रणेतील बदल,१९९८ च्या ट्राॅपिकाना कंपनीची खरेदी आणि २००१ मधील क्वॅकर ओटची खरेदी हे त्यांचे काही महत्वाचे निर्णय ठरले.[४]

अन्य दायित्व[संपादन]

मोटोरोलामधील संचालक मंडळ सदस्य, आंतरराट्रीय बचाव मंडळ सदस्य,लिंकन सेंटर फाॅर परफाॅमिंग आर्ट न्यूयाॅर्कच्या सदस्य, प्लॅनेट फायनान्स आणि ग्रिनीच ब्रेस्ट कॅन्सर अलायन्स तसेच इसेनहाॅवर या आशियाई शिष्यवृत्ती संस्थेच्या सदस्य तसेच फेडरल रिझर्व बँकेच्या त्या संचालक मंडळावर आहेत.

भारतीय आस्था[संपादन]

इंंद्रा या आता परदेशी नागरिक असल्या तरी त्यांंचे भारतीय बंंध टिकून आहेत. भारतातील शेतकी क्षेत्रासाठीही त्यांंनी विशेष कार्य केले आहे.दैनंंदिन जीवनातही भारतीय परंंपरांंचे पालन त्या करतात असे दिसते.

संदर्भ[संपादन]

  1. इंंद्रा नूयी जीवन चरित्र लेखिका अन्नपूर्णा, अनुवाद ढापरे प्रसाद,मिरर प्रकाशन
  2. इंंद्रा नूयी जीवन चरित्र लेखिका अन्नपूर्णा, अनुवाद ढापरे प्रसाद,मिरर प्रकाशन,२०१४
  3. इंंद्रा नूयी जीवन चरित्र लेखिका अन्नपूर्णा, अनुवाद ढापरे प्रसाद,मिरर प्रकाशन,२०१४
  4. इंंद्रा नूयी जीवन चरित्र लेखिका अन्नपूर्णा, अनुवाद ढापरे प्रसाद,मिरर प्रकाशन,